मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या धानीवरी येथे एका टेम्पोला कंटेनरने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. ही घटना ऐकून अतिशय दु:ख झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेत सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपजिल्हा रुग्णालय कासा तसेच धुंदलवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाशी मी सातत्याने संपर्कात आहे. पोलिस अधीक्षक हे स्वत: घटनास्थळी होते. तेथील बचावकार्य पूर्ण झाले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.
#Palghar #Maharashtra