पुरावा जिवंत आहे!
इतिहास कधीच खोटा नसतो फक्त तो वाचण्याची, स्वीकारण्याची हिंमत लागते. आज जे लोक तथ्यांचा आधार न घेता प्रत्येक ऐतिहासिक सत्याला 'द हिंदू'ला 'फेक' म्हणून हिणवतात, त्यांच्यासाठी ' गोल्ड कंट्रोल ऍक्ट १९६८' चा जिआर हा आरसा आहे.
ही केवळ एक बातमी नाही, तर त्या काळातील काँग्रेस सरकारच्या आर्थिक धोरणांचे जिवंत दस्तऐवज आहे. 'सोनं खरेदी करू नका' असं आवाहन करणाऱ्यांपासून ते सोन्याच्या व्यापारावर बेड्या ठोकणाऱ्या 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट' पर्यंतचा प्रवास हा भारतीय अर्थव्यवस्थेतील एक वेदनादायी अध्याय आहे.
चला तर मग, पुराव्यांसह जाणून घेऊया १९६८ चा तो कायदा, ज्याने भारतीयांच्या वैयक्तिक सोन्याच्या अधिकारावरही गदा आणली होती.
१. सोने बाळगण्यावर बंदी :
नागरिकांना सोन्याच्या बार किंवा नाण्यांच्या स्वरूपात सोने ठेवण्यास पूर्णपणे बंदी होती. जे सोने अशा स्वरूपात होते ते दागिन्यांमध्ये रूपांतरित करून सरकारकडे घोषित करणे अनिवार्य होते.
२. सोनारांवर कठोर बंधने :
सोनारांना फक्त १०० ग्रॅमपर्यंतच सोने ठेवण्याची परवानगी होती. परवानाधारक व्यापाऱ्यांना त्यांनी किती कारागीर ठेवले आहेत त्यानुसार जास्तीत जास्त २ किलो सोने ठेवता येत होते.
३. परवाना पद्धत :
सोन्याशी संबंधित प्रत्येक व्यवसायासाठी - व्यापारी, शुद्धीकरण कारखाने आणि सोनार - सरकारी परवाना अनिवार्य होता. परवान्याशिवाय सोने ठेवणे, बनवणे किंवा विकणे बेकायदेशीर होते.
४. कडक शिक्षा :
बेकायदेशीरपणे सोने ठेवल्यास ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होती. Gold Control Officers ला कोणाच्याही घरात, दुकानात जाऊन तपासणी करण्याचे अधिकार होते.
५. देवस्थानांनाही बंधन :
धार्मिक संस्थांना देणग्यांमधून मिळालेल्या सोन्याचे मासिक हिशेब सरकारला सादर करणे बंधनकारक होते.
सत्य हे सूर्यासारखं असतं, ते कितीही काळ खोटेपणाच्या ढगांआड लपवलं तरी एक दिवस लख्खपणे समोर येतंच. १९६८ चा सुवर्ण नियंत्रण कायदा हा त्याच सत्याचा भाग आहे. ज्यांना हा फोटो 'फेक' वाटतो, त्यांनी किमान संसदेच्या नोंदी आणि ऐतिहासिक गॅझेट तपासावेत. राजकीय भूमिका घेताना आपल्याच पक्षाचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासारखे आहे.
आश्चर्य याचे वाटते की, आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला फक्त एक सकारात्मक 'सल्ला' दिला, तर या मंडळींना एवढी मिर्ची लागली की त्यांनी थेट इतिहासालाच नाकारायला सुरुवात केली.
ज्यांनी स्वतःच्या काळात कायद्याचा बडगा उगारून सामान्य जनतेच्या सोन्यावर निर्बंध आणले, त्यांनी आज केवळ एका सल्ल्यावरून कांगावा करावा हे हास्यास्पद आहे.
भाजपच्या नावाने बोटं मोडण्याआधी काँग्रेसने स्वतःच्या काळातील या 'सुवर्ण' इतिहासाचे आत्मपरीक्षण करावे. पुराव्यासमोर कोणाचंही राजकारण टिकत नाही, हेच यावरून सिद्ध होतं!
कंबरडं अर्थव्यवस्थेचं नाही, कंबरडं मोडलंय आपल्या 'राज'कीय गणिताचं!
सप्रेम जय महाराष्ट्र,
राज ठाकरे, तुमचं पत्र वाचनात आलं. तुमची भाषा नेहमीप्रमाणेच 'खळ्ळ-खट्याक' शैलीची आणि टोमणेवजा आहे. पण साहेब, भाषणांच्या टाळ्या आणि देशाची अर्थव्यवस्था यातला फरक समजून घ्यायला फक्त 'मराठी'ची जाण असून चालत नाही, तर थोडा 'अर्थ' ही समजून घ्यावा लागतो.
पंतप्रधानांच्या ताफ्यावर तुमच्या चेल्यांच्या भाषेत सणसणीत टीका केलीत. पण साहेब, तुम्ही जेव्हा 'कृष्णकुंज' वरून बाहेर पडता, तेव्हा तुमच्या मागे - पुढे असलेल्या गाड्यांचा ताफा हा काय 'काटकसरीचा' नमुना असतो का? की तो फक्त तुमचा 'रुबाब' असतो? पंतप्रधान देशाचे प्रतिनिधी आहेत, त्यांचा ताफा ही 'मिरवणूक' नसून ती देशाची सुरक्षा आणि प्रोटोकॉल असतो. आता पंतप्रधान काय सायकलीवरून परदेश दौऱ्याला जातील अशी तुमची अपेक्षा आहे का? परदेश दौरे हे थंड हवेसाठी नसून भारताच्या प्रगतीची 'उब' वाढवण्यासाठी असतात, हे समजायला थोडी व्यापक दृष्टी लागते.
तुम्ही म्हणालात अर्थव्यवस्था आतून कमकुवत झाली आहे. साहेब, आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ताठ मानेने उभा आहे. देश मजबूतच आहे, पण घरचा प्रमुख जसा पावसाळ्यापूर्वी घराचं छप्पर तपासायला सांगतो, तसंच पंतप्रधान भविष्यातील जागतिक संकटाची इराण-इस्रायल युद्ध पूर्वकल्पना देत आहेत. याला 'कंबरडं मोडणं' म्हणत नाहीत, तर याला 'दूरदृष्टी' म्हणतात. जेव्हा तुम्ही टोलनाके फोडण्याचे आदेश देता, तेव्हा अर्थव्यवस्थेला खिळ बसते की चालना मिळते, याचाही हिशोब एकदा जनतेला द्यावा!
२००८ आणि २०१४ च्या किमतींचे दाखले देणं आता 'आऊटडेटेड' झालंय. तुमच्या माहितीसाठी, मनमोहन सिंगांच्या काळात जो 'इंधन रोख्यांचा' (Oil Bonds) डोंगर उभा केला होता, त्याचं व्याज आणि मुद्दल फेडण्याचं पुण्यकर्म हे सरकार करत आहे. तेव्हा तुम्ही स्वस्त कम महाग पेट्रोल वापरलंत कारण ते 'उधारी'वर होतं. आज आपण जे पैसे देतोय, त्यातून देश आत्मनिर्भर होतोय. रुपयाचं मूल्य कमी झालं म्हणून रडण्यापेक्षा, भारताचा परकीय चलन साठा किती वाढलाय हे पाहिलं तर 'मन की बात'ऐवजी 'डेटाची बात' समजेल.
महाराष्ट्राच्या योजनांना तुम्ही 'रेवडी' म्हणताय? जेव्हा आपल्या पक्षाला साधी 'विठ्ठलाची पाऊली' ही निवडणुकीत मिळत नाही, तेव्हा अशा योजना तुम्हाला 'अर्थव्यवस्था बुडवणाऱ्या' वाटणारच! महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या पैशाला 'रेवडी' म्हणणं हा तर महाराष्ट्राच्या माता -भगिनींचा अपमान आहे. तुम्हाला कदाचित 'ब्लू प्रिंट' सादर करण्याची सवय आहे, पण लोकांना प्रत्यक्ष कृती हवी असते, जी हे सरकार करत आहे.
विद्यार्थी परदेशात का जातात? कारण त्यांना तिथे संधी दिसतात. पण गेल्या १० वर्षांत भारतात जेवढे आयआयटी IIT आणि आयआयएम IIM उभे राहिले, तेवढे गेल्या ६० वर्षांत झाले नव्हते. तुम्ही म्हणता 'हिंदी लादली जातेय' हा तुमचा जुना आणि घासलेला टेप आता लोक ऐकत नाहीत. आज भारत तंत्रज्ञानाच्या भाषेत जगाशी बोलतोय आणि तुम्ही अजूनही भाषेच्या वादातच अडकलेले आहात.
शेवटी राज ठाकरे तुम्हाला एवढीच आठवण करून देतो...
राज ठाकरे, शास्त्रीजींनी उपवास करायला सांगितला होता, पण तेव्हा विरोधक 'उपहास' करत नव्हते. आज देश एकसंधपणे संकटाचा सामना करायला तयार असताना, तुम्ही केवळ टोमणे मारण्यात धन्यता मानत आहात. राजकारण करायला अख्खं वर्ष पडलंय, पण किमान देशाच्या आर्थिक शिस्तीच्या बाबतीत तरी 'सल्लागार' बनण्यापेक्षा 'सहभागी' व्हा!
बाकी, १५ मे च्या दौऱ्याची काळजी तुम्ही करू नका, देश सुरक्षित हातांत आहे!
धन्यवाद! @mnsadhikrut@RajThackeray
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत सहधारकांमध्ये किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आता कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही.
यासोबतच, वडिलोपार्जित शेतजमिनीबाबत वारसाहक्काने हक्क प्राप्त झालेल्या सहधारकांनी कलम ८५ अंतर्गत प्रक्रिया न करता थेट नोंदणीस सादर केलेल्या वाटणीपत्रांनाही नोंदणी शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात शासनाने घेतला आहे.
या निर्णयामुळे जमिनीच्या वाटणी प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि वेग वाढणार असून नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
@PMOIndia@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@IGR_Maharashtra@AgriGoI
#Maharashtra #FarmersRelief #LandRevenueAct #AgricultureSupport #RevenueMinister #ChandrashekharBawankul
काय ठोकलय देवाभाऊ यांनी मराठी सक्ती करणाऱ्या उद्धव ठाकरेंना,मराठीचे ढोंगी रखवाले उद्धव ठाकरे कंपनी एक शब्द काढणार नाही मराठी सक्ती वर.
सगळं करून भागले अन् देवपुजेला लागले म्हणजे उद्धव ठाकरे – देवाभाऊ
जयंत पाटील म्हणतात एखाद्याच्या मागे इतके लागणे हे काही बरोबर नाही आणि देवाभाऊ यांनी JP यांच्या तोंडातून वधवून घेतले 🤣🤣
@OfficeofUT@Jayant_R_Patil@Dev_Fadnavis
कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ||
कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ।।
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच भगवान भोलेनाथा चरणी प्रार्थना...
महाशिवरात्री निमित्त आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा...
मुंबई ही आपल्या राष्ट्राचा अभिमान आहे. ती आकांक्षांचे शहर आहे. देशाच्या विकासाला गती देणारे हे शहर आहे. एनडीएला आशीर्वाद दिल्याबद्दल मुंबईतील माझ्या बंधूं-भगिनींप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मुंबईत महाराष्ट्राच्या चैतन्यशील संस्कृतीचे सर्वोत्तम दर्शन घडते. या महान मूल्यांनी प्रेरित होऊन, आम्ही शहरातील नागरिकांना सुशासन आणि ‘सुलभ जीवनमान’ प्रदान करू.
नमस्कार,
मी, उज्वला मोडक.
भारतीय जनता पक्षाने वॉर्ड क्रमांक ७४ मधून नगरसेवक पदासाठी भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीची उमेदवार म्हणून मला पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी शीर्षस्थ नेतृत्वाचे मनापासून आभार मानते....
#BMCElection2026#BMC#UjwalaModak#UjwalaModakBJP
थुंकून चाटणं माझ्या रक्तात नाही” असं छातीठोकपणे सांगणारा
आदित्य ठाकरे आज तेच करताना दिसतोय,
पण तरीही तो मी नव्हेच असा बालिश पळवाटीचा खेळ सुरू आहे.
यावर मनसैनिक गप्प का?
की आदेश आला आहे—डोळे बंद ठेवा, तोंड उघडू नका?
आदित्य, उद्धव आणि राज ठाकरे
हे तिघे मिळून मुंबईच्या मतदाराला
इतका गृहीत धरतात की
आज काहीही केलं तरी मतदार विसरेल,
असं त्यांना वाटतंय का?
की मुंबईकर म्हणजे
राजकीय सोयीसाठी वापरायचं,
वेळीअवेळी दिशाभूल करायचं
आणि नंतर नैतिकतेच्या गप्पा मारायचं साधन आहे?
मुंबईकर मूर्ख नाही...!!
Sonali Jadhav
"उठ दुपारी अन घे सुपारी कार्यक्रम असतो! ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत पुढच्या निवडणुकीलाच येतात" - Raj Thackeray exposed by Sushma Andhare
ओमराजे म्हणत होते मी मोदीपेक्षा मोठ्या मताने निवडून आलो आहे,म्हणजे इतका मोठा अहंकार डोक्यात शिरला होता.
मोदीपेक्षा जास्त मताने निवडून येणाऱ्याला एक नगरपालिका जिंकता आली नाही.
असेच चालू राहिले तर खासदारकी सुद्धा राहणार नाही.अहंकार कमी करा,पद्मसिंह पाटलांचा माज मोडला गेला इथे.
पुन्हा एकदा 'मामू' पॅटर्नने मतं मिळवण्यासाठी उबाठाने रशीद मामूच्या चरणी लोटांगण तर घातले, पण मराठी माणूस हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही...
#ShameOnUBT#AurangzebFanClub