सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
2026 च्या नवीन वर्षात आपल्या स्वप्नांना नवी दिशा मिळून प्रत्येक दिवस सकारात्मकतेने उजळून निघो. आशा, विश्वास आणि प्रगतीचा नवा अध्याय सुरू होवो!
जयसिंगपूर महिलांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश .
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहरातील अनेक महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील यांच्या कामावर विश्वास ठेवून पाठीशी राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
पद्मश्री अशोक सराफ यांचा गौरव कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट!
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण @SarafAshok यांना राज्याचे उद्योगमंत्री @samant_uday यांच्या हस्ते, मंत्री नामदार @mrhasanmushrif साहेब आणि माझ्या उपस्थितीत गौरवण्यात आले.
कोल्हापूरच्या भूमीत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सत्कार होत आहे हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांची जन्मभूमी जरी मुंबई असली तरी तुमची कर्मभूमी ही कोल्हापूर असून या भूमीमध्ये आपला सन्मान करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळत आहे याचा मनस्वी आनंद आहे. कोल्हापूर ज्यावेळी 2019 साली महापूराच्या संकटात होते त्यावेळी आपण मुंबईमध्ये नाट्य़प्रयोग करून 3 लाख रुपये मुख्यमंत्री फंडाला दिले होते हे ऋण कोल्हापूरकर कधीच विसरू शकणार नाहीत अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, निवेदिता सराफ, विघ्नेश जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्याध्यक्ष आनंद कुलकर्णी, उपाध्यक्ष जितेंद्र देशपांडे, प्रमुख कार्यवाहक, गिरीश महाजन यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवार, दि 4 ऑक्टोबर 2025 स्थळ- कोल्हापूर
स्वप्नपुर्तीची वर्षपुर्ती...
कसबा बावड्यात 5 ऑक्टोबर 2024 मध्ये राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या बहुशस्त्रधारी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याची वर्षपुर्ती कार्यक्रम पार पडला. या निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना ढोलताशा आणि लेझीम पथकाच्या गजरात अभिवादन करण्यात आलं. साखरपेढे वाटण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आदर्श राजा या जगात झाला नाही आणि होणार नाही. अशा राजाचा आदर्श घेवून नव्या पिढीने वाटचाल करावी असे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, हरीश चौगले, सुभाष बुचडे, माधुरी लाड, पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबर्गेकर, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील आणि सर्व संचालक, संग्राम पाटील, मानसिंग जाधव, शिवराज जाधव, दिगंबर साळुंखे, भारतवीर प्रतिष्ठानचे आर. के. सबनीस, कृष्णात घोडके, प्रदीप उलपे , युवराज उलपे, निशिकांत कांबळे यांच्यासह पुतळा समितीचे सर्व सदस्य, तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवार, 5 ऑक्टोबर 2025 स्थळ- भगवा चौक, कसबा बावडा