माननीय मुख्यमंत्री साहेब,
🔴जलसंधारण (WCD) आणि जलसंपदा (WRD) विभागात हजारो रिक्त पदांमुळे कामाचा पुरता बोजवारा उडालाय!
विभागात काम करायला पुरेसे मनुष्यबळच शिल्लक नाही. अशा अपुऱ्या मनुष्यबळात तुम्ही शासकीय कामे कशी करणार?
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक आमदार-मंत्र्यांचे उंबरठे झिजवले, पण फक्त आश्वासनांचा पाऊस!
'दुष्काळात १३वा महिना' तर झालाच आहे, आता १४वा महिना तरी करू नका! तातडीने मेगाभरती जाहीर करावी. 🙏
✅️अपेक्षा विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची...
MPSC आयोगाचे अध्यक्षपद म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आणि संवैधानिक पद आहे, या पदावर बसणाऱ्या व्यक्तीसंदर्भात पुरावे काय तर साधा आरोप सुद्धा झालेला नसावा.
भीमनवार साहेबांच्या कार्यकाळात झालेल्या ऐतिहासिक अशा पेपरफुटीवर विद्यार्थी राजीनामा मागत असताना नैतिकता दाखवत त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित आहे, पण दुर्दैवाने ती नैतिकता त्यांच्याकडे दिसत नाही.
पुरावे दिले तर क्षणाचाही विलंब न करता राजीनामा देईल, असे भीमनवार साहेब म्हणाले होते. परिवहन आयुक्त असताना भीमनवार साहेबांनी कशाप्रकारे भ्रष्टाचार केला यासंदर्भात त्यांच्याच विभागातील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारी आणि पुरावे बघा.
हा फक्त ट्रेलर आहे, पूर्ण पिक्चर लवकरच दाखवतो.. बदल्या, पदोन्नती, ओव्हरलोड गाड्यांच्या लिस्ट, वरळी वाहनखरेदी प्रकरणी लाचलुचपत विभागाने केलेली चौकशी......
आणखी खूप काही आहे.
#MPSC_आक्रोश_मोर्चा #MPSC #पेपरफुटी
देशात पेपरफुटी आणि परीक्षेतील गोंधळाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असून देशभरात सरकारच्या कारभाराविरोधात मोर्चे निघत आहेत. आज पुण्यात हजारो विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेत. विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता #MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा. तसेच सरकारने त्यांचा आवाज ऐकून प्रश्न सोडवावेत, त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय द्यावा !
@CMOMaharashtra
#ChhatronKiGunj #MPSC #आक्रोशमोर्चा #पुणे
एकदा तुकाराम मुंढे साहेबांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष करा..... विद्यार्थ्यांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची गरज पडणार नाही.
@Tukaram_IndIAS@Dev_Fadnavis
एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटी आणि सातत्याने होणाऱ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. उद्या आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली.
उद्याच्या मोर्चाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत आहोत. स्थानिक शिवसेना आणि युवासेना उद्या मोर्च्यात सहभागी होणार आहे.
पेपरफुटीच्या घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अन्याय होत आहे. ही केवळ एका परीक्षेची समस्या नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.
#pune#आंदोलन#पेपरफुटी#justiceforengineer#transperancy
आक्रोश मोर्चासाठी #MPSC चे विद्यार्थी पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात जमले आहेत.. याचवेळी काहीसा पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आलाय, मात्र विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील उज्ज्वल भविष्याचं छत्र हिरावण्याचा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा प्रयत्न असून तो हाणून पाडण्यासाठीचा आमचा हा लढा आहे. त्यामुळं पाऊस आला तरी हा आक्रोश मोर्चा विराट होणार.. मीही त्यासाठी पुढच्या काही मिनिटातच पोचतोय.. हा मोर्चा संविधानिक मार्गाने झाला पाहिजे यासाठी आमचं पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य असेल आणि पोलिसांचंही असंच सहकार्य राहील, ही अपेक्षा!
#लढू_आणि_जिंकू
#आता_नाही_तर_कधीच_नाही
The anger of Maharashtra’s students is not about one exam or one recruitment drive. It is about a system that has completely lost their trust.
From MPSC to PMC and MMRDA, repeated questions over exams, results, normalization and recruitment processes are putting the future of thousands of aspirants at stake. Instead of silencing students, the BJP government must ensure independent investigations, transparency and immediate justice. You can suppress a voice for a while. You cannot suppress an entire generation.
Until justice is delivered, the #ChhatronKiGoonj will only grow louder across Maharashtra.
@sirivellaprasad@INCHarshsapkal@INCMaharashtra
#StudentJustice #RojgarNyay #MPSC
इसी ज्वलंत मुद्दे पर एमपीएससी के छात्रों, शिक्षकों और आम नागरिकों का कल (सोमवार, ता. ७) पुणे में एक विशाल 'आक्रोश मोर्चा' आयोजित किया है। इस मोर्चे को अपना समर्थन देने और इस विषय को राष्ट्रीय स्तर पर उठाने के लिए आपका बहुत-बहुत धन्यवाद!
भरोसा खो चुकी इसी भ्रष्ट व्यवस्था (सिस्टम) के खिलाफ हम भी पिछले कई दिनों से छात्रों के साथ मिलकर लड़ रहे हैं। आपके इस समर्थन से छात्रों के इस संघर्ष को निश्चित रूप से और अधिक ताकद मिलेगी..!
#लडेंगे_और_जितेंगे
कनिष्ठ अभियंता पदभरतीतील गैरप्रकाराविरोधात विद्यार्थ्यांचे पुणे महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलन; शिवसेनेचा आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा..!!
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराच्या विरोधात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परीक्षा देणारे विद्यार्थी आज पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर समोर आंदोलन केले. गुणवत्तेच्या आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांनीच भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे पुरावे पुणे महानगरपालिका प्रशासनासमोर मांडले. या पुराव्यांच्या आधारे पुणे महानगरपालिकेने तीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर केवळ तीनच विद्यार्थी दोषी असल्याचे प्रशासन कोणत्या अधिकृत तपासाच्या आधारे सांगत आहे, हा गंभीर प्रश्न आहे.
एकीकडे गैरप्रकाराचे पुरावे समोर येऊन गुन्हे दाखल झाले असताना दुसरीकडे उर्वरित परीक्षार्थींना सेवेत रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. प्रश्नपत्रिका नेमकी किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली किंवा किती जणांना त्याचा फायदा झाला नाही, याबाबत पुणे महानगरपालिकेकडे अधिकृत आणि अंतिम स्वरूपाचा स्पष्ट निष्कर्ष नसताना संपूर्ण भरती प्रक्रिया पुढे रेटली जात असेल, तर या भरतीची पारदर्शकता आणि विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात येते. प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरचा वाटोळा करण्याचा अधिकार पुणे महानगरपालिका प्रशासनाला नाही.
या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेने यापूर्वीच आवाज उठवला असून, या संपूर्ण प्रकरणाची माहिती माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनाही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा असून, कनिष्ठ अभियंता पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घेण्यात यावी, ही शिवसेनेची स्पष्ट मागणी आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या हक्कासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असून, प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास अधिक तीव्र अंदोलन करू.
@PMCPune@navalMH
#punecity #shivsena #PMC #students #peparleak
परीक्षा तुमची,यंत्रणा तुमची,सुरक्षा तुमची आणि देखरेखही तुमची—मग PMC JE भरतीतील गैरप्रकाराची जबाबदारी कोणाची?
विद्यार्थी आज PMCसमोर आंदोलनाला बसले आहेत.तरीही प्रशासनाची शांतता संतापजनक आहे
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याची किंमत प्रशासनालाही मोजावी लागेल
@navalMH@prajytnair
फसवणुकीने भरलेली #PMC_JE_Scam परीक्षा रद्द करण्यात यावी.
भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि जनतेचा विश्वास अबाधित राखण्यासाठी, ही परीक्षा रद्द करून पारदर्शक पद्धतीने नव्याने आणि निष्पक्ष परीक्षा घेणे अत्यंत आवश्यक आहे.
_ @Dhananjay4INC@INCMaharashtra@INCHarshsapkal
लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावून PMC JE चा पेपर फोडणारे खरे सूत्रधार अजूनही मोकाट का?
४-५ जणांवर कारवाई करून मूळ प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांचा हा रोष आता शांत बसणार नाही, मुख्य आरोपींना तात्काळ अटक करा!
#PMCJE#PaperLeakScam@Dev_Fadnavis@PMCPune
🚨 #PMCJE : PMC, हा अहवालाचा आधार आहे की पुरावे झाकण्याचा खेळ?
PMC ने "IBPS/TCS अहवालाच्या नावाखाली ३ उमेदवारांची उमेदवारी रद्द करून FIR दाखल केली. पण अहवालच सांगतो👇
❌ "Analytical Flag = गैरप्रकार सिद्ध नाही"
❌ CCTV = फक्त "Further Investigation Indicator"
❌ गैरप्रकाराची पद्धत "सिद्ध नाही"
❌ स्पष्टीकरणाची संधी न देता कारवाई "नको"
मग PMC ने नेमका कोणता पुरावा पाहून शिक्षा सुनावली? PMC, आता एकच करा : पूर्ण अहवाल बाहेर काढा. मूळ CCTV बाहेर काढा. Audit Logs बाहेर काढा. स्वतंत्र Technical Audit करा. नाहीतर आमचा सरळ सवाल राहील, अहवालाचा आधार घेतला की अहवालातील सोयीचे भाग वापरून सत्य दडपले?
हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा खेळ आहे. हिशोब द्यावाच लागेल!
@INCMaharashtra@PMCPune@prajytnair
#PMCJE #JusticeForPMCJE #ExamTransparency
🔴आधी अभ्यासासाठी लढा,
🔴मग जाहिरात आणि परीक्षेसाठी आंदोलन करा... आणि
🔴शेवटी पेपर फुटल्यावर पुराव्यांसाठी रस्त्यावर उतरा!"
हीच का आज महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची दशा? गैरप्रकार सिद्ध होऊनही PMC, MMRDA परीक्षांवर कारवाई का नाही?
माननीय मुख्यमंत्री महोदय @CMOMaharashtra, नेमकं सांगा तरी यावर आम्ही दाद मागण्यासाठी कोणाकडे बोलायचं? विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या यंत्रणेला जबाबदार कोण?महोदय, आता तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या...🙏
हायटेक कॉपी उघड,3 उमेदवार आणि परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांविरोधात FIRतरीही भरती स्वच्छ असल्याचा दावा आणि नियुक्त्यांची घाई!
आज पुन्हा विद्यार्थी PMCसमोर न्यायासाठी बसले आहेत.प्रश्न विचारणाऱ्यांनाच रस्त्यावर बसावं लागतंय. स्वतंत्र चौकशी करा,तोपर्यंत नियुक्त्या थांबवा! @navalMH