हिंदूंच्या 'कृष्णजन्माष्टमी' निमित्त साजरा होणाऱ्या 'दहिहंडी' या मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला गेला होता तेव्हा एक 'राज'गर्जना झाली... मराठी मनगटं एकवटली, निकराने लढली आणि महाराष्ट्राचा 'दहीहंडी' सण टिकला...!
#हिंदूजनांसाठी#मराठीमनांसाठी#दहीहंडी#राजठाकरे#महाराष्ट्रधर्म
राज्यात ३ आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे I.N.D.I.Aआघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत.
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही.
सत्तापिपासू नेत्यांच्या या भाऊगर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा एकच पक्ष आहे आणि मी अशा मनसे पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान आहे.
अमेय खोपकर
सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना
महामार्गाच्या कामाला गती मनसेमुळे आली हे सर्व कोकणी जनतेला जनतेला चांगलंच ठाऊक आहे. केंद्रात, राज्यात अनेक वेळा सत्तेत असून १७वर्षे महामार्ग रखडवून, निष्क्रिय राज्यकर्त्यांनी व पक्षांने मी मुंबई गोवा महामार्ग बोलतोय च्या नावाखाली स्वतःची कातडी वाचवू नये..
#कोकण_जागरयात्रा#कोकण
दुसऱ्यांचे पक्ष फोडता ते स्वतःच्या स्वार्थासाठी आणि महाराष्ट्र सैनिक दगड फेकतो ते जनतेच्या हक्कासाठी तेव्हा अचानक १७ वर्षांनी कोकणी असल्याचा साक्षात्कार झालेल्यानी, महाराष्ट्र सैनिकांना दगड फेकण्याबद्दल उपदेश करू नये
@BJP4Maharashtra@mnsadhikrut@SandeepDadarMNS@ManojBChavan5
कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती 'जैसे थे' आहे. आणि हेच दुर्दैव आहे.
ह्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्रसरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं. मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल.
पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल.
#मणिपुर
#Manipur @PMOIndia@HMOIndia
३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर जाऊन मी माझं कुटुंब आणि माझ्या सहकाऱ्यांनी महाराजांना अभिवादन केलं.
महाराजांच्या ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तेंव्हा शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टी आणली होती. तेंव्हा मी स्वर्गीय बाळासाहेबांसोबत जवळ जवळ रोज जायचो. त्यावेळेला संध्याकाळी रोज ७ वाजता शिवराज्याभिषेक सोहळा व्हायचा. तो मी दररोज बघायचो आणि तो मला तोंडपाठ झाला होता. तो क्षण होता की छत्रपती शिवाजी महाराज ह्या नावाने माझं आयुष्य व्यापलं, भारावलं, जे अजून ही तसंच आहे आणि आयुष्यभर हे मंतरलेपण राहील.
मी अनेकदा रायगडावर गेलो आहे. प्रत्येकवेळी तिथे एक वेगळीच ऊर्जा जाणवते. पण आज जे मी अनुभवलं, ते विलक्षण होतं.
मी नेहमी म्हणतो शिवचरित्र वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे हा सामान्यांनी घडविलेला असामान्य इतिहास आहे. मी काल म्हणलं तसं ते एक युगप्रवर्तनच होतं. आणि शिवराज्याभिषेक हा त्या युगप्रवर्तनातील अतिशय महत्वाचा टप्पा होता. ह्या हिंद भूमीच्या स्वाभिमानासाठी, स्वत्वासाठी या रयतेच्या राजाला राजसिंहासनाची, राज्याभिषेकाची नितांत गरज होती... हा सुवर्णक्षण पुढची अगणित वर्ष ह्या हिंद भूमीला प्रेरणा देत राहील इतकी ताकद ह्या घटनेत आहे.
तेव्हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष मनामनात घुमू दे आणि त्यांचे विचार आपल्या मराठी जनांच्या धमण्यामंधून वाहू देत, हीच इच्छा आणि हीच आजच्या दिवशी शिवचरणी प्रार्थना.
#शिवराज्याभिषेक_पर्व #रयतेचाराजा #छत्रपतीशिवाजीमहाराज #हिंदवीस्वराज्य #350thShivrajyabhishekDin #CoronationDay
सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून शुभेच्छा.
३५० वर्षांपूर्वी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला तो काही साधासुधा राज्याभिषेक नव्हता. मध्ययुगातील इस्लाम आक्रमकांच्या काळात स्वतःच सार्वभौम राज्य असावं असं स्वप्न सुद्धा ह्या देशात जेंव्हा पडत नव्हतं तेंव्हा एका राजाने स्वराज्याची निर्मिती करून एका नव्या युगाची सुरुवात झाल्याची नांदीच दिली होती. त्यानंतर पार अटकेपार गेलेल्या मऱ्हाठा साम्रज्याची प्रेरणा असो की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा हे महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्यच होती ह्यात शंका नाही. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात पण खरंतर हीच प्रेरणा असायला हवी होती, ती किती आहे हे आपण बघतच आहोत. असो.
तर मी आणि माझे सहकारी उद्या सूर्योदयाच्या आसपास महाराजांना रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करणार आहोतच, पण माझी एक तीव्र इच्छा आहे.
ती म्हणजे हा सोहळा आणि त्याचा इतिहास, त्याचं महत्व आपण मराठी जनांनी जगाला ओरडून सांगायला हवं. आणि तेवढ्यावर न थांबता जातीपातीच्या पलीकडे जाऊन महाराजांच्या काळातील महाराष्ट्राचं गतवैभव परत आणण्यासाठी एकत्र यायला हवं, झटायला हवं. अन्यथा हा सोहळा फक्त एक उपचार होईल, उत्सव होईल !
बाबासाहेब पुरंदरेंचं एक खूप छान वाक्य आहे, परदेशात त्यांच्या महापुरुषांचे पुतळे उठसुठ बघायला मिळत नाहीत कारण ते महापुरुष, त्यांचे विचार, त्यांच्या रक्तात सामील झालेले असतात. आपल्याकडे महापुरुष, त्यांचे विचार आपल्या धमण्यामंध्ये सळसळत नाहीत म्हणून आपल्याला जागोजागी पुतळ्यांची गरज लागते.
हे चित्र बदलण्यासाठी, प्रत्येकाच्या मनात, रक्तात शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार सामील झाले तरच महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल. ह्यासाठी मराठी जनांनी निर्धार करायला हवा, शपथ घ्यायला हवी आणि त्यासाठी राज्याभिषेक सोहळ्यापेक्षा उत्तम क्षण अजून कुठला असणार?
माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा. उद्या रायगडावर भेटूच.
आपला
राज ठाकरे
आई एकविरेच्या कृपेने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यामध्ये माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या समक्ष काल मनसेचे नवीन पक्षगीत लोकार्पित झाले. ह्याआधी मनसे साठी मी केलेल्या ‘तुमच्या राजाला साथ द्या..‘ ह्या गीताला लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले! परंतु, ह्यावेळेस मात्र माझी भूमिका केवळ गायकापुरतीच मर्यादित आहे. ह्या सुंदर गीताचे शब्द लिहिले आहेत माझा कविमित्र मंदार चोळकर ह्याने, तर हे संगीतबद्ध केले आहे नवोदित गुणी संगीतकार हितेश मोडक ह्याने. हे गीत गाण्याची संधी मला दिल्याबद्दल माननीय श्री अमेयजी खोपकर ह्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे ह्या गीताचे उत्कृष्ट संकलन आणि निर्मिती केल्याबद्दल त्यांचे चिरंजीव कु. ईशान खोपकर ह्यांचे देखील खूप खूप कौतुक करतो! जय महाराष्ट्र!! @RajThackeray@MNSAmeyaKhopkar #ishankhopkar @mnsadhikrut #hiteshmodak @ManndarCholkar