रत्नागिरी येथील निवडणूक प्रचार सभेत शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या भाषणात संघटनेने २२ ऑक्टोबर २०२४ रोजी मातोश्रीवर झालेल्या भेटीमध्ये मागणी केल्याप्रमाणे बारसु रिफायनरी रद्द करण्याचे जाहीर वचन दिले.
बारसु - सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेसाठी
स्वप्नील सोगम, गोपीनाथ घाडी, तुळशीदास नवाळे, महेंद्र गुरव, अमित नेवरेकर, मार्गदर्शक सत्यजीत चव्हाण आणि नाणारचे माजी सरपंच ओमकार देसाई, पाळेकर वाडी(नाणार) चे प्रमुख सत्यवान पाळेकर व धनाजी वालम व माडबनचे राकेश वाघधरे उपस्थित होते.
आमदार राजन साळवी यांना पूर्वी केलेल्या रिफायनरी समर्थनाबद्दल जाब विचारण्यात आला. आमदार राजन साळवी यांनी माझी यापुढे रिफायनरी विरोधी भूमिका कायम राहील व पक्षाने जरी भूमिका बदलली तरी मी रिफायनरी विरोधी भूमिका शेवटपर्यंत बदलणार नाही, असे वचन दिले.
यावेळी शिवसेना पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर , सचिव व माजी खासदार विनायकजी राऊत , आमदार राजनजी साळवी , राजापूर तालुका संपर्क प्रमुख अनिल भुवड तसेच संघटनेतर्फे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर, सरचिटणीस नरेंद्र जोशी, आदेश भोवड, सूर्यकांत सोडये, विनायक शिंदे, संतोष तिरलोटकर,
आज दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. यावेळी संघटनेतर्फे पक्षाकडून रिफायनरी विरोधी भूमिकेच्या ठामपणाबद्दल अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच पुर्वी झालेल्या घटनांचा उहापोह करण्यात आला.
मा.उद्धव साहेबांनी रिफायनरी विरोधात पक्षाची
भूमिका आजही ठामच असल्याचे व पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात रिफायनरी विरोधाचा मुद्दा घेणार असल्याचे सांगितले.
पाहिजे तर माझ्यासोबत फोटो काढून बॅनरवर माझे वचन छापा' असेही त्यांनी सांगितले.
४)बैठकीत निवडणुका जवळ आल्याने त्या दृष्टीने काय स्ट्रॅटेजी करता येईल याबद्दल चर्चा झाली.
५)वारेशी साहेब यांच्या केसेस बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली.
*बारसु- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेसाठी*
*अध्यक्ष ( मुंबई) - वैभव कोळवणकर**
*सरचिटणीस- नरेंद्र जोशी*
दिनांक *१८ऑगस्ट२०२४* रोजी बारसु सोलगाव पंचक्रोशी *रिफायनरी विरोधी संघटनेच्या *मुंबई पदाधिकारी व मार्गदर्शक* याची सभा *मुंबई विरार* येथे पार पडली.
१)९ जुलै २०२४ *धरणे आंदोलनचा* *जमा आणि खर्च* सर्वानसमोर दाखवण्यात आला.
२)रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी,आणि प्रशासकीय प्रतिनिधी सोबत झालेल्या बैठक संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली .
३)बारसु रिफायनरी विरोधाचा लढा यापुढे एकजुटीने, एकमेकांवर विश्वास ठेवून, संवादात राहून, व्यापक करून यशस्वी करायचे ठरले.
बारसु रिफायनरी विरोधी संघटनेतर्फे आझाद मैदान येथे एक दिवशीय धरणं आंदोलना दरम्यान मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यांनी याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
#रिफायनरी_हटवा_कोकण_वाचवा@Vinayakrauts@MeNarayanRane@samant_uday
बारसु रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प रद्द झालाच पाहिजे!
मोर्चा आणि धरणे आंदोलन
आझाद मैदान - ९ जुलै २०२४
बारसु-रिफायनरी पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना
त्यांना शिंगावर घेण्याची तयारी ग्रामस्थांची असल्याचे ठामपणे सांगण्यात आले.
रिफायनरी रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.
बारसु - सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेसाठी
श्री.अमोल रमेश बोळे
(अध्यक्ष-ग्रामीण)
श्री. वैभव विनोद कोळवणकर
(अध्यक्ष-मुंबई)
आज बारसु-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची बैठक विरार येथे झाली.
लोकसभा निवडणुकीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर रिफायनरी विरोधी आंदोलनाची पुढची दिशा कशी असावी यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
जर कुणी रिफायनरी जबरदस्तीने राबवू असे म्हणत असेल तर,
समस्त कुणबी समाज बांधव व भगिनींना कळकळीचे आवाहन
बारसु- सोलगाव पंचक्रोशीतील बहुसंख्य कुणबी समाजाच्या माय-भगिनींवर व बंधूंवर अमानुष लाठीमार, अश्रूधुर व तुरुंगात डांबून ठेवणे असे अत्याचार करणाऱ्या भाजपा पक्षाच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत त्यांची लायकी दाखवून द्या.