मुंबईत आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांना जर पाणी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसतील, तर मग मराठा मंत्री व लोकप्रतिनिधी काय कामाचे? त्यांनी स्वतःची शासकीय घरे आणि आमदार निवास जनतेसाठी खुली करून लोकहिताचा खरा आदर्श दाखवावा!
- महेश पाटील -बेनाडीकर
30.08.2025
#MarathaReservation
मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणाचा एकच पर्याय आहे, तो म्हणजे छ. राजर्षी शाहूनीं देशातील पहिले आरक्षण देताना, इतर जातींबरोबरच मराठा जातीलाही मागास ठरवून १९०२ साली दिलेले मागास आरक्षण.
हेच खरं ऐतिहासिक आणि न्याय्य आधार!
आणि याच धर्तीवर न्यायिक लढा घ्यावा लागेल.
#MarathaReservation
आज मुद्रांक शुल्क विभागाचा पेपर होता, 11.30 वेळ होती पण 1 वाजले तरी विद्यार्थी आत घेतले नव्हते त्यांना असा बाहेर बसवला होता. फडणवीस साहेब आमच्याकडून 1000 रुपये घेतात आणि असले बोगस सेंटर आम्हाला देतात. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. त्यात हे खाजगी सेंटर वाले मॅनेज होतात आणि आमच्या भविष्याची पार वाट लागते. तुम्ही म्हंटले होते सर्व परीक्षा ह्या @mpsc_office
कडे देण्यात येतील पण कधी देणार आहात. तुमचा इलेक्शन च फंड जमा झाल्यावरच देणार आहात का अशी शंका आता विद्यार्थ्यांना येत आहे. परीक्षा ह्या अधिकृत @TCS च्या सेंटर वरच घ्या ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Devendra_Office@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@AUThackeray@Awhadspeaks@INCHarshsapkal@MeghnaBordikar
EXAM सेंटर -
Center Code: 18009
Examination Venue: R R Info, 2nd Floor, L N College, near Borivali Station Platform No. 1.
Address: Plot No. 89, near General Karripada Bridge, Rajendranagar, Borivali East, Mumbai 400066.
सरकारने १ली ते ४थीपर्यंतची हिंदी सक्ती मागे घेतलेली स्वागतार्ह बाब असली, तरी केवळ एवढ्यावर समाधान मानता येणार नाही. या निर्णयासोबतच सरकारने स्थापन केलेली तथाकथित त्रिभाषा धोरण समितीही तातडीने बरखास्त केली पाहिजे. अन्यथा सरकारच्या हेतूंवर विश्वास ठेवणे कठीण आहे.
#NEP#Marathi 🚩
भाजपला वाटू लागलंय की राज्यात ते हिंदी भाषिक परप्रांतीयांच्या पाठिंब्यावरच सत्तेत आले आहेत आणि पुढेही टिकून राहतील.
त्यामुळे #मराठी जनतेच्या भावना,संस्कृती यांच्याशी देणंघेणं उरलेलं नाही. म्हणूनच ते मराठी विरोधी पावलं उचलत आहेत.
आता वेळ आली आहे अशांना त्यांची जागा दाखविण्याची!