नगरपरिषद भरती 2023
निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना 'Opting Out' पर्याय देण्याची काळाची गरज
अनेक उमेदवार राज्यसेवा आणि इतर मोठ्या पदांवर निवडले गेलेत त्यामुळे प्रतीक्षा यादीची प्रतीक्षा करण्यापेक्षा हा पर्याय सर्वांच्या हिताचा राहील
विचार करा
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
सरळसेवा भरती 2023-24
परीक्षा आचारसंहिता कालावधीत देखील होऊ शकतात.
गरज ईच्छाशक्तीची!
प्रत्येक विभागाने निवडणुक आयोगाकडे त्यासाठी तातडीने मार्गदर्शन मागवून परीक्षा घेऊन बेरोजगारांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
सरळसेवा भरती मधुन हजारो जागांचे निकाल लागलेत. अनेक उमेदवारांची एकापेक्षा अनेक पदांवर निवड झाली आहे तर काही उमेदवारांना आधीच #MPSC मधुन पोस्ट मिळालेल्या असताना कागदपत्र पडताळणीला न जाण्यासाठी पैशांची मागणी करण्याचे घाणेरडे प्रकार सुरू आहेत.
असली बोगस लोकं जनतेची काय सेवा करणार?
सरळसेवा भरती २०२३ मध्ये कॉपी करून बोगस गुण मिळवणाऱ्या लबाडांनी चांगल्या उमेदवारांच्या जागा खाल्ल्या.
तर दुसरीकडे
बोगस क्रीडा, अपंग, अनाथ, प्रकल्पग्रस्त जमात खऱ्या उमेदवारांवर अन्याय करणाऱ्या उमेदवारांची या प्रवर्गातून निवड झाली त्यांची सखोल चौकशी झालीच पाहिजे.
@CMOMaharashtra
आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर - आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत .
पुणे: आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु असून, ही भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी
@MahaHealthIEC @TanajiSawant4MH @DrKalmurge @suvishelke साहेब सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व पदाचे निकाल लागले परंतुMPWपदाचे अजूनही निकाल लागला नसून २२/०२/२०२४रोजी Document verification ठेवले आहेत विद्यार्थी चिंतेत आहेत कुठेच माहिती मिळत नाही त्याबद्दल लवकर निकाल लावावं विनंती
@MahaHealthIEC @TanajiSawant4MH @DrKalmurge @suvishelke साहेब सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व पदाचे निकाल लागले परंतुMPWपदाचे अजूनही निकाल लागला नसून २२/०२/२०२४रोजी Document verification ठेवले आहेत विद्यार्थी चिंतेत आहेत कुठेच माहिती मिळत नाही त्याबद्दल लवकर निकाल लावावं विनंती
सरकार दरबारी सरकारी नोकरीतील निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याच्या हालचालींना वेग
एकीकडे रिक्त जागा भरायच्या नाहीत तर दुसरीकडे निवृत्ती वय वाढवायचे
बेरोजगार तरुणांना व्यवस्थेचा भाग बनून द्यायचे नाही म्हणुन हा डाव आहे काय?
कोणत्याही परिस्थितीत या निर्णयाचा जाहीर विरोध आणि निषेध!
जिल्हा परिषद भरती २०२३
निकाल जाहीर करून तातडीने नियुक्त्या द्यायचा मुद्दा जवळपास निकालात निघालाय
राहिलेले निकाल पुढील चार पाच दिवसात जाहीर होतील
फक्तं राहिलेल्या परीक्षांबाबत अजून कोणतीही हालचाल नसल्याचं दिसतंय...
पूर्वी सरकारी नोकरीसाठी हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी करून अभ्यास करावा लागायचा तेव्हा कुठे एखादी नोकरी मिळायची,
अलीकडच्या काळात तुमच्याकडे एखादे संगणक केंद्र / संगणक केंद्रावाला नातेवाईक / त्याचा नातेवाईक तुमचा मित्र असला तरी नोकरी मिळून जाते...
तलाठी भरतीचा कॉपीयुक्त खेळ!
नगरपरिषद भरती २०२३
जागा वाढ करण्याबाबत कोणतीही हालचाल नाही आचारसंहिता जवळ येत चालली आहे.
याच वेगाने प्रकिया सुरू राहिल्यास भरती अडकणार.
कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना आचारसंहितेपूर्वी नियुक्त्या मिळून भरती पूर्ण व्हायला हवी.
'ना घर का ना घाट का' अवस्था नको!
@CMOMaharashtra
वनरक्षक भरती २०२३
ठाणे वन वृत्तातील पात्र पुरुष उमेदवारांच्या यादीत कागदपत्र पडताळणी आणि शारीरीक चाचणीत कोणताही तांत्रिक / शारीरीक अडथळा नसणाऱ्या उमेदवारांचा समावेश यादीत नाही.
२० तारखेला शारीरीक चाचणी
उमेदवारांच्या तक्रारी ऐकण्याची कोणालाही गरज वाटत नाही काय?
@SMungantiwar
राज्य उत्पादन शुल्क सरळसेवा भरती २०२३
तातडीने फायनल रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात यावी.
जेणेकरून निकाल आणि शारीरीक चाचणी आचारसंहितेत अडकणार नाही.
राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी याबाबतीत स्वतः वयक्तिक लक्ष घालून भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
@shambhurajdesai लक्ष घालावे..