संतोष पंडित नशीबवान आहे. 💯
टीका आणि टिप्पणी आम्हीही केली आहे. मात्र, तेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पोलिसांना फोन करून, एकाच गुन्ह्यासाठी २२ वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवायला सांगत असे आणि तसे व्हायचेही.
माझ्यावर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत ७ गुन्हे आणि १६ (NC) नोंदवले गेले होते. नाशिकमधून जामीन मिळाला की तुरुं���ाबाहेर पुणे पोलिस तयार असायचे. तिथून आठ दिवसांत जामीन घेतला की मुंबई पोलिस तयार असायचे; आणि तिकडून जामीन घेतला की ठाणे पोलिस तयार असायचे. मी गुन्हा केला आहे असे गृहीत धरले, तरी एकाच गुन्ह्यासाठी एकाच ठिकाणी शिक्षा असायला हवी ना? मात्र, तसे नव्हते. ते तुमच्यावर ७ काय, अगदी ७० ठिकाणी गुन्हे दाखल करून तुम्हाला 'महाराष्ट्र वारी' घडवण्याचे कृ��्य करत. एवढ्यावरच त्यांचे पोट भरत नव्हते, तर तुमची नोकरी आणि शिक्षण थांबवण्यासाठीही पूर्ण प्रयत्न केले जात.
विशेष म्हणजे, संतोष पंडितवर एका महिलेने गुन्हा दाखल केला आहे, सरकारने नाही. आमच्यावरील गुन्हे सरकारने दाखल केले होते हे मिडियात सांगितलं असत मात्र तेव्हा पत्रकार देखील तुरुंगातच होते की बरोबर ना @RahulAsks दादा. पंडितने आतापर्यंत अनेक खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित केले आहेत. दुसऱ्याला वाहतुकीचे नियम शिकवताना स्वतः मात्र विनाहेल्मेट असतो, हे कोणी दाखवून दिले की लगेच त्याची 'अभिव्यक्ती' धोक्यात येते. अटक होत असताना स्वतःच्या आईला शिव्या देत आपल्याच कानाखाली मारून घेत असलेले दृश्य पाहता बाहेर येताच आपण मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून घ्यावे.
सरकारने ठरवले तर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे १७ मार्ग असतात; मग सरकार कोणतेही असो. त्यांनी ठरवले तर विषय संपला! तुमच्या समर्थनार्थ १ मिलियन पोस्ट झाल्या आहेत की हजार लोकांचा मोर्चा निघाला आहे, याने काही फरक पडत नसतो. कालांतराने सगळे विसरून जातात.
सुप्रियाताई आणि जितेंद्र आव्हाड हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेले पाहून मला एक जुनी घटना आठवली. फक्त एक कविता कॉपी-पेस्ट केली म्हणून पोलिसांच्या ग��ाड्यात घुसून एका महिलेच्या कपड्यांपर्यंत हात घालण्यात आला होता, ते दृश्य आठवले. मंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली जायची आणि त्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टात जावे लागत असे. कधी कार्टून शेअर केले म्हणून माजी नौदल अधिकाऱ्याचे डोळे फोडले जात होते, तर नेत्याच्या मुलाचा 'पेंग्विन' म्हणून उल्लेख केला म्हणून २�� दिवस तुरुंगात डांबले जात होते. उदाहरणे एवढी आहेत की विचारता सोय नाही!
सध्या इन्स्टाग्रामवर कार्यरत असलेल्या समाजसेवक कंटेंट क्रिएटर मित्रांनो, बरे झाले तुम्ही तुमचे काम आता सुरू केले. जर तेव्हा केले असते, तर वरील घटनांमध्ये तुमचे नाव अग्रस्थानी असते (किंवा कदाचित तेव्हा तुम्ही हे समाजकार्य तात्पुरते थांबवले असते). मी लोकशाही जवळून अनुभवली आहे, म्हणून हे खात्रीने सांगू शकतो...