@Garjana206 महामंडळाची वाट राजकारण्यांनी लावली. उत्तम खोब्रागडे यांनी एस्टी तोट्यातून फायद्यात आणायचा प्रयत्न केल्यावर त्यांची बदली केली गेली. माझ्या घरातली आज ३ री पिढी ST मध्ये आहे
चैत्यभूमीचे नाव दादर स्टेशनला देण्यावरून सुजात आंबेडकरांनी मांडलेली भूमिका:
नावाच्या आणि प्रत्येकाच्या राजकारणात मी कधीही अडकत नाही. माझा त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे की, साहिल वाकोडे यांना न्याय कधी मिळणार? जे आरक्षण आज पब्लिक सेक्टरमध्ये कमी होत चालले आहे, ते कधी थांबणार आहे? एससी-एसटीचा जो निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जात आहे, तो कधी थांबणार? यूजीसीच्या माध्यमातून बंद झालेली स्कॉलरशिप कधी सुरू होणार? दलित, आदिवासी आणि बहुजनांवर मोठ्या प्रमाणात होणारे अन्याय-अत्याचार कधी थांबणार? समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला जातीयवाद कधी थांबणार?
तुम्ही एखाद्या स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले, पण त्याने लोकांचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. प्रत्येकाच्या राजकारणात अडकू नका. बदलाच्या आणि मुद्द्यांच्या राजकारणावर आपण ठाम राहू आणि एक इम्पॅक्ट घडवू, हेच माझे जनतेला सांगणे आहे.
मनसे आणि शिवसेनेने चैत्यभूमीचे नाव दादर स्टेशनला देण्यास विरोध केला आहे. यामधील गंभीर गोष्ट समजून घेतली पाहिजे. मुंबईतील लोकांना विचारले तर ते सांगतील की, ६ डिसेंबर रोजी भारतभरातून मोठ्या प्रमाणात लोक दादर येथे चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. तेव्हा उच्चवर्णीय श्रीमंत लोक दादर आणि शिवाजी पार्कजवळील स्वतःची घरे रिकामी ठेवून बाहेर जातात. हा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. या जातीवादी लोकांनी चैत्यभूमीचे नाव देण्यास विरोध केला आहे. पण दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांचे नाव घेऊन हे राजकारण करतात.
#चैत्यभूमी #Dadar
Microsoft outlook ची सेवा ठप्प झाली तर इथल सगळं कॉर्पोरेटचं काम तुंबलय इतक तर आमच परावलंबित्व ।
आणि इकडे चिन्मय तन्मय आमच्याकडे पुष्पक विमान टेक्नॉलॉजी होती म्हणून आभाळ हेपलतात ।