१.जलसंपदा विभाग Revenue Generating नव्हे तर Revenue Enabling आहे.
२.महामंडळाला स्वायत्व करून तुम्ही शेतकऱ्यांना पाणी पट्टी वसुलीचा प्रमुख घटक करून त्यावर संपूर्ण विभागाचे ओझे टाकणार आहात का? ३. भरती परीक्षांना पण आळा बसेल त्याचे काय? @RVikhePatil@girishdmahajan@Dev_Fadnavis
मा. अभिनव गोयल,
आयुक्त,
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका,
कल्याण (पश्चिम) – ४२१ ३०१.
कनिष्ठ स्थापत्य अभियंता पदांची वाढ व अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा योग्य अंमल करावा ही विनंती.
प्रमुख मागण्या :
१. कनिष्ठ स्थापत्य अभियंता पदांच्या रिक्त जागा तात्काळ व पूर्णपणे भराव्यात.
२. अनुसूचित जमातीसाठी समांतर आरक्षणानुसार आवश्यक त्या ST पदांचा समावेश केला जावा.
३. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खोट्या दाखल्यांवर नियुक्त उमेदवारांची पदे कमी करून, त्या जागांची स्वतंत्रपणे तात्काळ भरती करण्यात यावी.
४. भविष्यात या पदांसाठी नियमित व वार्षिक भरती प्रक्रिया निश्चित करावी, जेणेकरून महानगरपालिकेचे तांत्रिक कामकाज प्रभावीपणे चालू राहील.
५. सदर मागण्यांबाबत १५ दिवसांच्या आत लेखी उत्तर देण्यात यावे, ही नम्र विनंती.
@KDMCOfficial@mieknathshinde@INCHarshsapkal
#PMC JE ची जाहिरात येऊन आता दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे परंतू अद्याप तरी परीक्षेबाबत अजून काही हालचाल नाही तरी सदर परिक्षेचे वेळापत्रक तात्काळ जाहिर करुन पारदर्शकतेसाठी TCS ION च्या अधिकृत परिक्षा केंद्रावर घेण्यासाठी यथोचित कार्यवाही करावी ही विनंती.
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली जलसंपदा कनिष्ठ अभियंता पदभरती ची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी यासाठी मा. खासदार @rajushetti साहेबांनी जलसंपदामंत्री @RVikhePatil साहेब यांना पत्र दिले.
#WRD_JE#WRD_RR
प्रति,
मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब,
मंत्री, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य,
मुंबई.
विषय: जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (JE) सेवा प्रवेश नियमांना मंजुरी देण्याबाबत – तत्काळ कार्यवाही करण्याची विनंती.
महोदय,
सविनय निवेदन करण्यात येते की, जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (JE) पदभरती संदर्भातील सेवा प्रवेश नियमांची (Service Entry Rules) फाईल गेल्या एक महिन्यापासून आपल्या कार्यालयात प्रलंबित आहे. राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या विशेष कार्यक्रमात हे नियम प्राथमिकतेने मंजूर करण्याचे जाहीर आश्वासन देण्यात आले होते.
परंतु, आजतागायत कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे हजारो उमेदवारांची भविष्ये अंधारात टाकली गेली आहेत.
आमच्या प्रमुख मागण्या:
1.जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदासाठीचे सेवा प्रवेश नियम तातडीने मंजूर करावेत.
2.संबंधित भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरू करावी.
3.या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व उत्तरदायित्व पाळले जावे.
आमचे मुद्दे:
•जलसंपदा विभागातील अभियंता पदांची भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहे.
•उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, स्पर्धा परीक्षा व प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ, श्रम व आर्थिक गुंतवणूक केली आहे.
•परंतु शासन निर्णयाच्या विलंबामुळे या सर्व मेहनतीवर पाणी फिरत आहे.
आपल्या विभागाकडून या प्रश्नावर तत्काळ निर्णय घेण्यात यावा, ही विनंती.
आपण लवकरात लवकर कार्यवाही करून उमेदवारांना दिलासा द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
धन्यवाद.
आपली नम्र,
जीनत शबरीन
उपाध्यक्षा – मुंबई प्रदेश युवक काँग्रेस
@CMOMaharashtra@mpsc_office@Mpsc_Andolan@RVikhePatil
एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियमांची फाईल @RVikhePatil साहेब यांच्या कार्यालयात आहे,१५० दिवसांच्या कार्यक्रमात सेवा प्रवेश नियम प्राथमिकता असताना सेवा प्रवेश नियमांना नक्की विरोध कोणाचा आहे? @CMOMaharashtra#WRD_JE_RR
@CMOMaharashtra कडून जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी सेवा प्रवेश नियम बाबत monitering करणे गरजेचे आहे. अनेक दिवसांपासून सेवाप्रवेश नियम प्रलंबित आहेत. नम्र विनंती 🙏
@MahaChiefSec@ssaunik#WRD_RR
सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा बाबत Addl Chief Secretary GAD आणि @CMOMaharashtra कडून मॉनिटरिंग हा निर्णय अतिशय योग्य आहे ,जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्था/वि/यां) सेवा प्रवेश नियम बाबत देखील @CMOMaharashtra ने लक्ष देणे गरजेचे आहे.
#WRD_RR
#PMC_JE जाहिरात येऊन दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे परंतू अद्याप परीक्षेबाबत काही हालचाल नाही तरी सदर परिक्षेचे वेळापत्रक तात्काळ जाहिर करुन #TCS_ION च्या अधिकृत परिक्षा केंद्रावर घेण्यासाठी यथोचित कार्यवाही करावी आणि हजारो उमेदवारांना दिलासा द्यावा,ही विनंती.
माननीय जलसंपदा मंत्री@RVikhePatil यांना भेटून सहकारी विद्यार्थ्यांनी #WRD_JE#WRD_RR बाबत निवेदन दिले,लवकरच साहेब एक वर्षापासून रखडलेली भरती संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन पुढील एक महिन्यात सर्व प्रक्रिया मार्गी लावतील अशी आशा करूयात, वेळ दिल्याबद्दल साहेबांचे आभार #WRD_JE
MIDC ने पदभरती जाहीर करून जवळपास २ वर्ष होत आले तरी परीक्षा दिनांक सुद्धा जाहिर केली नाही. विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तात्काळ परीक्षा TCS Ion केंद्रावर आयोजित करुन उर्वरित सर्व संवर्गाचे वेळापत्रक जाहिर करा! @samant_uday@naikindranil@Dev_Fadnavis@midc_india
आदरणीय जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेब जलसंधारण दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा. जलसंधारण मंत्री म्हणून आत्तापर्यंत फक्तं ६७० अभियंत्यांचीच फक्त भरती केलेली आहे परंतु विभागाची कामे आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे, कृपया जास्तीत जास्त अभियंत्यांची विभागास गरज आहे.
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता( स्था/वि/यां) पदाचे सेवा प्रवेश नियम तत्काळ प्रसिद्ध करून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती 🙏🙏
#WRD_Recruitment@Deepakk75058621@girishdmahajan