एका तक्रारीवर FIR, अटक आणि तत्काळ कारवाई; तर दुसऱ्या तक्रारीवर तासन्तास प्रतीक्षा आणि FIRच नाही!
संतोष पंडित यांच्याविरोधात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. मात्र, इतर तक्रारदारांनी समान स्वरूपाच्या तक्रारी करूनही त्यांच्यावर FIR दाखल होत नाही.
फक्त सरकारच्या गचाळ कारभाराबद्दल बोललं म्हणून कारवाई होते का? गृहमंत्र्याने पोलिसांना हेच काम दिलेलं आहे का?
या फक्त ठिणग्या आहेत लवकरच उद्रेक होणार.
@Dev_Fadnavis गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन एका प्रामाणिक व्यक्तीला ते पद सांभाळायला दे. तुझ्या कार्यकाळात महाराष्ट्र गुन्हेगारी मध्ये भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
काल पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी MPSC पेपरफुटीविरोधात आवाज बुलंद केला आणि आज तोच आक्रोश छत्रपती संभाजीनगरमध्येही पाहायला मिळत आहे.
हा महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न आहे.
विद्यार्थ्यांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढतोय. आता सरकारनेही डोळे उघडण्याची वेळ आली आहे.
पुण्यात सजग नागरिक संतोष पंडित यांना मध्यरात्री ज्या प्रकारे तुरुंगात डांबलं आणि विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला, त्याचा मी तीव्र निषेध करते.
सुज्ञ नागरिकांनी सरकारच्या चुका दाखवल्या तर त्यांच्यावर हल्ले होणार का?
देवेंद्र फडणवीसजी, संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही!
देवेंद्र फडणवीसजी, सत्ताधाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची ही अरेरावी आणि पोलिसांची भूमिका पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. महाराष्ट्राला सांभाळा आणि या गुंडगिरीवर वेळीच चाप लावा!
#DevendraFadnavis #BJP #Congress #SantoshPandit #VidyanandBapat
संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी रात्री 1 वाजता अटक केली.चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, पण खरं कारण तर पंडित सातत्याने जनतेची मूलभूत प्रश्न, समस्या समोर आणून सत्ताधाऱ्यांची वाभाडे काढत असल्यामुळे या सूडबुद्धी सरकारने त्यांना अटक केली. चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर या भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारले म्हणून पुणे पोलिसांनी इतकी तत्परता दाखवली परंतु हीच तत्परता वाढलेली गुन्हेगारी, दहशतीचे वातावरण, कोयता गॅंग यांच्या विरोधात पुणे पोलीस कधी दाखवणार? विरोधी पक्षांच्या तक्रारींची इतक्यात तत्परतेने कधी दखल घेणार?#संतोषपंडित #पुणेपोलीस #चंद्रकांतपाटील #गोपीचंदपडळकर #महाराष्ट्र #PunePolice #PuneCrime
काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध आहे हे कुठल्या मूर्खाने सांगितलं? महिला आरक्षणाचे जनक आम्ही आहोत. RSS महिलेला संघचालक करणार का ?
मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते
@prithvrj
"सगळ्या विषयावर बोलणारी ही तज्ज्ञ मंडळी पेपर फुटीवर अजून एक शब्द बोलले नाहीत. हे परफुटीविरोधात जन आक्रोश मोर्चा कधी काढणार आहेत?#पेपरफुटीविरोधात#जनआक्रोशमोर्चा
या प्रकरणात 4 BLO यांना निलंबित केल्याचं कळतंय… पण फक्त BLO यांना निलंबित करून भागणार नाही, तर त्यांना आदेश देणारे अधिकार कोण आहेत? तेही निलंबित झाले पाहिजेत आणि भाजप कार्यकर्त्यावरही कारवाई झाली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे जागरुक नागरिकांमुळं हा प्रकार उघडकीस आला म्हणून लाजेखातर ही कारवाई केली असेल, पण असे अनेक प्रकार जे उघड झालेले नाहीत त्याचं काय? हाही प्रश्न आहे आणि निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे.
अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणाऱ्या निकृष्ट पोषण आहाराचा भांडाफोड केल्याने इज्जत गेलेल्या सरकारने अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचं आधी निलंबन केलं. आम्ही आवाज उठवल्यानंतर ते मागे घेतलं पण आता त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यास सुरुवात केली. पण ही यंत्रणा त्यांना जेवढा त्रास देईल तेवढे ते उघडे पडत आहेत. मुलांच्या वजनाचे खोटे आकडे भरण्यास सांगणं, अपुरा इंधन पुरवठा अशा अनेक बाबी कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी या मुलाखतीत सांगितल्या. आम्ही रेश्मा पारधी यांच्या पाठीशी ठामपणे आहोत.
माझं सरकारला आवाहन आहे की, रेश्मा पारधी यांना त्रास देण्याऐवजी तुमच्या व्यवस्थेत सुधारणा करा.. कमिशन खाण्याचं बंद करा.. आणि एवढं होऊनसुद्धा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुठं आहेत? त्यांची यावर एका शब्दानेही प्रतिक्रिया का नाही? राज्यात गेल्या तीन वर्षांत ५ वर्षांखालील ४० हजारहून अधिक बालकांचा कुपोषणामुळं मृत्यू झाला. यालाही हेच सरकार जबाबदार नाही का?
@Dev_Fadnavis
https://t.co/O59VAmAVBe