Exploring the world one tweet at a time 🌍 | Passionate about Data, Travel, Coding | Lifelong learner 📚 | Spreading positivity and good vibes ✨ | Mumbai
हे ट्वीट वाचणाऱ्या 10 पैकी 9 लोकांना खालील दोन समस्यांपैकी एक समस्या असू शकते.
भारतातील 47-70 टक्के लोकांना विटामीन B12 ची कमतरता आणि 70-94 लोकांमध्ये विटामीन D3 ची कमतरता आहे.
गावाकडील लोकं सतत थकवा येतो, हातपाय दुखतात म्हणून अधूनमधून पेनकिलर घेतात. तेवढ्यापुरता आराम मिळतो पण वारंवार ही दुखणी डोकं वर काढत राहतात.
काही लोकं एक्स-रे काढतात आणि त्यात सगळं नॉर्मल येतं आणि मग एक वेगळी शंका येते... आपल्याला काहीतरी बाहेरचं झालं आहे, कुणीतरी घरावर जादुटोना केला आहे म्हणून आपण सतत आजारी असतो, सतत थकवा आलेला असतो असं वाटायला लागतं.
एके दिवशी शेजारची एक बाई संध्याकाळी गप्पा मारताना अमक्या बाबाची महिमा सांगायला सुरु करते आणि अनेकांच्या आयुष्यात - बाबा, बुआ, गुरुमाऊली, स्वामीजी, महाराज, भगत, गुरुजी असे भोंदू येतात..
बाबाकडे गाऱ्हाणं मांडलं जातं, बाबाच्या अंगात देव संचारतो, तुझ्यावर तुझ्या घरा शेचारच्याच बाईने उतारा केलाय, पुढचा एक महिना दर रविवारी उपवास कर, प्रत्येक रविवारी घराच्या चारही बाजूला रात्री दहीभात टाक आणि ही पुडी घे, रोज रात्री दुधामध्ये टाकून पी आणि एक महिन्याने मला भेटायला ये. असं सांगून बाबा शांत होतो.
ती बाई बाबाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट नित्यनेमाने मनोभावे करते, बाबाने आपल्याला छत्रछायेत घेतलंय, आता आपण बरे होणार असा विश्वास तिला येत जातो..
सोबत रोज रात्री दुध, बाबाने दिलेली पुडी (यात आयुर्वेदीक औषधं असतात) (एक बाबा तर मेडीकल मध्ये खोकल्यासाठी मिळणारं कफ सिरफ देताना पाहिलेला आहे मी) याने काहीसा फरक पडतो..
एक महिन्याने पुन्हा बाबाकडे गेलेली बाई भारावून गेलेली असते, बाबा खरंच चमत्कारी आहेत, बाबाकडे दैवी शक्ती आहे असा विश्वास तिला आलेला असतो.
दुखणं पूर्ण बरं झालेलं नसलं तरी एक बाबा आपल्याकडून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला बरं करण्यासाठी वेळ देतोय यामुळे माणसं मनाने पंगू होऊ लागतात. पैसे द्यावे लागत नसले तरी मन आणि मेदू आपण गहाण ठेवलेला असते.
एखादी गोष्ट जेव्हा फुकट मिळते तेव्हा आपणच प्रोडक्ट असतो हे आपल्याला कळत नाही. (उदा. लाडकी बहीण)
बाबा हाच भाग्यविधाता आणि बाबा हाच उद्धारकर्ता म्हणून डॉक्टरलाही कमी लेखायला सुरुवात करतात.
याच विश्वासाचा फायदा कधी शरीराने, कधी पैशाने तर कधी मनाने ही भोंदू लोकं घेतात.. साखळी तयार होते, मोठा कल्ट तयार होतो..
गाडी घ्यायची - बाबाला विचारा, शेतात काय पिकवायचं - बाबाला विचारा.. सगळ्याच गोष्टींत बाबा... गाडीला बाबाचं स्टीकर, घराला बाबाचं स्टीकर.. फोनला आणि शाळेत शिकून आयटी इंजिनिअर झालेल्या पोराच्या लॅपटॉपलाही बाबाचाच वॉलपेपर..
भक्तांचा विश्वास काबीज केल्यानंतर हे बाबा त्यांचे खरे रंग दाखवतात, देवाच्या मुर्तीसमोर महिलांची, अल्पवयीन मुलींची अब्रू लुटतात... मंत्री त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात...
ज्या महिलांना या गोष्टी समजतात त्या महिला बाबाकडे जायचं बंद करतात, काही निमुटपणे सहन करत जातात पण बदनामी आणि भितीपोटी कुणीच समोर येऊन बोलत नाही.
अशा बुवाबाजीला विरोध करणाऱ्या दाभोळकरांना जीवे मारलं जातं, पत्रकारांना धमकावलं जातं..
ज्या बुआबाजीच्या विरोधात दाभोळकांना जीव गमवावा लागला त्या बुआंचे पाय महाराष्ट्रातले मंत्री धुतात, त्याने दिलेलं सरबत पितात आणि महाराष्ट्र घडवण्याचा थापा मारतात..
या मंत्र्यांवर, पुढाऱ्यांवर टीका होते तेव्हा यांनी पाळलेली पिलावळं धर्माची ढाल पुढे करुन त्यांच्या संरक्षणाला पुढे येतात.
दाभोळकरांचा खून करणारे आणि खुनाचं समर्थन करणारे कोण हे तर वेगळं सांगायलाच नको...
असो.. आपला मुद्दा विज्ञान आणि विवेक आहे. ज्याप्रमाणे बहुतांश भारतीयांमध्ये विटामीन B12 आणि विटामीन D3 ची कमतरता आहे त्याचप्रमाणे सुमार लोकांचं युग असल्याने विज्ञानवादी आणि विवेकी विचारांची देखील मोठी कमतरता आहे..
ही पोस्ट इथपर्यंत वाचलीच असेल तर वर्षातून एकदा Full Body Checkup करु घ्या..
सध्याची आहारशैली आणि जीवनमान बघता कोणतातरी एक घटक किंवा शुगर आणि कोलेस्ट्रॉल जास्त असण्याची शक्यता असते. वेळीच लक्षात आलं तर लवकर बरे व्हाल आणि बाबाकडे जायची वेळ येणार नाही.
वयाची १८ वर्षे गावाकडे राहिल्यानंतर गावाकडचीच लोकं भोळी असतात, अंधश्रद्धाळू असतात असा माझा समज होता. गावाकडे राहून आपलं काहीच होणार नाही म्हणून शहरात येऊन शिकलो, इथेच नोकरी सुरु केली.
पण जेव्हा शिकलेले IAS अधिकारी, राज्याचा गाडा हाकणारे मंत्री बुआच्या भरवशावर बसलेले आहेत हे कळतं तेव्हा या देशाचं आणि राज्याचं भलं पुढची १०० एक वर्षे तरी होणार नाही याची खात्री पटते.
#दिवाळीच्या_निमित्ताने
दिवाळी म्हटलं की खरेदी आलीच…
प्रत्येकाला काहीतरी नवीन घ्यावंसं वाटतं कपडे, सजावट, गिफ्ट्स… आणि आजच्या डिजिटल काळात ऑनलाइन शॉपिंग हा सर्वात सोपा पर्याय झाला आहे…
पण याचं दुसरं रूप “फसवणूक” ही आहे…
माझ्या एका मैत्रिणीने इंस्टाग्रामवर एक “सेलिब्रिटी साइट” पाहिली सुंदर दिवाळी ड्रेस ₹5100 मध्ये…!
फोटो अप्रतिम, रिव्ह्यू चांगले, म्हणून तिने ऑर्डर केली.
पण जेव्हा पार्सल आलं, तेव्हा धक्का बसला…
ड्रेसचा कलर वेगळा, डिझाईन वेगळी, आणि फिटिंग बिलकुल चुकलेलं…
त्यावर साइटकडून “रिटर्न/एक्सचेंज नाही” असा थेट नकार…
मैत्रीण नाराज, पैसा गेला, दिवाळीचा मूड खराब झाला. मैत्रिणीने माझ्या जवळ तुळतुळ केली..
मग मी पुढाकार घेतला…
तिच्याकडून ऑर्डर, डिलिव्हरी, पेमेंट आणि रिटर्न रिक्वेस्ट चे सगळे तपशील घेतले.
साइटची रिटर्न पॉलिसी नीट वाचली, आणि Consumer Protection Act मधील नियम पाहिले.
व त्यानुसार साइटच्या मॅनेजरला लीगल नोटीस पाठवली…
“ग्राहक फसवणूक झाल्यामुळे, योग्य वेळेत रिटर्न/एक्सचेंज न दिल्यास ग्राहक मंचात तक्रार दाखल केली जाईल.”
सकाळी १० वाजता ईमेल पाठवला, आणि संध्याकाळी ५ वाजता साइटच्या लीगल सेल कडूनच फोन आला …
“मॅडम, केस नको, आम्ही ड्रेस एक्सचेंज करून देतो.”
५ मिनिटांत एक्सचेंज मंजूर झाला, नवीन ड्रेस मिळाला.
माझी मैत्रीण आनंदी झाली “दिवाळी ला नुकसान झालं नाही”… तिला समाधान वाटल..
सांगण्याचा हेतू हा आहे की…
फसवणूक झाली तर गप्प बसू नका..
तुम्ही “ग्राहक” आहात, म्हणजेच Consumer Protection Act, 2019 अंतर्गत तुम्हाला हक्क आहेत.
१) वस्तू खराब किंवा चुकीची आली तर तुम्ही consumer forum/ग्राहक मंच मधे तक्रार करू शकता.
२) वकील नेमणं बंधनकारक नाही , तुम्ही स्वतःही तक्रार दाखल करू शकता.
३) ऑनलाईन शॉपिंगसह हॉटेलमध्ये जेवण, ब्युटी पार्लर, हॉस्पिटल, ट्रॅव्हल सेवा, बँकिंग इ. सर्वांवर हा कायदा लागू होतो.
४) https://t.co/eAp8ob60ib या सरकारी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार ही दाख़ल करू शकतात.
त्याचबरोबर काही अन्य महत्त्वाचे कायदे देखील लक्षात ठेवा …
१) Legal Metrology Act, 2009 – चुकीचे वजन/मोजमाप, एक्सपायरी डेट, MRP पेक्षा जास्त वसुली झाल्यास तक्रार करता येते.
२)Information Technology Act, 2000 – ऑनलाइन व्यवहारात फसवणूक किंवा डेटा गैरवापर झाल्यास लागू.
३)Food Safety and Standards Act, 2006 – हॉटेलमध्ये निकृष्ट किंवा दूषित अन्न दिल्यास कारवाई करता येते.
तेव्हा…
“ग्राहक म्हणून फसवला गेलात तर तक्रार करा…
कायदा तुमच्याच बाजूने उभा आहे…” 🙌🏻
#ConsumerRights #LegalAwareness #OnlineShopping #ConsumerProtectionAct #Diwali2025 #KnowYourRights