मा. @mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा महाघोटाळा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही.
@Dev_Fadnavis महोदय,
ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा???
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत???
👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार व शासनाच्या विनंतीनुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये कृषी विभागाच्या 258 पदांचा समावेश करणेबाबत लोकसेवा आयोगाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. सुधारित जाहिरातीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल व 1 डिसेंबर या सुधारित दिनांकाला परीक्षेचे आयोजन होईल असे आयोगाने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार घेतलेल्या निर्णयासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आभार. यासोबतच महाराष्ट्र अराजपत्रित (गट ब व गट क) सेवा पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात लवकर प्रसिद्ध व्हावी यासाठीदेखील माझे प्रयत्न चालू आहेत. पोलीस उपनिरीक्षक पदांचे मागणीपत्र आयोगाकडे तात्काळ पाठविण्यात यावे यासाठी सहसचिव श्री व्यंकटेशजी भट यांच्याशी बोलणे झाले आहे, यापुढेही माझा पाठपुरावा सुरूच राहील. #MPSC @mpsc_office
महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट - ब आणि गट - क संयुक्त पूर्व परीक्षा २०२४!
दीड वर्ष होऊनही MPSC संयुक्त गट-ब आणि गट-क जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. यावर्षी एकही मोठी जाहिरात आयोगाने प्रसिद्ध न केल्याने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नैराश्यात गेले आहेत.
राज्य सरकारकडून सुधारीत मागणीपत्रे प्राप्त न झाल्यामुळे लोकसेवा आयोग जाहिरात काढू शकलेले नाही. आचारसंहितेच्या अगोदर जर जाहिरात नाही निघाली तर संधीसाधू मिंधे सरकार ला याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल हे निश्चित !
आम्ही खंबीरपणे सर्व तरुण तरुणींसोबत सोबत आहोत.
@AUThackeray@Mpsc_Andolan@AAPMaharashtra
जिल्हा परिषद भरती विविध पदांच्या, आरोग्य भरती आणि इतर पदभरतीमधील खूप उमेदवारांना अजूनही वेगवेगळ्या कारणांमुळे नियुक्ती दिल्या गेलेल्या नाहीत
आचारसंहिता लागणार असल्याने,शासनाला नम्र विनंती.हा प्रश्न मार्गी लवकर लावावा
@mieknathshinde@Dev_Fadnavis@TanajiSawant4MH@girishdmahajan
जिल्हापरिषदेच्या शाळा खाजगीकरण करण्याचा 'काळा कायदा ' पूर्णपणे रद्द करण्यात येणार नाही तोपर्यंत राज्यभरात आंदोलन, निर्णयाची होळी,मोर्चे,निवेदन मोहीम हाती घेऊ त्यानंतर शेवटी कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नसेल पण निर्णय रद्द होईपर्यंत लढा तीव्र सुरू राहील!
@RRPSpeaks@anjali_damania
#BMC भरतीमधील अन्यायकारक अटी रद्द करण्यासाठी धनंजयजी शिंदे यांच्या नेतृत्वात BMC वर मोर्चा काढण्यात आला
@Dhananjay_AAP यांनी आधीपासूनच पुढाकार घेतला होता, @AUThackeray यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.आता @Dev_Fadnavis यांचे पत्र समोर आल्याने मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.
शिक्षण सेवकांचे अजून किती बळी घेणार , भावपूर्ण श्रद्धांजली ताई,शिक्षणसेवक रद्द करा काहींना नोकरी उशिरा लागली, कुटुंबाला कस चालवायचं, सिंधुदुर्ग येथील जि प शाळेतील कै. आम्रपाली गजानन बोरकर या ताईने जीवन संपवले @Mpsc_Andolan@AjitPawarSpeaks@dvkesarkar@balushamane1@RahulGandhi
कोल्हापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी समरजितसिंह घाटगे यांच्या निवासस्थानी भेट दिली. कोल्हापुरातील सामाजिक जडणघडणीत घाटगे घराण्याचे नाव वगळून चालत नाही. या कौटुंबिक भेटीत समरजितसिंह घाटगे यांचे चुलते श्रीमंत प्रवीणसिंहराजे घाटगे यांचीही भेट झाली. सर्वांशी मोकळेपणाने संवाद साधून पुढील कामासाठी निघालो.
#कृषी_सेवा गट अ आणि ब च्या 258 जागांचे मागणीपत्र त्वरित आयोगाला पाठवून ही पदे यंदाच्या 2024 च्या जाहिरातीत समाविष्ट करण्यासंदर्भात मुख्यमंत्री साहेबांना भेटून मी विनंती केली होती. त्यानुसार शासनाने आयोगाला मागणीपत्रक पाठवले असले तरी आयोगाने मात्र कृषी सेवेच्या पदांच्या सदरील जाहिरातीत समावेश करणे शक्य नसल्याचे प्रसिध्दीपत्रक काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.
तसेच येत्या रविवारी #IBPS आणि #राज्यसेवा परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांना कुठल्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. गेल्या रविवारी समाजकल्याण आणि IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षांना उपस्थितीचे प्रमाण खालावले होते. ही बाब लक्षात घेता येत्या रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्यसेवा आयोगाची परीक्षा पुढील महिन्यात घेतल्यास #IBPS परीक्षार्थींना प्रश्न देखील सुटणार आहे तसेच कृषी सेवेच्या जागा समाविष्ट करून आवश्यक ती तयारी करण्यासाठी आयोगाला देखील वेळ मिळणार आहे. या दोन्ही मागण्यांसाठी #विद्यार्थी पुण्यात आंदोलनाला बसले असून विद्यार्थ्यांचा मागण्या रास्त असल्याने आयोगाने देखील सकारात्मक भूमिका घेऊन त्वरित निर्णय घ्यावा ही विनंती.
@mieknathshinde@mpsc_office