@TAKDEERM@TanajiSawant4MH@mieknathshinde@AjitPawarSpeaks आरोग्य सेवेमधील मागील 15-18 वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांचे कामबंद आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे त्या सर्वांना कायम करा व ती प्रक्रिया होईपर्यंत समान काम साठी शैक्षणिक अर्हता नुसार समान वेतन वा ग्रेड पे लागू करा ही नम���र विनंती
@DrPandeMangesh1@TAKDEERM@TanajiSawant4MH@mieknathshinde@AjitPawarSpeaks आरोग्य सेवेमधील मागील 15-18 वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांचे कामबंद आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे त्या सर्वांना कायम करा व ती प्रक्रिया होईपर्यंत समान काम साठी शैक्षणिक अर्हता नुसार समान वेतन वा ग्रेड पे लागू करा ही नम्र विनंती
@mieknathshinde आदरणीय मुख्यमंत्री साहेब, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांच्या समायोजन व सम कक्ष पदाप्रमाणे वेतन या मागण्यांना लवकरात लवकर न्याय देऊन आरोग्य व्यवस्था पूर्ववत, अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न व्हावे ही विनंती.
@TanajiSawant4MH@mieknathshinde@AjitPawarSpeaks
आदरणीय साहेब, कृपया 25 ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर असणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना शासन सेवेत समायोजन व समायोजन होईपर्यंत समकक्ष पदाप्रमाणे वेतन दे���न न्याय करावा ही विनंती
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार मी नौपाडा पोलीस स्टेशन येथे मन्या भिडे याच्या विरोधात स्वत: जाऊन फिर्याद दिली. ज्याच्याविरुद्ध खरंतरं राष्ट्राद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा; त्या मन्या भिडे विरुद्ध पोलिसांनी आज कमीत कमी गुन्हा तरी दाखल करुन घेतला. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये आज FIR No. 0224/2023 अन्वये FIR रजिस्टर करण्यात आला. तक्रारदार मी स्वत:च होतो.
यावेळी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्षा सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण असे अनेक समविचारी कार्यकर्ते उपस���थित होते. आता शासनाकडे एवढीच विचारणा आहे की, 153 (ब) का लावण्यात आला नाही आणि या मन्या भिडेला अटक कधी करणार ?
सदर घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो! याप्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जावे आणि तत्काळ संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावे, ही गृहमंत्री @Dev_Fadnavis जी आपणांस नम्र विनंती!
अजित पवार आर्थिक नाकेबंदी करतात म्हणून महाराष्ट्राची हद्द ओलांडून सुरत मार्गे गुवाहाटी-गोवा करत राज्यात पोहोचलेल्या शिंदेगटाला शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं ही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीची शोकांतिका आहे. शिंदे यांचे राजकीय अस्तित्व फार दिवसाचं नाही हेच आज सिद्ध झाले. हिवाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे नसतील हे आज स्पष्ट झालंय.
#मंत्र���मडळ
इस्त्रोतील सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीला अखेर यश!
चांद्रयान -३ चं यशस्वी प्रक्षेपण!
इस्त्रोतील सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचं मनापासून अभिनंदन!
#Chandrayaan3#ProudMoment#india
स्वागत करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून रस्त्यावर ताटकळत ठेवणं, हे कॅबिनेट मंत्र्याला न शोभणारं आहे... राष्ट्रवादी काँग्रेसची तर ही विचारधारा असूच शकत नाही..
आणि संगतीचा परिणाम अवघ्या चार दिवसातच होत असेल तर हे जरा आश्चर्यकारकच आहे..
@NCPspeaks
83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब महाराष्ट्र पिंजून काढणार...
राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ येवला इथे फोडणार..
उद्या, शनिवार, दि. 8 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता येवला, नाशिक इथे होणार ऐतिहासिक स��ा..
धुळे आणि जळगाव दौरा पावसाचा अंदाज घेऊन लवकरच जाहीर होईल.
@PawarSpeaks
#NCP
#योद्धापुन्हामैदानात
बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे एका खाजगी बसला अपघात होऊन 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली…!
अश्या दुर्दैवी घटना पुन्हा होऊ नयेत,यादृष्टीने राज्य सरकारने,खाजगी बसच्या संदर्भात कडक संहिता जाहीर करावी,जेणेकरून अश्या घटनांना चाप बसेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित राष्ट्रीय कार्याध्यक्ष व सातत्याने जनसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडत त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या संसद रत्न पुरस्कार विजेत्या खासदार सुप्रिया सुळे जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो ह्याच मन���पूर्वक सदिच्छा
@supriya_sule
@NCPspeaks
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल...!!