Ex Deputy Director (Info ) of @InfoDivKolhapur, Directorate General Of Information and Public Relations, Govt Of Maharashtra, Mumbai. Views are Personal here.
. प्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे यांचा आज जन्मदिवस.हे लोकप्रिय विनोदी लेखक होते. पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. तसेच शिक्षक, नाटककार, कवी, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले. त्यांना विनम्र अभिवादन.
प्रसिद्ध निसर्ग लेखक मारोती चितमपल्ली यांचा आज वाढदिवस.वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ ३६ वर्षे नोकरी केली. नोकरी दरम्यान आणि त्यानंतरही अशी एकूण ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणी जीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अनेक पुस्तकातून केले आहे. त्यांना खूप शुभेच्छा.
आजच्या दिवशी 1963 मध्ये भाक्रा नांगल धरण पंडित नेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करण्यात आले . हे धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांच्या सीमेवर बांधले गेले आहे. सतलज नदीवर असलेले भाकरा धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेशला पाणी पुरवठा तसेच विजं पुरवठा करते.
आज माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे काम केले. त्यांना आदरांजली.
स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी पुढारी आणि सर्वोदय चळवळीचे प्रमुख नेते जयप्रकाश नारायण यांचा आज जन्मदिवस.भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
आणीबाणीच्या काळात ते अग्रणी होते. त्यांनी मोठे आंदोलनं उभे केले होते. त्यांनी अनेक सामाजिक लढे उभे केले होते.
समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा आज स्मृतीदिन. हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे लिहीली.
लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक
डॉ. तारा भवाळकर यांची दिल्ली येथे होणाऱ्या
98 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
निवड झाली. त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन.
आज खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव झाला.
केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. सर्व मराठी जनतेचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा!! केंद्र सरकारचे आभार!!
हैद्राबाद मुक्ती संग्राम मध्ये मोठे आंदोलनं उभे करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज जन्मदिवस.हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्त्व संपवा’ अशी हाक त्यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक सामील झाले.
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती. ते म. गांधी आणि पं. नेहरू यांच्या सोबत स्वातंत्र लढ्यात सहभागी झाले. अनेक सत्त्यागृह, आंदोलने करुन इंग्रजां विरूद्ध लढा पुकारला. त्यांनी दिलेला जय जवान जय किसान हा नारा देशभर गाजला. त्यांना विनम्र अभिवादन.
Today Remembering birth anniversary of Mahatma Gandhi. one of the key leaders of the Indian independence movement and a pioneer of the philosophy and strategy of non-violence. The United Nations declared this day as the International Day of https://t.co/oXY8twdZVv tribute.