पूर्ण कुटुंबच फ्रॉड दिसत आहे.
दीपके आणि त्याचे आई-वडील सकाळपासून म्हणत होते की, त्याच्या आजीच्या निधनाची बातमी त्याला सांगण्यात आली नव्हती.
मात्र, हा व्हिडिओ पाहा; दिल्ली पोलीस अक्षरशः त्याला तातडीने विमानाचे तिकीट काढून घरी पाठवण्याची व्यवस्था करत होते, पण त्याने नकार दिला. नंतर पोलिसांनी त्याला 'एकदा घरी बोलून घे' असे सांगितले, तेव्हाही त्याने साफ नकार दिला. त्याला वाटले की नंतर व्हिक्टिम कार्ड खेळता येईल, मात्र आपला व्हिडिओ देखील बनवला जात असेल याची त्याने कल्पना केली नव्हती.
विवेकानंद पाटील माजगावकर यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार असतील, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा आहे, हे लक्षात ठेवा.
बाकी, तुम्ही वेड्याला वेद म्हणायला लावले, या अहंकारात राहा. मी वारकऱ्याचा पोरगा आहे. अध्यात्माचं हे वेड मला आज लागलेलं नाही, तर लहानपणापासूनच आहे.
विश्वास बसत नसेल तर ३-४ वर्षांपूर्वीचा हा कीर्तनाचा व्हिडिओ कान उघडे ठेवून नीट ऐका आणि यातलं काही रोहित पवारांना कळतं का विचारा!
@RRPSpeaks
मिस्टर इलॉन मस्क,
आता पर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की भारत हा दबावापुढे वाकणारा कुणी कमकुवत देश नाही.भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे...
या देशाचे नेतृत्व एका अशा खंबीर पंतप्रधानांकडे आहे जो डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे झुकला नाही....
तो एका उद्योगपतीच्या दबावापुढे झुकेल असे तुम्हाला वाटते?
चीनने स्टारलिंक,यूट्यूब आणि X वर बंदी घातली तेव्हा चीनला “क्राईम अगेन्स्ट पीपल” असे म्हणण्याची हिंमत तुम्ही दाखवली होती का? जो शब्दप्रयोग तुम्ही भारतासाठी केला.
लक्षात ठेवा भारताचे नियम भारतच ठरवेल.
इथे व्यवसाय करायचा असेल तर नियम पाळावेच लागतील....दबाव चालणार नाहीत.
@elonmusk@Starlink@SpaceX@narendramodi@PMOIndia@AmitShah@HMOIndia@JM_Scindia@DoT_India
श्री नाना पाटेकर यांच्यासारखी झोकून देण्याची वृत्ती, स्वतःचे वेगळेपण आणि एक आगळा प्रभाव फारच मोजक्या अभिनेत्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यांनी प्रत्येक भूमिकेत विलक्षण विविधता आणि सर्जनशीलता आणत, अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहतील अशा भूमिका आपल्यासाठी साकारल्या. आपल्या स्पष्ट आणि परखड विचारांसाठीही त्यांचा मोठा आदर केला जायचा, स्वतःच्या विश्वासावर ठाम राहून मत मांडताना ते कधीही डगमगले नाहीत.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत श्री नाना पाटेकर यांचे योगदान अफाट होते. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!
३ ऑक्टोबर १९०३
निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आणि रझाकारांच्या जिहादी अत्याचाराविरुद्ध मराठवाडा, तेलंगणा व कर्नाटकातील जनतेला एकत्र करून लढा देणारे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे मुख्य प्रणेते, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी रामानंद तीर्थ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩🌹
काँग्रेस च्या तुकड्यावर भुकणारा हा दिपके म्हणतोय, नेहरू ने मतदानाचा अधिकार दिला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहून आपल्या सर्वांना हा अधिकार दिला.
काँग्रेस ने याला सांगितल तर उद्या हा म्हणेल सोनिया गांधीच्या इटलीतील आजीने भारतातील जनतेला मताचा अधिकार दिला.
काँग्रेस च्या अजेंड्यावर भुकणार्या या झुरळ दिपके ने आज संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे .
निषेध 😡
नसरुद्दीन शहा, शबाना आजमी, योगेंद्र यादव यांचे व्यावसायिक 'पाठिंबा पथक' निर्माण झालेले आहे, जिथे जिथे मोदीविरोधी आंदोलने होतात तिथे पाठिंबा द्यायला ही मंडळी न बोलवता पोहचतात.
काय कारण असेल देशातील अर्बन नक्षली गॅंग म्हणजे राहुल गांधी, अभिजीत दिपके वगैरेपैकी कोणीही कॅप्टन स्मित मच्छार साठी अभिनंदनचे ट्विट केले नाही? कारण स्पष्ट आहे, ही भारत विरोधी टोळी आहे. यांनी जगभरामध्ये फक्त भारताची बदनामी करण्याची सुपारी घेतली आहे, देशाचा गौरव वाढवणारी कोणती गोष्ट यांना सुखावत नाही.
अमेरिकेने रशियन तेल खरेदीदारांवर १००% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी कायदा केला आहे.
अपेक्षेप्रमाणेच भारतात याची चर्चा अमेरिकेपेक्षा जास्त आहे.
त्यामुळे आता “भारताची अर्थव्यवस्था कोसळेल, बेरोजगारी वाढेल” अशी भीती व्यक्त करणारे अतिरंजित पोस्ट ही वायरल होत आहेत
याकडे काही भारताचे अपयश म्हणूनही बघत आहेत .
त्यांच्यासाठी ......
भारताची 2025 मधील एकूण निर्यात सुमारे ९०० अब्ज डॉलर
त्यात अमेरिकेचा वाटा 10% ही नाही.
गेल्या एक वर्षात भारताने केलेल्या चार मुक्त व्यापार करारांमुळे पर्यायी बाजारपेठा भारतासाठी उपलब्ध आहेत.
महत्वाचे म्हणजे भारतातील देशांतर्गत बाजारपेठ जगातील सर्वात मोठी आहे.
असा टेरिफ भारतावर लावताना ट्रम्प यांना दहा वेळा विचार करावा लागेल .
अमेरिकेतील महागाई ३.४% वर आहे; पुरवठा साखळी विस्कटली तर तिचा फटका अमेरिकेलाच जास्त आहे.
@narendramodi@PiyushGoyal@DrSJaishankar@POTUS@LindseyGrahamSC #IndiaUSTrade #Tariffs #RussianOil #भारतअमेरिका
जनाब संजय राऊत कार्यक्रमापूर्वीचे फोटो टाकायचे धंदे बंद करा
आणि रिकाम्या खुर्च्या मोजण्याऐवजी संपूर्ण उबाठा गट रिकामा का झाला? याचा विचार करा!
राहिला प्रश्न मतदानाचा तर तुमच्या पक्षाचे संपूर्ण राज्यात मिळून जेवढे नगरसेवक आहेत त्यापेक्षा जास्त भाजपचे आमदार आहेत. हे ध्यानात ठेवा!
We aren’t same @RahulGandhi..
Look at the Gen Z driven by CM @Dev_Fadnavis today and look at the paid crowd you gathered yesterday..
Your chhapri, classless, sadakchhap talks won’t work in Maharashtra.. The youth here is way smarter than you.. They are hardworking, intelligent and ambitious.. There’s no space for Pappugiri..
People of Maharashtra has shown Clown @RahulGandhi his place and will continue to do so..
Maharashtra is blessed to have CM @Dev_Fadnavis as its leader.. The Young generation is flourishing under his leadership..
मा. खा. शरद पवार साहेब,
संसदेतील खा. राजाभाऊ वाजे यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात काही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्या वगैरे... काही नवख्या नेत्यांनी त्यासंदर्भात सोयीचा अर्थ काढून समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या आणि काही माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्या. पण, आपण कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे सुजाण आणि ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे आपल्या मनात कोणता गैरसमज राहू नये, म्हणून हा थोडा विस्ताराने लेखनप्रपंच!
मुळात एक लक्षात घेतले पाहिजे, ज्या कंपन्या बंद होतात, त्यातील 76 टक्के या डिफंक्ट कंपनी असतात. डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरुच झाल्या नाहीत! आता ‘संसदेत विचारला प्रश्न आणि त्याचे उत्तर’ किंवा ‘माहिती अधिकारात विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर’ याचे एक प्रारुप ठरलेले असते. त्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली, तरच इतर तपशील मिळू शकतो. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात सुदैवाने संपूर्ण माहिती ही पारदर्शीपणे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर गेलात तर तेथे आपल्याला संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकते. ही माहिती देशातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक माध्यमे पाहू शकतात. (या संकेतस्थळाची लिंक अशी : https://t.co/rpWeQCWRj8 ) आणि मला सांगताना हेही आनंद होतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि कायम क्रमांक 1 वरच राहील.
माध्यमांमधील बातम्यांनी तर अनेक कंपन्या बंद झाल्या, असा आभास निर्माण झाला. त्यामुळे त्यांना हा विषय अधिक तपशीलात कळावा, म्हणून येथे काही माहिती देतो आहे. देशात एकूण 31 लाखांहून अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी सुमारे 21 लाख कंपन्या या आज सक्रिय आहेत.
- 2015-16 मध्ये भारतात सक्रिय कंपन्यांची संख्या 6,78,768 इतकी होती, ती आता 21,17,747 इतकी आहे. म्हणजेच गेल्या 10 वर्षांत मा. मोदीजींच्या नेतृत्त्वात सक्रिय कंपन्यांच्या संख्येत तिपट्टीहून अधिक वाढ झाली आहे.
- आता सर्वाधिक कंपन्या असलेल्या देशातील आघाडीच्या राज्यांची यादी बघा. (3 जून 2026 ची स्थिती)
सर्वाधिक कंपन्या आजही महाराष्ट्रात 3,96,211
त्याखालोखाल दिल्ली : 2,72,342
तिसर्या क्रमांकावर उत्तर प्रदेश : 1,85,982
- बंद झालेल्या कंपन्या (3 जून 2026 ची स्थिती)
कोविड काळ वगळता सरासरी 20 ते 22 हजार कंपन्या दरवर्षी बंद होतात.
त्याच्या कारणांची वर्गवारी अशी : 76 टक्के डिफंक्ट कंपनी (डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरुच झाल्या नाही), 12 टक्के कंपन्यांचे अमालगमेशन (एकत्रिकरण) आणि 2 टक्के कंपन्या विसर्जित
2019-20 या एकाच वर्षी कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने एक विशेष मोहीम राबवून 6 लाख कंपन्या रद्द केल्या. प्रत्येक वर्षीच्या रकान्यात गेले तर निष्क्रीय कंपन्या ‘स्टाईक ऑफ’ केल्याचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे बंद झालेल्या कंपन्या कमी आणि ‘स्ट्राईक ऑफ’ झालेल्या कंपन्यांचीच संख्या अधिक आहे.
- नवीन कंपनींची नोंदणी (टॉप टेन राज्य)
दरवर्षी सुमारे 1 लाख नवीन कंपनींची देशात नोंदणी होत असते. त्यात दरवर्षी महाराष्ट्र सर्वांत पुढे असतो. उदाहरणासाठी 2025-26 या वर्षांची आकडेवारी घेऊ. महाराष्ट्र : 41,525 कंपन्या, दिल्ली : 20,272 कंपन्या, उत्तरप्रदेश : 27,494 कंपन्या, कर्नाटक : 17,857 कंपन्या, तामिळनाडू : 17,024 कंपन्या, तेलगंणा : 17,300 कंपन्या, गुजरात : 14,666 कंपन्या आणि पश्चिम बंगाल : 10,598 कंपन्या.
- राहिला प्रश्न चाकणचा. तर तेथे काही समस्या निश्चितपणे आहेत. मंत्री श्री उदय सामंत यांना तेथे लक्ष घालण्यास निर्देशित करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या पुढाकाराने 12 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, जिल्हा परिषद अशा सर्व संबंधित यंत्रणांची एक बैठक घेण्यात आली आहे. सर्व समस्या ऐकून घेत, त्यावर समाधान काढण्यासाठी एक अल्पकालीन आणि एक दीर्घकालिन असा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. एकही उद्योग तेथूनही बाहेर जाणार नाही, असाच आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्र उद्योगस्नेही आहेच. म्हणून सातत्याने परकीय गुंतवणूक ही राज्यात अधिक येते. सातत्याने क्रमांक 1 वर आपण आहोत आणि राहू.
@samant_uday
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने विद्यार्थ्यांना काय मिळालं? असा काय फायदा झाला? तर केवळ असुरी आनंद.... कारण खऱ्या विद्यार्थ्यांना या सगळ्या मध्ये काहीही घेणं देणं नव्हते, नसणार आहे...
हां, यामुळे एक मात्र झालं की, विरोधकांना मात्र फुकटचे बळ मिळाले... यालाच म्हणतात... दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ...
अर्थात हा भाडोत्री लाभ केवळ रस्त्यावर उतरून उत्सव साजरा करण्यापुरता टिकेल... पण, तुमचे चालू द्या, लोकांना सगळं समजतंय की कोण खरंय आणि कोण खोटंय ते...
मोदी सरकारच हा देश पुढे नेणार आहेत, जगात भारताची प्रतिमा आणखी उंचावणार आहेत...
आताच्या युद्धजन्य परिस्थितीत भारतात कोणतेही अराजक झाले नाही, सगळं सुखेनैव चाललंय, याचीच पोटदुखी झाल्याने झुरळं रस्त्यावर आली... असे अनेक विरोधी त्रास सहन करत नरेंद्र मोदीजी गेल्या १२ वर्षांपासून अखंड देशसेवा करत आहेत, देश सामर्थ्यशाली करत आहेत, देश प्रगतीपथावर नेत आहेत...
🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद... भारत माता की जय!
@narendramodi@NaMoInMarathi@PMOIndia@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Medha_kulkarni@cbawankule@ChDadaPatil@BJP4India@BJP4Maharashtra@RSSorg@ShivSenaUBT_
सैराट मधील सल्या उर्फ अरबाजचा व्हिडिओ पाहा...
वडील सिरीयस असताना सोलापुरातील नोबल हॉस्पिटल ने त्यांच्याच स्टोअर मधून वाढीव दरात औषधे घ्यायला लावली...बाहेर अर्ध्या दरात मिळत असताना...
या हॉस्पिटल वर शासनाने कारवाई करावी.
@Dev_Fadnavis@Tukaram_IndIAS