@MTPHereToHelp दादर आरटीओ कार्यालयासमोर, सारथी बारच्या बाहेरील रस्त्यावर दुचाकी अशा प्रकारे उभ्या करून ठेवल्या आहेत. याच ठिकाणी शिवडी ते वरळी ब्रिजचे काम सुरू आहे.
अशाप्रकारे दुचाकी रस्त्यावर उभ्या करून ठेवल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे समोरच ब्रिजखाली दादर पोलीस स्टेशन व आरटीओ कार्यालय आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी व्हिडिओची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी आणि रस्ता मोकळा करून द्यावा.
@MumbaiPolice@MTPHereToHelp
ही दुचाकी गेली १ ते २ वर्षा पासून पुटपाथ वर उभी आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व सामान्य जनतेला चालताना नाहक त्रास होत आहे तर कृपया आपण यावर कारवाई करावी @MTPHereToHelp@CPMumbaiPolice#MumbaiTrafficPolice
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुचाकी अनधिकृतपणे पार्क केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी.
📍 ठिकाण: [ठिकाण]
@MTPHereToHelp@mybmc
कृपया आमच्या इमारतीच्या परिसरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रहिवाशांना मोठा त्रास होत असून डेंग्यू व मलेरियाचा धोका निर्माण झाला आहे. कृपया तातडीने फॉगिंग व औषध फवारणीची व्यवस्था करावी. @mybmc@mybmcWardGS@TawdeRitu ANUBHAV SOC PLOT NO 1031
आज सकाळी शाळेत मुलांना सोडण्यासाठी जात असलेल्या वडिलांना भरधाव (70–80 किमी/ता.) वेगाने आलेल्या तरुणाने धडक दिली. त्याच्याकडे परवाना नव्हता, ओळख सांगण्यास नकार दिला आणि नशेत असल्याचा संशय आहे. तात्काळ कठोर कारवाई करावी.@MTPHereToHelp@MumbaiPolice
दादर येथील कॉन्व्हेंट गर्ल हायस्कूलजवळ झाडाची मोठी फांदी तुटलेल्या अवस्थेत लटकत आहे. शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी कृपया तात्काळ कारवाई करावी. @TawdeRitu@mybmc@MumbaiPolice@SaamanaOnline
@rautsanjay61@Dev_Fadnavis जर खासदारांना फुटायचं होतं तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून उमेदवारी का घेतली धंदा करून ठेवला आहे राजकारण म्हणजे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा
खेड ते मुंबई सेंट्रल mh01fl 0390 पहिल्यांदा पोलादपूर ला बंद पडली आत पोलादपूर डेपो च्या 500 मीटर पुढे आल्या नंतर पुन्हा बंद पडली सध्या ड्रायव्हर 10 ते 20 च्या गतीने महाड डेपो मध्ये गाडी घेऊन जात आहे @CMOMaharashtra@PratapSarnaik@SaamanaOnline
आज सकाळी दादर फुल मार्केटच्या बाहेर आगरी कोळी भगिनी मच्छी विकायला बसतात पण आज सकाळी ७:३० सुमारे पोलिसांनी त्यांना उठवलं पण आज ११ च्या सुमारे वरळी महेंद्र टॉवर च्या माघे परप्रांतीय बिंदास मच्छी विकत बसले आहेत नक्की मुंबई मराठी लोकांची आहे का @mybmc@MumbaiPolice
प्रभादेवी सयानी रोड सिग्मा इंडस्ट्री दोन च्या बाहेरील झाडाच्या फांद्या पूर्णपणे सुकले आहेत त्या कधीही तुटून खाली पडू शकतात आणि कोणाचा तरी जीव जाऊ शकतो तर कृपया करून आपण लक्ष द्यावे @mybmchealth@mybmc@mybmcWardGS@mieknathshinde@MumbaiPolice