आमचे मार्गदर्शक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित प्रचारक भारतीय जनता पार्टीचे प्रथम प्रदेशाध्यक्ष स्व. रामभाऊ म्हाळगी यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन !
आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड न करता मूल्योंचे राजकारण कसे करावे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे स्व. रामभाऊ म्हाळगी होय. कठीण परिस्थितीतही त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला. आपल्या हक्कांसोबतच आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून आदर्श नागरिक बनण्यासाठी त्यांचे विचार आजही अत्यंत प्रेरणादायी आहेत.
#रामभाऊ_म्हाळगी #Rambhau_Mhalgi #RSS #भाजपा #BJP
आज महाराष्ट्र दिनानिमित्त मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल व्यक्त केलेला विश्वास आणि दिलेल्या शुभेच्छा खरोखर प्रेरणादायी आहेत.
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी मा. मोदीजी ह्यांनी दिलेली प्रचंड ताकद आणि मार्गरदर्शन आम्हाला सर्वांना विकसित महाराष्ट्रासाठी समर्पित होण्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत.
मनःपूर्वक आभार मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी! 🇮🇳
@narendramodi@Dev_Fadnavis
#MaharashtraDay #Maharashtra #ViksitMaharashtra
भाजपा प्रदेश प्रवक्ता आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुख यांची कार्यशाळा आज भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्रजी चव्हाण, मंत्री श्री आशिषजी शेलार यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी प्रदेश कार्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे,
माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर यांच्यासह प्रदेश प्रवक्ता, विभागीय प्रसिद्धी प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा प्रदेश प्रवक्ते श्री. लक्ष्मणजी सावजी यांची सदिच्छा भेट..
📍नाशिक
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते श्री. लक्ष्मणजी सावजी यांची नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आत्मीयतेने स्वागत केले. या प्रसंगी भाजपा पश्चिम महाराष्ट्र विभाग माध्यम प्रमुख श्री. गोविंदजी बोरसे उपस्थित होते.
या भेटीदरम्यान विविध राजकीय, संघटनात्मक तसेच आगामी उपक्रमांबाबत मनमोकळा संवाद साधला. पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
आपुलकी, स्नेह आणि सहकार्याची ही भेट निश्चितच ऊर्जा देणारी ठरली.
#BJP #Nashik #PoliticalMeet #Organisation #BJP4Maharashtra
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील मानखुर्द परिसरातील विविध ठिकाणी भेट देत त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे महान पुरस्कर्ते आणि वंचित, शोषित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नाहीत, तर एक प्रेरणादायी विचारप्रवाह आहेत. समानता, स्वाभिमान आणि बंधुतेचा त्यांनी दिलेला संदेश आजही समाजाला नवी दिशा देणारा आहे.
या पवित्र दिनी त्यांच्या कार्याला आणि विचारांना नतमस्तक होत, त्यांच्या स्वप्नातील समतामूलक, न्याय्य आणि सशक्त भारत घडवण्याचा संकल्प पुन्हा दृढ केला.
#DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti #Samata #SocialJustice #Mumbai
भारतीय जनता पार्टीतील आमच्या सहकारी, जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार, राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! आपणांस उत्तम आयु-आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी खूप-खूप सदिच्छा !
#Meghna_Sakore_Bordikar#विधानसभा #Birthday #MLA
@MeghnaBordikar@BJP4Maharashtra
भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. अमलजी महाडिक यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! उत्तम निरामय आरोग्य, उदंड आयुष्य आणि उज्ज्वल भवितव्यासाठी खूप-खूप सदिच्छा !
#AmalMahadik#Birthday#आमदार#वाढदिवस@amal_mahadik@BJP4Maharashtra
मित्रवर्य श्री. प्रकाशजी गाडे यांच्या निवासस्थानी भेट…
📍करडखेड, देगलूर
भाजपचे सोशल मीडिया प्रमुख आणि मित्रवर्य श्री. प्रकाशजी गाडे यांच्या देगलूर येथील करडखेड या गावी भेट देण्याचा योग आला. या भेटीदरम्यान प्रकाशजींच्या आई-वडिलांची मनापासून भेट घेतली आणि त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधला.
घरातील संस्कार, कुटुंबातील जिव्हाळा आणि साधेपणा अनुभवताना मनाला विशेष समाधान लाभले. अशा कुटुंबातूनच समाजकार्याची प्रेरणा आणि मजबूत नेतृत्व घडत असते, याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
या भेटीतून आपुलकीचे नाते अधिक दृढ झाले. प्रकाशजींना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, त्यांच्या कुटुंबीयांच्या उत्तम आरोग्य आणि आनंदासाठी मनःपूर्वक प्रार्थना.
@PrakashGade13
@keshavupadhye भाजप हा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे आणि भाजप पदाधिकारी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता अहोरात्र पक्षासाठी काम करत असतात त्यांचे मृतिमंत उदाहरण म्हणजे आमचे आदरणीय व्यक्तिमत्व केशवजी उपाध्ये. फलित स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल भाजप नंबर वन
सामना अग्रलेखातून केलेली टीका तथ्यांवर नाही, तर द्वेष, भ्रम आणि राजकीय अपयश झाकण्यासाठी पसरवलेल्या अपप्रचारावर आधारित आहे. आजवर मराठी माणसाला घर, रोजगार, प्रतिष्ठा नाकारण्याचं काम कोणी केलं असेल, तर महापालिकेत तुमची सत्ता असताना झालं. भाजप-महायुती सरकारच्या काळात नाही.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीने बीडीडी चाळीत मराठी माणसाला परवडणाऱ्या दरात हक्काची घरं मिळाली. पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावले. मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू प्रकल्प सुरू झाले.
मराठी अभिमानावर अग्रलेख लिहणाऱ्यांनी काय केलं?
❌ एकही मोठा गृहनिर्माण सुधारणा कायदा नाही
❌ एकही रखडलेला प्रकल्प मार्गी लागला नाही
❌ बीएमसीचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला पण कारवाई नाही
❌ मुंबईतील मराठी माणसाला बेघर करण्याचं पाप तुम्ही केलं.
‘मराठी माणूस विरुद्ध अमराठी’ अशी कृत्रिम फूट पाडून स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मुंबईतील गृहनिर्माण धोरणं, पुनर्विकास योजना, पागडी प्रणालीतील सुधारणा या सगळ्या निर्णयांचा उद्देश सामान्य मुंबईकर आणि मराठी माणूसाला न्याय देण्याचाच आहे. मराठी माणसाच्या नावानं राजकारण करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या काळात मराठी तरुणांसाठी काय केलं, याचा हिशेब द्यावा.
आज मुंबईच्या विकासाला गती मिळतेय, मराठी तरुणांना संधी मिळतेय, हक्काचं घर मिळतंय आणि म्हणूनच काहींना ते असह्य झालं आहे. मराठी माणसाच्या हक्कांची खरी लढाई शब्दांच्या आड लपून नाही तर ठोस कामातून लढली जाते. म्हणून मुंबईला गती देवाभाऊ देतात, आणि उद्धवजी फक्त ‘सामना’तून रडगाणं गातात! हे मुंबईकरांनी ओळखलं आहे
@Dev_Fadnavis@uddhavthackeray@BJP4Maharashtra
आदरणीय राज ठाकरेजींचं अलीकडचं राजकारण ‘फॅक्ट्स’वर नाही, तर केवळ ‘फ्रीस्टाईल आरोपां’वर आधारित आहे. खरंतर ‘बॉम्बे’चं अधिकृत नामांतर ‘मुंबई’ करण्याचा निर्णय राज्यातील शिवसेना–भाजप सरकारनंच घेतला. या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळवून तो पूर्ण देशभर वैधानिकपणे लागू करणारे व्यक्ती म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामभाऊ नाईक.
संसदेत पहिल्यांदा ‘बॉम्बे’ ऐवजी ‘मुंबई’ असा उल्लेख करून हा बदल राष्ट्रीय पातळीवर स्थिर करणारेही भाजपचे राम नाईकच होते. पण राज ठाकरे यांना त्यांचा सोईस्कर विसर पडलेला दिसतोय. कदाचित उद्धवजी ठाकरेंसोबत आघाडी करायची असल्यानं ते आपल्या मूळ भूमिका विसरण्याचा किंवा उद्धवजींप्रमाणे यू-टर्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
केंद्र सरकार मुंबई–एमएमआरला जागतिक दर्जाचं कनेक्टिव्हिटी नेटवर्क देत असताना, काहींना राजकीय चक्कर येते, म्हणून गुजरातचा मुद्दा पुढे आणला जातो. खरं तर केंद्र सरकार मुंबई–एमएमआरच्या विकासासाठी मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. मेट्रो, बुलेट ट्रेन, कॉस्टल रोड कनेक्टिव्हिटी, मल्टीमोडल कॉरिडोर्स या प्रकल्पाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक राजधानीला जागतिक स्तरावर नेण्याची क्षमता आहे.
विकासाचे हे प्रकल्प पाहून काहींची ‘राजकीय मळमळ’ वाढते, म्हणूनच गुजरातचा बोगस बागुलबुवा पुढे करून भीतीचं राजकारण केलं जात आहे. पण मराठी माणूस, मुंबईकर आशा राजकारणाला थारा देणार नाहीत ते यू-टर्न घेणाऱ्यांसोबत नाही तर महाराष्ट्राला क्रमांक एकवर घेऊन जाणाऱ्या आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis देवाभाऊंसोबत उभे राहतील.
शेअर करा..
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना माओवादी संघटनेचं सामूहिक शरणागतीचं पत्र!
हा फक्त कागदाचा तुकडा नाही, हा विश्वासाचा शिक्का आहे!
जंगलातल्या बंदुका शांत करणारी ताकद, ही केवळ शस्त्रांची नसते
ती न्याय, विकास आणि निर्णायक नेतृत्वाची असते.
महाराष्ट्रात @Dev_Fadnavis जी यांनी उभारलेल्या कडक सुरक्षा धोरणाचा, आदिवासी विकासाच्या प्रामाणिक कामांचा आणि गडचिरोलीमध्ये केलेल्या ऐतिहासिक नक्षलमुक्ती प्रयत्नांचा परिणाम आज स्पष्ट दिसतोय.
पहिल्यांदाच माओवादी संघटना स्वतःहून शरण येण्याची तयारी दाखवत आहे. हे ‘विश्वास’ नावाचं राष्ट्रशक्तीचं सर्वोच्च प्रमाणपत्र आहे.
देवाभाऊं मॉडेलने दाखवून दिलं आहे की, जिथे विकास पोहोचतो, तिथे हिंसा आपोआप मागे हटते. जिथे शासन दृढ असतं, तिथे बंदुका खाली येतात.
40 वर्षात काँग्रेसला करता आलं नाही ते 10 वर्षात भाजप करून दाखवत आहे..
जन्मदिवसाच्या शुभ प्रसंगी कुलदेवता श्री मळाई देवीचं दर्शन…
📍 श्री क्षेत्र वांगणी
आम्हा मोहोळ कुटुंबियांची वेल्हे तालुक्यातील श्री क्षेत्र वांगणी येथील कुलदेवता श्री मळाई देवीचं जन्मदिवसाच्या औचित्याने मनोभावे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतला. यावेळी सर्वांच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. शिवाय ट्रस्टकडून करण्यात आलेला स्वागतपर सन्मानही स्वीकारला. श्री मळाई देवीच्या दर्शनाने मिळणारी सकारात्मक ऊर्जा चैतन्यदायी अनुभव देऊन जाते.