क्या दिल्ली के किसी पत्रकार,बमीडिया या संपादक को पता है कि पुणे में प���छले चार दिनों से हजारों MPSC छात्र दिन रात बैठकर पेपर लीक के खिलाफ आंदोलन कर रहे हैं? दिल्ली और मुंबई से दूर, यह सभी किसान के बच्चे हैं.. महाराष्ट्र सूखा से जूझ रहा है, लेकिन उनके बच्चे दिन रात एक कर पैसा जमा कर पढ़ाई करते हैं, दिन रात तैयारी करते हैं और फिर पेपर लीक हो जाता है.. एनसीपी विधायक रोहित पवार के नेतृत्व में यह आंदोलन जारी है.. ग्राउंड रिपोर्ट जल्द ही, The Telescope पर!
मा. अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही.. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे… मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं झालं आणि का झालं, या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीय… आपल्यात आत्तापर्यंत जे-जे काही संभा���ण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरुपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की मांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, हो ला हो आणि नाही ला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन या सगळ्याचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्यही वाटायचं. सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भिती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचात पण तीच व्यक्ती जेंव्हा तुमच्या संपर्कात यायची तेंव्हा फणासाती��� रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची, याचे आम्ही साक्षीदार आहोत.
पण अचानक असं काय झालं? दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वा��्याच्या वेगाने उर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? या प्रश्नाने डोक्याचा भुगा झालाय. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात, असं म्हणतात. पण मा. अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगाने नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी. या नियतीबाबतच माझी तक्रार आहे.. ती कुठं करायची हे कळत न��ही. पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे, ‘‘आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस. दे ना उत्तर.’’
अजितदादा तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे.. प्रत्येकाच्या डोळ्यांतला अश्रूचा पूर कमी होत नाहीये.. हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्रर्र होतंय.. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाट वाहतील, याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कुणी थोडं जरी चुकलं तर त्याला चार चौघात झाप झाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूणच ती नक्की घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं, हेच तर तुमचं वैशिष्टय होतं. पण दोन दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल.
दादा काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभं रहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, ‘‘अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो? एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे ‘मॉक ड्रील’प्रमाणे चेक करत होतो.. आता उठा, कामाला लागा… महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय.. चला, उशीर नका करु…’’
दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय..😭
Love U दादा!💔🙏
#AjitdadaPawar
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
आयुष्यातील ते मंतरलेले ४ तास आणि जिजित्सू…
राहुल गांधींच्या ऑफिसमधून निरोप आला
आम्ही १९ तारखेला सकाळी दिल्लीला पोहचलो. राहुल गांधींच्या सोबत भेट होणार आहे, याबद्दल फार उत्सुकता होती. पण कोठे? या बद्दल मला पक्की कल्पना नव्हती. गंमत पहा कसा योगायोग घडून आला, माझ्या मुलाचे नाव
कुणाचं आण�� काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात #ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. #ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्�� झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे.
कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ होईलच…!
विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे… महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे!
#सत्यमेवजयते
#जय_संविधान
काश्मीरच्या आकाशात सकाळी सकाळी श्रीनगर-बडगाम-बारामुल्ला येथे पाकिस्तान लढाऊ विमाने शिरली असता आपल्या हवाईदलाने पाकिस्तानची दोन लढाऊ विमान पाडली आहेत.⚡ जम्मू-काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफच्या तुकड्या वैमानिकांचा शोध घेत आहेत 😎💥 #जय_हिंद#भारत_माता_की_जय@TV9Marathi
शिक्षक नावाला कलंक असलेले तीन गनंग..
शिक्षक हे ���िढी घडवत असतात. पण यातले तीन कथित प्राध्यापक आणि एक नेता.. यांची ही ‘सुसंस्कृत’ भाषा बघा.. या ठगांची ही भाषा ऐकून यांच्या घरच्या आई-बहिणींनाही लाज वाटली असेल. मी जे म्हणतो यांना कर्जत-जामखेडमध्ये गुंडाराज आणायचंय, त्याचाच हा #ट्रेलर आहे. पण मला विश्वास आहे यांचा #पिक्चर कर्जत-जामखेडची स्वाभिमानी जनता #फ���लॉप केल्याशिवाय राहणार नाही.
(यांची भाषा ऐकवायला मलाही लाज वाटते पण यांची लायकी जगाला कळावी यासाठी नाईलाजाने आणि अत्यंत दुःखद अंतःकरणाने मी हा व्हिडिओ शेअर करतोय.)
मला आज सकाळपासून अनेकांचे फोन येऊन गेले, काहींनी कौतुक केले, काहींनी काळजी व्यक्त केली. हि सगळी समाजमाध्यमाची ताकद आहे. आपली लढाई कोण्या एका व्यक्तीविरोधात नसून अशा लोकांचे एक मोठे रॅकेट असेल, त्या विरोधात आहे.
काही जण मला वैद्यकीय प्रवेशाला खोटे दिव्यांग सर्टिफिकेट देतात याबद्दल सांगत आहेत, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, दिव्यांग यांचे बोगस प्रमाणपत्र काढून नोकऱ्या करणारे काही जणांबद्दल माहिती देत आहेत. मला हे खूप मोठे रॅकेट वाटते. मी एकटा त्यास पुरेसा आहे का ? सरकारने अशे प्रमाणपत्र देणाऱ्या व्यवस्थेची वेगळी प्रणाली अस्तित्वात आणायला हवी. तरी सुद्धा मी सांगतो जर कोणाकडे काही भक्कम पुरावे असतील तर त्यांचे विषय मी मांडेल. अर्धवट माहितीच्या आधारे काही मांडून मी अडचणीत येईल असं करणार नाही. क्रॉसचेक करेल.
तसेच दुसरी गोष्ट कि एखाद्या व्यक्तीने मांडलेल्या मुद्द्याला प्रतिवाद करता येत नाही तेव्हा त्याच्याबद्दल कुजबुज चालवली जाते. माझं जे काही आहे ते खुले आहे, राजकीय नेत्यांसोबतचे फोटो मी स्वतः इथे ट्विटरवर टाकलेले आहेत. भविष्यात हि टाकेल. माझ्या फॉलोअरमध्ये अनेकांना मी भेटलेलो आहे, स्वतःच्या खऱ्या नावाने/ओळखीने लिहतो. फेक अकॉउंटवरून लिहत नाही. गेल्या 3-4 वर्षांपासून मला फॉलो करणाऱ्या लोकांना माहितीये मी कसा आहे. तसेच या सगळ्या गोष्टीच्या मागे असणाऱ्या व्यक्तीला मी एकच संदेश देईल, विरोध हा विचारांचा करा, व्यक्तीचा व्यक्तिशः विरोध करू नका. तो तुम्हाला परवडायचा नाही...
धन्यवाद...