स्वच्छ प्रामाणिक वागणं, एखाद्या फुलासारखं मनात जे उमलतं ते तसचं व्यक्त करणं, आपण जे आहोत जसं आहोत त्यावर मनापासून प्रेम करणं आणि तेच जगासमोर मांडण हेच माझं जीवन
असे क्रिकेटर्स महाराष्ट्राने घडवलेत!
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध गोवा सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात ७ बाद २४९ धावा केल्या. गोव्याला विजयासाठी शेवटच्या ३ षटकांत ११ धावांची गरज ���ोती. त्याच वेळी महाराष्ट्राकडून ४८ वे आणि ५० वे षटक रामकृष्ण घोषने टाकले. या दोन्ही षटकांत अफलातून गोलंदाजी करत त्याने एकही धाव दिली नाही. सलग दोन षटकांत शून्य धावा देत त्याने सामना महाराष्ट्राच्या बाजूने फिरवला आणि महाराष्ट्राने हा थरारक आणि अटीतटीचा सामना ५ धावांनी जिंकला.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने असे अनेक दर्जेदार क्रिकेटर्स घडवले आहेत. रामकृष्ण घोषने एमसीएच्या ‘महा स्पीडस्टार: शोध महावेगाचा’ या उपक्रमात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचाही पराक्रम केला होता. त्याच उपक्रमातून तो पुन्हा महाराष्ट्राच्या संघात परतला. अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने तळागाळातील टॅलेंट शोधण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला यश आलं, याचा अभिमान वाटतो.
@MahaCricket
#MCA #MahaCricket #RamkrishnaGhosh #Cricket
महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये कठीण प्रसंगी संघाला सावरतानाच तुफानी शतक ठोकत नव्या विश्वविक्रमाचीही नोंद केली. यापूर्वी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वांत जलद ५ हजार धावा करण्याचा पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडीत काढून ऋतुराजने तो आपल्या नावे केला. या शानदार कामगिरीबद्दल ऋतुराजचं मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही त्याने असेच नवनवीन विक्रम प्रस्थापित करावेत आणि महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, या शुभेच्छा!
@Ruutu1331@MahaCricket
#MahaCricket
पी. व्ही. सिंधूने मलेशिया ओपन (सुपर १०००) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे!
दोन वेळच्या जागतिक विजेत्या यामागूची वि��ुद्ध खेळताना सिंधूने ��हिला गेम २१-११ असा नावावर केला होता. मात्र, त्यानंतर दुखापतीमुळे जपानच्या या खेळाडूला सामन्याच्या मध्यातच निवृत्ती स्वीकारावी लागली.
@sandesh_samant अन इथली सामान्य जनता अनादी काळापासून कुणाची ना कुणाची गुला��च राहिली आहे. 1947 मध्ये लोकशाही असलेले सार्वभौम सत्ता आली आणि आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो.
@sandesh_samant समाज कधी बंड करून उठतो आणि आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरलेली सत्ता उलथून लावत असेल तर ती क्रांतीच आहे. आणि त्यांच्या वंशजांनी अभिमान बाळगला तर त्यात काही गैर नाही.