@CMOMaharashtra@mieknathshinde
सर तुम्हाला सांगू इच्छिते की मानखुर्द मधील स्टेशन लगत असलेली महारष्ट्र नगर या भागात रीडेव्हलपमेंट साठी अनेक वर्ष सातत्याने सर्वे होऊन सुद्धा अजूनही डेव्हलप झालेला नाही ,आणि ते सर्वे तुम्हाला वोटिंग करतात कृपया या मध्ये लक्ष्य दया
गुजरातचा आमदार नवी मुंबईत येऊन आपले कार्यालय थाटतो ...
आणि मराठी माणसाला डीवचण्यासाठी कार्यालयाची पाटी चक्क गुजराती भाषेत लावतो ... ( मुळात कार्यालय,दुकानांची पाटी मराठीत हवी हा कायदा आहे,कोर्टानेही सांगितले आहे त्याला धाब्यावर बसवले ��ाते आणि यंत्रणा गप्प )
आम्ही यंत्रणांना हात जोडुन योग्य त्या भाषेत कळवले आहे ...
यंत्रणांनी आम्हाला शब्द दिला आहे पाटी मराठीत करून घेतो,
नाही झाले तर माज कसा उतरवायचा हे आम्हाला ठाऊक आहे ...
बाकी भाजपतील मराठी नेत्यांनी पण विषय गंभीरपणे घेतला तरी आमची हरकत नाही,का तुम्हालाही तुमच्या कार्यालयावरच्या पाट्या गुजराती भाषेत करायचा आदेश आला आहे ??
@mnsadhikrut
भारतात कित्येक लोक इंटरनेट चा वापर नाही करत, त्यामुळे एक मोबाईल रिचार्ज असा असावा ज्यामध्ये फक्त calling ची सुविधा असेल तसेच इनकमिंग कॉल साठी महिन्यात 5-10 रुपये रुपयेचा रिचार्ज हवा किंवा लाइफ टाइम इनकमिंग फ्री असावे.
तुम्हाला काय वाटत?
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
सर तुम्हाला एक विनंती आहे सर्व ठिकाणी तुम्हीं डेव्हलपमेंट करत आहात पण मानखुर्द स्टेशन जवळील महारष्ट्र नगर या जागेचा खूप वेळ सर्वे होऊ��� पण या ठिकाणी डेव्हलपमेंट होत नाही आहे कृपया तुम्ही दखल घ्यावी
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@ek
सर तुम्ही सर्वीकडे डेव्हलपमेंट चालू केलं आहे परंतु तुम्ही मानखुर्द रेल्वे स्टेशन जवळील महारष्ट्र नगर या परिसरात गवर्नमेंट सर्वे खूप वेळा होऊन सुद्धा ड���वलप होत नाही या कडे कृपया तुम्ही लक्ष द्या
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्���त्युत्तर
मीच माझ्या शासन निर्णयाची होळी करेल का? नीट समजून घ्या आणि टीका करा - उद्धव ठाकरे
#Hindi #UddhavThackeray #CMDevendraFadnavis
https://t.co/URn2N1s3rD
सध्याचे भाजपचे राजकारण! @BJP4Maharashtra
शिवसेना विरुद्ध शिवसेना
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी
हिंदू विरुद्ध मुस्लिम
मराठी विरुद्ध हिंदी
एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभे करणे.
"ब्रिटिशांच्या फोडा व राज्य करा" या नीतीचे भाजपकडून तंतोतंत पालन
#MaharashtraDevelopment #DustInEyes #TransparencyNeeded #Maharashtra #IndianPolitics #Democracy #INCMaharashtra #IndianNationalCongress #congresswithjustice
नमस्कार ,दादा भुसे साहेब ,
टिटवाळा पूर्व येथील kent school आणि ANKITA school या शाळेत मराठी भाषा शिकवली जात नाही. हिंदी भाषा शिकवली जाते. इथला ढिम्म आमदार विश्वनाथ भोईर आहे. आपण या शाळ���ंवर कारवाई कराल अशी आशा आहे.
#Titwala @dadajibhuse @CMOMaharashtra @RajThackeray
@RajThackeray@mnsadhikrut
सर आम्ही घाटकोपर नित्यानंद नगर मध्ये राहतो आमचा इथे जाणूनबुजून
रोज रात्री मुस्लिम समाज लाऊड स्पीकर लावून काही ना काही कार्यक्रम ठेवतात ज्याचा प्रचंड त्रास होतो ,तुम्ही कृपया या गोष्टी कडे लक्ष द्यावं ही विनंती
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर न���्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.
पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र न���निर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.
अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंत��� हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! !
हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.
आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये... त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.
असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा.
मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.
राज ठाकरे ।