चार-पाच दिवसांपूर्वी मिलिंद जोशीने (@musicmilind) मला एका व्हिडिओची लिंक पाठवली. आमिर ख़ानच्या पानी फाउंडेशनच्या (@paanifoundation) एका कार्यक्रमाचा तो व्हिडिओ होता. जळगांवच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकाल्पातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी समीर सामंतने लिहिलेली आणि मी संगीतबद्ध केलेली पुष्कर श्रोत्रीच्या ‘उबुंटू’ या चित्रपटातली प्रार्थना सादर केली. आमिर ख़ान स्वतः अतिशय मन लावून या मुलांचं सुरेल वादन आणि गायन तर ऐकत होतेच पण जी गोष्ट मला भावली ती म्हणजे श्रोत्यांमधे बसलेल्या दिग्दर्शिका किरण राव यांच्या सह अनेक श्रोते ही प्रार्थना गुणगुणत होते. या प्रार्थनेचा दुवा मी खाली कमेन्ट्समध्ये देतोच आहे.
योगायोग असा की मिलिंदने जेव्हा मला ही लिंक पाठवली तेव्हा मी जळगांवला दीपस्तंभ फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये याच मुलांच्या सान्निध्यात होतो.
निमित्त होतं दीपस्तंभ फाउंडेशनच्या वर्धापन दिनाचं परंतु खरा हेतू होता ते यजुर्वेंद्र महाजन याने जिद्दीने उभा केलेला ‘मनोबल’ हा प्रकल्प पाहणं आणि त्याची माहिती करून घेणं. माझ्याबरोबर कवी वैभव जोशीही अगदी याच हेतूने तिथे आला होता.
या प्रकल्पाची माझी पहिली ओळख करून दिली ते नविन काळे या माझ्या मित्राने. ३-४ वर्षांपूर्वी नविनने मनोबलची मुलं चित्त एकाग्र करून ‘हीच अमुची प्रार्थना’ गात आहेत याची एक व्हिडिओ क्लिप करून मला पाठवली होती. ती सर्व मुलं दिव्यांग होती पण त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं आणि आनंद होता, ते पाहून माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
मनोबल हा प्रकल्प दिव्यांग, अनाथ, ट्रान्स्जेन्डर, आणि समाजातल्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत असा पहिला निव��सी शिक्षण प्रकल्प आहे. हे सगळे विद्यार्थी तिथे एकत्र राहून या शिक्षणाच्या यज्ञकर्मात भाग घेतात. दीपस्तंभ मनोबलचं जळगावातलं कॅम्पस हे दिव्यांगांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असं कॅम्पस आहे. प्रत्यक्ष वास्तुमध्ये तर सगळ्या प्रकारची दिव्यांगांना गरजेची असलेली accessibility आहेच पण त्यांच्यासाठी लागणारी शिक्षणसाधनंही state of the art म्हणता येतील अशी आहेत.
संध्याकाळी मी आणि वैभवने तिथे एक अगदी अनौपचारिक असा कार्यक्रम सादर केला. पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमात ज्या नाज़नीन शेख या मुलीने ‘हीच अमुची प्रार्थना’ हे गीत गायलं होतं त्याच मुलीने आमच्या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुरेल अशा गणेशस्तवनाने करून दिली. कार्यक्रम तर तिथल्या सर्व विद्यार्थ्यांनी उचलून धरलाच पण वैभवच्या प्रेमकवितांना जी उत्स्फूर्त दाद येत होती ते बघून माझं मनही भरून येत होतं.
दुसऱ्या दिवशी यजुर्वेन्द्रने मला माऊली अडकुर या दिव्यांग मुलीचा व्हिडिओ ��ाठवला ज्यात तिने माझ्या आणि वैभवच्या कार्यक्रमाला एक दिलखुलास दाद दिली आहे. ती दाद ऐकल्यावर मला आरती प्रभूंचे शब्द थोडे बदलून म्हणावंसं वाटलं - "दाद घ्या आणि शुद्ध व्हा!"
दीपस्तंभमधल्या वातावरणाने मी शुद्ध झालो. या एका दिवसामधे अनेकदा डोळे पाणवले, मन भरून आलं, गळा दाटून आला, चेहऱ्यावर निर्मळ हसू अनुभवलं. या एका दिवसामध्ये एका भावनांच्या रोलरकोस्टरमधून मी गेलो होतो - आनंद, हर्ष, कृतज्ञता, ���हवेदना, अभिमान, दिलासा, आणि ज्या शब्दात मांडतात येणार नाहीत अशा हजारो संवेदना! केवळ एकाच भावनेला मनोबलच्या या विश्वात कुठेच थारा नव्हता. ती भावना म्हणजे - दया.
मीच त्या मुलांकडून प्रेरणा घेऊन परतलो.
ता.क. यजुर्वेंद्र सध्या अमेरिकेत एका व्याख्यान मालिकेच्या दौऱ्यावर आहे. बृहनमहाराष्ट्र मंडळाने ही मालिका आयोजित केली आहे. त्यानंतर परतीच्या वाटेवर तो नेदरलॅन्ड्समध्येही तीन व्याख्यानं देणार आहे. तिथल्या लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
Today’s the #NationalGirlChildDay. Here’s a song written by @AsmitaPande for the short film ‘Pauli’ by Aditya Farad. The film signifies the importance of #BetiBachaoBetiPadhao. The song is an ode to the girl child and her mother who tirelessly works so that her child is educated. The song is in Marathi. Please do listen and share.
@narendramodi sir, please do listen.
https://t.co/UDejHRlXeX
It's Kishore Kumar's birth anniversary, so a special episode of #RearWindow. I never had the good fortune to meet the great man, but I have a great memory of his song, the shoot of which I was a witness to! Do watch and share.
https://t.co/w1HqSdM1GN
A fun question - If singers were beverages, which singer would be which beverage? Find out in today’s episode of #RearWindow!
Rear Window | Episode 8 |Singers and Beverages| Kaushal S Inamdar https://t.co/yXX4GvXC1M via @YouTube#singers@mangeshkarlata
पण आत्ता अचानक ही क्लिप समोर आली आणि अजितदादा आणि सुप���रियाताई यांच्यामधल्या एका हृद्य प्रसंगासाठी हे गीत वापरल्याचं आढळलं!
मला आठवतंय की या गाण्याबद्दल चर्चा होत असताना मी असं म्हटलं होतं की
https://t.co/lym6wZJh8L
मला गाण्याबद्दल काय आवडत असेल ते हे! ह्या क्लिपमध्ये वाजणाऱ्या गाण्याची रचना मी केलीए. गंमत अशी आहे गेल्या निवडणुकीत हे गीत मी @bjpmaha आणि @Dev_Fadnavis यांच्या प्रचारासाठी केलं होतं. (आजवर मी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप या तीनही पक्षांसाठी प्रचारगीतं केली आहेत).
कवी अशोक बागवे यांच्या 'मौनाचा निःशब्द कोलाहल' या पुस्तक प्रकाशनाच्या ऑनलाइन समारंभात मी मांडलेलं मनोगत.
कौशल इनामदार मनोगत । ‘मौनाचा निःशब्द कोलाहल’ प्रकाशन समारंभ। अशोक बागवे। https://t.co/PVSDGS3xbj via @YouTube#मराठी
If you missed the live session do watch it now. I investigate the effect of pronunciation on the words and effect of words on the pronunciation of a singer. #MohammedRafi#lyrics#music#song
For those who missed the live. Have you noticed that Manna Dey has sung more songs in the comedy genre than any other singer and the reason was his unique way of pronunciation of the word? Have you noticed that Mohammed Rafi used to
Have you noticed that Mohammed Rafi responded differently to the poetry of Sahir and the poetry of Shakeel Badayuni? How did the way Manna Dey & Mukesh differ in the way they approached the lyrics of a song? Today at 7:30 PM in next episode of #RearWindow
https://t.co/8DBOsm8JVj
How has technology changed the way we hear and make music? Is technological advancement good for music? Listen to the 5th episode of #RearWindow.
https://t.co/J7Tls9O1LW
#technology#music#movies
How has technology changed the way we make and hear music? Is technology in music a curse or a boon? How far is the use of technology going to go? Let's talk about these questions in today's episode of Rear Window. Today at 7:30 PM on my YouTube channel
https://t.co/J7Tls9O1LW
काल सुधीर फडके यांच्या जन्मदिवसानिमित्त केलेल्या ‘कौशलकट्टा’च्या विशेष भागाला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मनःपूर्वक आभार! असाच लोभ असू द्या! 🙏🏽
https://t.co/B1uIFztK29
माझं भाग्य असं की ज्या थोर लोकांची भेट आयुष्यात एकदा तरी व्हावी असं मला मनापासून वाटलं त्या लोकांचा सहवास तर मला मिळालाच पण या सर्वच थोर लोकांनी अगदी अल्प अशा काळातही मला आयुष्यभर पुरेल असा कलाविषयक आणि जीवनविषयक एक दृष्टकोन दिला. गंमत म्हणजे या सगळ्���ा भेटी