"Citizens have a right to know what is happening in the courts. They have a right to know who their judges are. They have a right to know what kind of judgments a judge has delivered. All this should be in the public domain"- Justice Ujjal Bhuyan, Supreme Court Judge
दादा, ज्यांना MH-CIT आणि MH-CET यातला फरक कळत नाही ते Percentage आणि Percentile च्या, AIIMS, IIM, IIT इतकेच काय तर पंडित जवाहरलाल नेहरू पर्यंतच्या बाता मारू लागले आहेत...
आता काही खरं नाही... भाजपमध्ये स्मृती इराणी नंतर याच !
विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात बंड पुकारले. प्रसंगी पोलिसांचा लाठीचार्ज सहन केला. जवळपास महिनाभर चाललेल्या आंदोलनामुळे काल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.
हे विद्यार्थ्यांच्या लढ्याचे यश आहे. मात्र जेव्हापासून राजीनामा झाला तेव्हापासून अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री, सत्ताधारी आमदार - खासदार धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर लिहित आहेत. जणू काही प्रधान हे निष्पाप आहेत, चांगलं काम करत असतानाही त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांच्यासोबत अन्याय झाला, असा आविर्भाव निर्माण केला जात आहे.
मी विद्यार्थ्यांना आणि राज्यातील शिवभक्तांना सांगू इच्छितो की, धर्मेंद्र प्रधान यांच्याच नेतृत्वाखाली एनसीईआरटीने महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी छेडछाड केली होती. इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून इ.स. १७५९ मधील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्यात आला होता.
या राजीनाम्यामुळे मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास पुसू पाहणाऱ्यांना धडा शिकवला गेला, असे म्हंटल तर वावग ठरणार नाही.
मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक आपण करत असाल, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचं आपण सांगत असाल तर याला काय म्हणावं? राजीनामा त्यांच्या चुकीमुळे दिलेला नाही तर त्यांनी उपकार केला आहे, हे आपल्याला सुचवायचंय का?
गेले महिनाभर महिलांसह हजारो युवकांना लाठ्या काठ्या खाल्ल्या, २०-२५ दिवसांचं उपोषण करावं लागलं, काहींनी pellet gun चा सामना केला तर कुणी छर्रेच्या गोळ्या खाल्ल्या… आजही अनेक जण दवाखान्यात उपचार घेत आहेत, या सगळ्याबाबत आपल्याला कधी सहानुभूती वाटली नाही, पण आज धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल सहानुभूती वाटत आहे.
किती अंधभक्ती करणार?
#अंधभक्तांचे_शिरोमणी