@MeshramDayanand MPSC करते काय??
विद्यार्थ्यांनी चूक लक्षात आणून दिल्यावर दुसऱ्यांदा निकाल लावावा लागला.
विद्यार्थ्यांना MAT आणि HC मधे न्याय मागायला जावं लागत यातच आयोगाचं अपयश आहे.
विद्यार्थी अभ्यासासाठी येतात त्यांना शांतपणे अभ्यास करू द्यावा. बाकी तांत्रिक गोष्टी आयोगाने सांभाळायला हव्यात.
"Once a game is started,rules of the game,shall not be changed in between"हा सर्वमान्य नियम,व्यापक सार्वजनिक हिताच्या प्रकरणी पाळला गेल्यास अशी गोंधळाची स्थिती उद्भवण्याची शक्यता अगदीच अपवादात्मक.तटस्थ,निकोप,तर्कसंगत व नैसर्गिक न्यायाचे कसोटीवर टिकणारे धोरण सातत्य यासाठीच आवश्यक!
उद्या पुण्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींच्या आंदोलनास आम आदमी पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे.
१. Combine जागा वाढ झालीच पाहिजे
२. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 - ४५ दिवसांनी postponed झालीच पाहिजे
विद्यार्थी एकजुटीचा विजय असो ! 🇮🇳
📍उद्या MPSC च्या आंदोलनाला कोण कोण येणार आहे आणि कोठून येणार आहेत ते पण सांगा.
📍जे आळशी लोक आहेत आपण नाही गेले तर काय फरक पडणार असे म्हणणारे, कदाचित तुमच्या कमेंट पाहून आले तर आले🙏
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Jayant_R_Patil
परीक्षार्थींचे “खलनायक” महायुती सरकार………!
उद्या होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शांततामय आंदोलनासाठी परवानगी पुणे पोळीसांकडून ऐनवेळी नाकारण्यात आली आहे.
कारण? “सकाळी पोलीस बंदोबस्तासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत”…… !
हा निर्णय हास्यास्पद नाही का?
जेव्हा सरकारचे कार्यक्रम, रोड शो, राजकीय मेळावे होतात, तेव्हा हजारो पोलीस लगेच उपलब्ध होतात. मग विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठीच पोलीस का मिळत नाहीत?
हा परवानगी नाकारण्याचा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा सरकारी प्रयत्न आहे. हा प्रकार लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट हल्ला आहे!
संधिसाधू फडणवीस सरकारच्या हृदयात धडधड सुरु आहे, कारण हा फक्त विद्यार्थ्यांचा लढा नाही, हे न्यायासाठी पेटलेला जनआंदोलने आहे.
विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे !
#MPSCचा_गोंधळ
#विद्यार्थ्यांचा_आवाज
#परवानगी_नाकारली_पण_लढा_सुरू
#महाराष्ट्राची_तरुणाई_जागी_झाली
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
📍कंबाईन जागा वाढ साठी आणि राज्यसेवा पुढे जावी यासाठी रुपाली ताई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले आहे
📍आदरणीय ताईंना विनंती आहे की आंदोलनात पुढील तिन्ही मागण्यांचा समावेश करण्यात यावा
१) राज्यसेवा पुढे जावी
२) कंबाईन जागा वाढ
३) क्लर्क च्या मुलांना लवकरात लवकर जॉइनिंग द्यावी
📍ताई तुम्हीच नेतृत्व करावे ही तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची इच्छा आहे, तरच यामध्ये सरकार लक्ष घालून काही तरी तोडगा काढेल कारण तुम्ही सरकार मध्ये आहात.
#combinejagavadh
#rajysevapostpone
#clerkjoining
@mpsc_office@PawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@supriya_sule@RRPSpeaks@MahebubShaikh20
अनेक दिवसांपासून विद्यार्थी पाठपुरावा करत असतानाही आयोग किंवा सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीची दखल घेत नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय येतो का?
आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा महायुती सरकारच्या दृष्टीने गुन्हा आहे का? पुण्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का?
एकतर चुका करायच्या आणि पुन्हा चुका दाखवून देणाऱ्यांवरच कारवाई करायची हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही.
सरकारने आणि #MPSC ने विद्यार्थ्यांच्या राज्यसेवा परीक्षेबाबत असलेल्या सर्व आक्षेपांवर योग्य निर्णय घ्यावा आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांची त्वरीत सुटका करावी, ही विनंती!
@RRPSpeaks@Dev_Fadnavis@mpsc_office
आमचे आंदोलन (11 एप्रिल 2025) आणि वास्तव (TREAD)
आंदोलनातल्या दोन प्रमुख मागण्या
1. राज्यसेवेमध्ये जे तांत्रिक आणि न्यायालयीन अडचण येऊ शकतात त्या दूर करणे आणि मगच मुख्य परीक्षा घेणे त्यासाठी मुख्य परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी.
2. कम्बाईन 2024 च्या जागा वाढ कराव्या. (1/9)
#आधारवड
राज्यात कोणत्याही घटकाला काही अडचण असेल तर त्याचा आवाज ऐकून घेणारी राज्यात एकमेव हक्काची व्यक्ती आहे ती म्हणजे आदरणीय पवार साहेब!
सरकारच्या अन्यायाविरोधात काल पुण्यात रस्त्यावर उतरलेल्या #MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनीही अन्यायच केला.. यासंदर्भात आज आदरणीय साहेबांनी विद्यार्थ्यांना भेटून त्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याचा विश्वास दिला.
@PawarSpeaks@mpsc_office
मुख्यमंत्र्यांनी @Dev_Fadnavis आणि @mpsc_office तात्काळ लक्ष द्यावे.
राज्यसेवा 2024 ची मुख्य परीक्षा पुढे ढकलावी व Combine जागावाढ करावी या प्रमुख मागणीसाठी MPSC चे विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
राज्यसेवा 2024 च्या मुख्य परीक्षेचा निकाल दोन वेळा लावला आहे,असे पूर्वी घडलेले नाही. काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेल्या या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून जावे लागले आहे.
सुधारित निकालात नव्याने समाविष्ट झालेले विद्यार्थी व तांत्रिक बाबींमुळे वेळ वाया गेलेल्यांना अभ्यासासाठी नियमानुसार 45 दिवसांसाठी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.