शेवटी, आपण अन्यायाविरुद्ध उठवलेल्या आवाजाला, सुरुवात केलेल्या लढ्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळण्यास सुरुवात झालीच.
मा. आयोगाची गती इतकी वेगवान झाली की त्यांना विद्यार्थ्यांचे योग्य प्रमाणपत्र तपासण्यासाठी सुद्धा वेळ भेटला नाही का.?
खालील प्रकरणाची स्पष्टता आयोगाने द्यायला हवी.
प्रति,
मा. रजनीश सेठ,
अध्यक्ष,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बेलापूर.
विषय: राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ पूर्वस्थितीतच घेण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध व फेरविचाराची मागणी.
महोदय,
राज्यसेवा आयोगातर्फे आज दिनांक २६ मे २०२५ रोजी निर्गमित केलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ ही २७, २८ व २९ मे रोजीच पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
हा निर्णय पूर्णतः अघोर, अमानवी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या आणि मानसिक आरोग्याच्या विरोधात असून आम्ही त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हाय अलर्ट जाहीर केलेला आहे. पुणे, मुंबई, कोकण, विदर्भात पुर, अतिवृष्टी, वीज खंडित होणे, वाहतूक ठप्प होणे या गंभीर अडचणी विद्यार्थ्यांपुढे उभ्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये रेड अॅलर्ट असून सुरक्षित प्रवास शक्य नाही. तरीही आयोगाने हे वास्तव, विद्यार्थ्यांचे निवास-प्रवास प्रश्न, वरील संकटे आणि परीक्षा एकत्र येणाऱ्या इतर महत्त्वाच्या शैक्षणिक/स्पर्धा परीक्षा याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
ही परीक्षा “समान संधी” या घटकातील मूलभूत तत्त्वांचा आणि मानसिक स्थैर्याच्या गरजेचा स्पष्ट उल्लंघन करत आहे. सर्व विद्यार्थी ‘परीक्षा केंद्रावर उपस्थित राहतीलच’ हे गृहीतक आयोगाने कसे घेतले?
या निर्णयामुळे ग्रामीण, महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील उमेदवारांवर अन्याय होतो आहे.
आपल्या प्रसिद्धीपत्रकातील पुढील विधाने खासकरून धक्कादायक आहेत:
“परिस्थितीचा परिणाम उमेदवारांच्या परीक्षा उपस्थितीवर झाल्यास, त्याची जबाबदारी उमेदवारांची असेल.”
ही भाषा म्हणजे एका सार्वजनिक आयोगाने जबाबदारी झटकून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवावर परीक्षा देण्यास भाग पाडणं आहे.
म्हणूनच, आम्ही खालील मागण्या अत्यंत ठामपणे मांडत आहोत:
१. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ तत्काळ पुढे ढकलावी.
२. परीक्षेची नवी तारीख एक आठवड्यांनंतर जाहीर करावी जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना योग्य नियोजन करता येईल.
३. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, समानता व मानसिक स्वास्थ्य या तत्त्वांचा विचार करून आयोगाने स्वतःहून पुढाकार घ्यावा.
विद्यार्थ्यांचे आयुष्य, मेहनत, आणि स्वप्ने आयोगाच्या नियोजनशून्यतेमुळे उध्वस्त होणार असतील, तर आम्ही सामाजिक, कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने याविरोधात आवाज उठवत राहू.
आपण हा निर्णय त्वरित मागे घ्यावा व नव्याने निर्णय घ्यावा ही विनंती नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आमची ठाम मागणी आहे.
आपला विश्वासू,
धनंजय शिंदे
मो. ९८६७६९३५८८
प्रत,
मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य
मा. हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
@mpsc_office@Dev_Fadnavis@INCHarshsapkal@INCMaharashtra@Drsuvarnas@Mpsc_Andolan@CMOMaharashtra
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ – दिनांक: २७, २८, २९ मे
सध्या राज्यात अनेक जिल्ह्यांत सलग तीन दिवसांपासून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषतः ज्या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षेची केंद्रे आहेत, त्या ठिकाणी High Alert जाहीर करण्यात आलेला आहे. ही परीक्षा सलग तीन दिवस चालणार आहे.
आजची परिस्थिती पाहता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मा. आयोगाने स्वतः पुढाकार घेऊन ही परीक्षा पुढे ढकलणे गरजेचे आहे. अन्यथा, या परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची योग्य सोय करावी, ही नम्र विनंती.
कालपासून महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी अत्यवस्थ स्थिती निर्माण झाली आहे. कालच निरा कालवा फुटल्यामुळे परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पुणे-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. मुंबईत भरदिवसा अंधार पडला होता. आजच अधिकृतपणे मान्सून दाखल झाल्याचे जाहीर झाले असून, रस्ते बंद आहेत, लोकल ट्रेन सेवा विस्कळीत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या केंद्रावर पोहोचायचे तरी कसे?
विद्यार्थ्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आणि तेथे जाऊन परीक्षा देण्याची मानसिकता ठेवणे हे अत्यंत कठीण आहे. विशेषतः महिला उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
सर्व उमेदवारांना परीक्षा देण्याचा समान अधिकार आहे. वर उल्लेखित नैसर्गिक अडथळ्यांमुळे कोणत्याही उमेदवाराची संधी हिरावली जाणे अन्यायकारक ठरेल.
या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून आपण न्याय्य व संवेदनशील निर्णय लवकरात लवकर घ्यावा, ही नम्र विनंती.
@mpsc_office@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks #MPSC2024 #MPSCMain
#PostponeMPSC #SaveStudents #RainAlert #MPSCExam
✅राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
दिनांक: २७, २८, २९ मे – सलग तीन दिवस
✅राज्यात अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती असून पुढील काही दिवसांसाठी ❌High Alert❌ जाहीर आहे.
✅ही परीक्षा सलग तीन दिवस चालणार असल्याने, विद्यार्थ्यांना 🚔प्रवास व निवासाची मोठी अडचण येणार आहे.
@Dev_Fadnavis
पुणे जिल्हा आणि परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून संततधार आहे. यामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत उद्या होणाऱ्या अभियांत्रिकी विभागासह इतर परिक्षांना उपस्थित राहण्यात विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माझी नम्र विनंती आहे की, कृपया आपण विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून उद्या होऊ घातलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार करावा. धन्यवाद.
@ChDadaPatil
@supriya_sule राज्यसेवा मुख्य परीक्षा दिनांक 27 मे ते 29 मे पर्यंत सलग तीन दिवस होणार आहे. राज्यभर पडणाऱ्या पावसामुळे विद्यार्थ्यांची अतिशय गैरसोय होत आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की, त्यासंदर्भात सुद्धा mpsc ला तुम्ही सूचना द्याव्यात.
पुण्यात MPSC उमेदवारांचे आंदोलन!
त्यांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत.
1. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील तांत्रीक अडचणी दूर करून परीक्षा पुढे ढकलावी.
2. संयुक्त परीक्षा गट ब 2024 मध्ये PSI, STI, ASO, SR पदांच्या जागा वाढवाव्यात.
@mieknathshinde
@News18lokmat शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका.
आपल्याच व्हिडिओखाली आलेल्या प्रतिक्रिया पाहून एकदा आत्मपरीक्षण करा.
https://t.co/sXc0yGbn8w
s
भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांची पोरं Collector Office ला आपल्या मागण्या घेऊन बसले आहेत.
१. राज्यसेवा,वने,कृषी,अभियांत्रिकी मुख्य परीक्षा किमान ४५ दिवस पुढे ढकलण्यात याव्यात. @mpsc_office
२. कंबाईन २०२४ जास्तीत जास्त जागावाढ व्हावी @CMOMaharashtra
किती वेळ चटके बसू द्यायचे हे ठरवा !!
🔴आज कलेक्टर ऑफिस येथे Mpsc विद्यार्थ्यांचे आंदोलन.
📌 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व क 2024 जागा वाढ.
जोपर्यंत वरील मागणीसाठी सरकारकडून ऑन रेकॉर्ड काहीतरी ठोस आश्वासन येणार नाही तोपर्यंत उठायचं नाही.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaChiefSec#Combine_जागावाढ_2024
🙏🌱
युवांच्या हक्कांसाठी #साहेब सदैव मैदानात !
#combine जागावाढ तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी काल आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. या दोन्ही विषयात साहेब व्यक्तिशः लक्ष घालत असून आयोगाशी साहेबांनी बोलणे केले आहे. मुख्य परीक्षेसंदर्भात आजच निर्णय होईल, ही अपेक्षा आहे तर combine परीक्षेसंदर्भात साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून जागावाढीचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल.
#mpsc
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
@suvishelke या सर्व गोंधळावर फक्त परीक्षा पुढे घ्या हे उत्तर नाही होऊ शकत.
"EWS/SEBC/OBC आरक्षण, जुने हॉल तिकीट, मार्क्स असूनही निकालात नाव नसणे, ratio" या सर्व समस्या दूर करून मग मुख्य परीक्षा घेतली पाहिजे. तरच सर्वसमावेशक न्याय आणि परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता राखली जाईल.....