#WarAgainstVirus या कोरोनासोबत पुकारलेली लढाई लढणारे डॉक्टर्स, परिचारिका,सपोर्टिंग स्टाफ यांच्यासह पोलीस दल यांना आम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून मानवंदना दिली.विषाणूला पराभूत करण्यासाठी या सर्वांनी दाखविलेली जिद्द,एकी आणि कर्तव्यपरायणता अद्भुत आहे.या सर्वांना पुन्हा एकदा सलाम.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काल राज्य सरकारने नागरी भागात जमावबंदी आदेश लागू करूनही लोक रस्त्यावर घोळक्याने जमा होत आहेत. वाहनांवरून जाणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. इतर देशांतील परिस्थिती ध्यानात घेता नागरिकांनी वेळीच गांभीर्याने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.