*फॉन्ट जरा बारका आहे . . .*
फॉन्ट जरा बारका आहे हरेक वाक्यात वाटतं
श्रद्धांजली वाहताना आभाळ पाठीमागून फाटतं
तरी डोळे चालत रहातात, पण जीभ वळत नाही
पीएला जोडाक्षरांचा सोस का? हेच कळत नाही
तितक्यात वादळागत एक शब्द डोळ्यासमोर येतो
काना-मात्र-उकार-वेलांटी भुर्रर्र उडवून नेतो
वाक्ये उनाड मुलासारखी सैरावैरा पळत राहतात
श्रोते कावरेबावरे होऊन कुठे अर्थ दिसतो का पाहतात
जोडाक्षरे संपली तरी अडखळण्याचा सुरुच राहतो खेळ
दीनानाथांवर येते दिनदयाळ बनण्याची वेळ
पुसट फॉन्टवर जबाबदारी ढकलून वेळ मारून नेतो
खुर्चीवरच्या धेंडामधे कुठून निबरपणा येतो?
मूळ कविता : ऊन जरा जास्तच आहे (किशोर कदम सौमित्र, अल्बम : गारवा)
विडंबन: सॅबी परेरा (अल्बम : नारवा)
... पण, त्याचवेळी असंख्य मराठी तरुण तरुणी पाशवी सत्तेचा प्रतिकार करतानासुद्धा दिसत आहेत.
आज त्यांचा आवाज क्षीण असेल पण त्यांचा संघर्ष निर्णायक ठरणार आहे.
प्रतिकार हा महाराष्ट्राचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच
महाराष्ट्र याही संकटाला पराभूत करेल आणि पुन्हा झळाळून उठेल!
Gen-Z
आज सुट्टी आहे.
स्टेटस लावायचा दिवस.
DP बदलायची संधी.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती.
फोटो. पुष्पहार. भाषण.
आणि मग… Netflix.
आपण “जय भीम” म्हणतो .
छान.
पण भीमाचे अत्युंग साहित्य वाचतो का?
ते 22व्या वर्षी Columbia University मध्ये.
25व्या वर्षी संशोधन.
27व्या वर्षी प्राध्यापक.
29व्या वर्षी वृत्तपत्र.
आपण ?
22व्या वर्षी… reels.
25व्या वर्षी… confusion.
27व्या वर्षी… “settle होतोय”.
प्रगती? नक्की.
देशात समस्या नाहीत.
सगळं ठीक.
बेरोजगारी?
“Skill issue”.
असमानता?
“Mindset problem”.
लोकशाही?
“Election झालं ना!”
खाजगीपणा?
“Nothing to hide”.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले—
“शिका. संघटित व्हा. संघर्ष करा.”
आपण काय केलं?
शिका → Google search.
संघटित व्हा → WhatsApp group.
संघर्ष करा → Twitter rant.
क्रांती पूर्ण.
महामानव
जातिव्यवस्थेवर संशोधन करतात.
कायद्याचं शिक्षण घेतात .
संविधान घडवतात.
आपण
comment section मध्ये भांडतो .
meme बनवता.
आणि स्वतःला “जागृत ” समजतो.
छान चाललंय.
त्यांनी विचारले —“Why inequality?”
आपण विचारतो —“Which filter looks better?”
ते लिहितात —
Annihilation of Caste
Castes in India: Their Mechanism, Genesis and Development
Who Were the Shudras?
The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables
The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution
States and Minorities
Pakistan or the Partition of India
The Buddha and His Dhamma
Riddles in Hinduism
Philosophy of Hinduism
The Rise and Fall of Hindu Women
Waiting for a Visa
तुम्ही लिहिता—
“Feeling cute. Might delete later.”
प्रश्न असा नाही की
तुम्हाला माहिती नाही.
प्रश्न असा आहे की
तुम्हाला फरक पडत नाही.
देश बदलतोय.
तंत्रज्ञान वेगात.
समाज ताणात.
राजकारण तापात.
तुम्ही?
notification मध्ये.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
पुस्तकं वाचली.
पुस्तकं लिहिली
प्रश्न विचारले.
व्यवस्थेला आव्हान दिली.
तुम्ही
forward वाचता.
प्रश्न टाळता.
व्यवस्थेला like करता.
जयंती साजरी करणे सोपं आहे.
विचार जगवणे कठीण.
फोटो लावणे सोपं.
विचार स्वीकारणे कठीण.
घोषणा देणे सोपं.
संघर्ष करणे कठीण.
Gen Z,
थोडं थांबा.
स्क्रोल थांबवा.
डोळे वर करा.
देश बघा.
जग बघा.
स्वतःला बघा.
तुम्ही इतिहासातील
सर्वात connected पिढी.
पण सर्वात disconnected मन.
सगळं माहिती.
काहीही समजत नाही.
जर खरंच आदर असेल—
DP लावाच.
पण पुस्तक उघडा.
पोस्ट करा, पण कृतिशीलसुद्धा व्हा .
प्रश्न विचारा.
“जय भीम” म्हणा.
पण “भीम” जास्त जगा.
कारण
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
त्यांना केवळ followers नको होते.
त्यांना विचार करणारे लोक हवे होते.
कृती करणारे followers हवे होते.
आपण तयार आहोत का?
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
-महेश झगडे
आज खरंच काही लिहावंसं वाटत नाही. एक नागरिक म्हणून आपला राजकीय प्रक्रियेत काय सहभाग असू शकतो याचा विचार करकरून डोकं पार भंजाळून गेलं.
इराणची युद्धनौका अमेरिकेने हिंदी महासागरात बुडवली. ही युद्धनौका भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या maritime exercise मध्ये भाग घ्यायला आली होती. पण आज
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने मराठी भाषा दिनानिमित्त 'मराठी भाषा संवर्धन' पुरस्कार देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मानचिन्ह आणि ५१ हजारांचा धनादेश देऊन सन्मानित केले.याप्रसंगी मी जे मनोगत व्यक्त केले ते शिवसेना पक्षाच्या समाजमाध्यमांवर आहेच.मराठी अभ्यास केंद्राची टीमही ते उद्या टाकेल.
शिवसेना पक्षप्रमुखांचे आणि खासदार अनिल देसाई,अरविंद सावंत व इतर आयोजकांचे आभार.
अद्भुत…!
उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची ही गर्दी पाहून अचंबा वाटतो.आपली साथ सोबत जर अशीच राहीली तर नाशिक लोकसभेचा गड आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही.
इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार…!
#nashikloksabha2024