मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सकाळ वृत्तपत्राचे संपादक राहुल गडपाले आणि त्यांच्या पत्रकार टीमने मुलाखत घेतली, यावेळी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत पक्षाची भूमिका मांडली.
#AshishShelar
कोण आहे हा…केडीया नावाचा भेडीया.
हो आहे महाराष्ट्र आमच्या बापाचा. राज ठाकरे असोत किंवा कुठलाही मराठी माणूस, आम्ही हे छाती ठोकून सांगू की आहे हा महाराष्ट्र आमच्या बापाचा. आमच्या बाप तो आहे ज्याला अवघं जग छत्रपती शिवाजी महाराज म्हणुन ओळखतो, आमचा बाप तो आहे ज्याने या देशाला घटना दिली, आमचा बाप तो आहे ज्याने मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला. आम्ही घटना जाणतो आणि मानतो देखील. त्यामुळे भाषा हा प्रत्येक माणसाचा घटनात्मक अधिकार आहे, हे सुद्धा आम्हाला माहीत आहे. त्यामुळे कुणीही मराठी शिकायची तुमच्यावर बळजबरी केलेली नाही. पण हे लक्षात ठेवा जसं कुठल्या भाषेत बोलायचं हा तुमचा अधिकार आहे तसंच दुसऱ्या भाषीकांचा अपमान होणार नाही हे सुद्धा आपण पाहिले पाहिजे. त्यावरुन जर मराठी अस्मितेला नख लावायचा प्रयत्न कराल तर लक्षात असू द्या वाघनखं वापरणारा पहिला माणूसही मराठीच आहे आणि हे जर तुम्ही सामाजिक उद्वेग पसरविण्याच्या उद्देशाने केले असेल तर मराठी माणूस तुम्हाला कधीच माफ करणार नाही. #केडीयानावाचाभेडीया #मराठीभाषा #kedia @RajThackeray #RajThackeray #Maharashtra #mumbai #मुंबईआमच्याबापाची