ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं. हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई हे दृढ समीकरण. मुंबई आली की इथली रंगभूमी, इथलं व्यावसायिक सिनेमाचं जग, इथल्या झोपडीपासून, चाळीपासून कुठेतरी रोज या शहरात स्वतःचं अस्तित्व शोधण्या��ा प्रयत्न करणारा इथला मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आला, पुढे याच शहरातला आणि हळूहळू या देशातील उध्वस्त होत गेलेला कामगार वर्ग आला, त्यातून आलेल्या सामाजिक नैराश्यातून उदयाला आलेलं अंडरर्वल्डचं विश्व असेल, सामाजिक सलोखा बघता बघता विस्कटून जाण्याचा काळ असेल, पुढे याच मध्यमवर्गाच्या आकांक्षा उदारीकरणानंतर विस्तारत जाणं आणि या सगळ्याच्या भोवती फिरणारं राजकारण. या प्रत्येक टप्प्यात नाना पाटेकर कधी नाटकातून कधी सिनेमातून दिसले. हमीदाबाईची कोठीपासून ते परिंदा ते क्रांतिवीर ते अब तक छप्पन ते अगदी नटसम्राटपर्यंत प्रत्येक ठिकाणी नाना पाटेकर दिसत राहिले . या प्रत्येक टप्प्यावरची कुठेतरी अस्वस्थता उराशी घेऊन जगणारा सामान्य माणूस नाना पाटेकर कधी पडद्यावर तर कधी रंगभूमीवर ��भा करत राहिले .
सामान्य माणसाच्या मनात सातत्याने राग, अपमान, शक्तिहीनता, नैराश्य, अनैतिक गोष्टींबद्दलची घृणा, व्यवस्थेबद्दलची निराशा, वर्ग संघर्ष हे सगळं आत धुमसत असतं. ते अगदी कधीतरी किरकोळ भांडणं किंवा घरातील आदळआपट यातून बाहेर पडतं, अन्यथा ते आत धुमसत राहतं. हे धुमसत राहणं, प्रेशर कुकर सारखं आत रटरटत राहणं हेच त्याच्या वाट्याला येतं. नानांच्या अभिनयाकडे बघताना हा सामान्यांच्या आयु��्यातला भावनांचा प्रेशर कुकर बघतोय असं वाटायचं. आणि मग कधीकधी नाना असतील किंवा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन असतील यांनी पडद्यावर केलेले दोन हात ही माणसाच्या मनाच्या प्रेशर कुकरमधील वाफ बाहेर काढतात. मी जसं नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, किशोर कुमार, रफी साहेब, इत्यादी गायकांनी ,संगीतकारांनी, चित्रपट तसेच नाटक निर्माते,दिग्दर्शक, कलाकारांनी भारतीयांचं किमान ६०/७० वर्ष मन रिझवलं तसंच नाना असतील किंवा बच्चन साहेब असतील यांनी आतली वाफ पडद्यावर ताकदीने बाहेर काढली म्हणून ठीक नाही तर या देशांत दर महिन्याला अराजकता निर्माण झाली असती.
नानांच्या अभिनयाकडे बघताना मला नेहमीच हॉलिवूडमधल्या मॉर्गन फ्रीमन यांची आठवण येते. रूप असेल व्यक्तिमत्व असेल दोघेही तत्कालीन बॉलिवूड किंवा ह���लिवूडच्या कलाकाराच्या पठडीत बसणारे अभिनेते नाहीत. मॉर्गन फ्रीमन यांच्याकडे पाहिल्यानंतर अनेकदा असं वाटतं की या माणसाने काळाच्या ओघात शहाणपण, पेशन्स, आणि आहे हे हे असं आहे हे स्वीकारलेपण आत्मसात केलं आहे. तर नानांच्या अभियाकडे पाहून मला राग, चंचलता, आणि खूप खोल साठलेलं नैराश्य जाणवायचं. या माणसाने खूप बघितलंय असं वाटणारा मॉर्गन फ्रीमन आणि या माणसाने खूप भोगलंय आता बस असं वाटणारे नाना. माणसाची दोन टोकाची रूपं असतात. यातलं दुसरं टोक नाना मनस्वीपणे पडद्यावर आणू शकायचे म्हणून ते मोठे कलाकार होते.
२००० च्या दशकांत गोरे गोमटे आखीव रेखीव गुळगुळीत दिसणाऱ्या नटांच्या ऐवजी कथा ही सिनेमाच्या पटावर आली आणि ती कथा सांगणारे नट आणि प्रेक्षकाला ओढून आणणारे नट यांच्या चलतीचा काळ सुरु झाला. आणि या युगाचे पहिले नायक १००% नाना होते. आज चरित्र अभिनेत्यांची जी चलती दिसत आहे, त्याला वाट नानांनी करून दिली.
पण इतकं सगळं असून देखील त्यांचा स्वभाव मनस्वी होता, मनात येईल ते बोलायचे, फटकळ होता (खरंतर मी कोणाला फटकळ म्हणणं चुकीचंच आहे. असो) यामुळे नानांना चित्रपटात घ्यायची इच्छा असली तरी निर्माते दिग्दर्शक टाळायचे, याने नानांचं नुकसान झालं का ? माहित नाही, ते बेफिकीर होते. पण १००% हिंदी चित्रपटसृष्टीचं आणि प्रेक्षकांच नुकसान झालं. नवाझउद्दीन सिद्दीकी किंवा इरफान ��ान( जे आज आपल्यात नाहीत) हे तसे उत्तम कलाकार, परंतु नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर कदाचित या आणि अशा काही कलाकारांना ज्या संधी मिळाल्या त्या मिळाल्या असत्या का, याबद्दल मनात शंका निर्माण होते. नानांनी नुसताच आक्रमक किंवा गंभीर अभिनय केला नाही तर वेलकम चित्रपटातून त्यांनी विनोदी भूमिका देखील तितक्याच ताकदीने उभ्या करू शकतो हे जगाला दाखवले !
नाना गेले, पण नानांनी पडद्यावर ���भा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला आहे. त्याचा राग आहे, त्याची अस्वस्थता आहे, त्याचा अपमान आहे, त्याची धडपड आहे आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याची अधूनमधून उसळणारी ताकदही आहे. कदाचित म्हणूनच नानांना निरोप देताना केवळ एका मोठ्या अभिनेत्याला आपण निरोप देत नाही आहोत तर समाजातल्या सामान्य माणसाच्या मनात साठत गेलेल्या असंख्य भावनांचा एक चेहरा आज आपल्यातून निघून गेला आहे.
न��ना पाटेकरांना महाराष्ट्र नवनिर्माण से��ेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
राज ठाकरे ।
@iShankarJagtap@shekhardalal@PCMCSarathi@Rahul_Kalate@NavnathDhawale6
Kate wasti chowk to VJ yashone Infinitee main gate road patch of 100-150 mtr is having a lot of construction debris &level mismatch bcoz of which bike slippage incident happened.Plz repair road with tar.
Shri Ratan Tata Ji was a visionary business leader, a compassionate soul and an extraordinary human being. He provided stable leadership to one of India’s oldest and most prestigious business houses. At the same time, his contribution went far beyond the boardroom. He endeared himself to several people thanks to his humility, kindness and an unwavering commitment to making our society better.
@PCMCSarathi@shekhardalal our VJ Yashone Infinitee Punawale society haven't received PCMC water from last 3 days.We are really frustrated,in the rainy season u guys r not able to supply drinking water on alternate days as well.Daily 20 tankers we require due to low pressure
@AjitPawarSpeaks Ajit Pawar Announces 11 New Police Stations in Pune and Pimpri Chinchwad at NCP Rally https://t.co/L87KUdl7OL
Dada,Punawale is also now a very big area in terms of population so we are expecting a separate police station for Punawale.Could you plz consider req
Dear Team India,
Your talent and determination through the World Cup was noteworthy. You've played with great spirit and brought immense pride to the nation.
We stand with you today and always.
@shekhardalal AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis@mieknathshinde Great job sir , please cancel or relocate Proposed SWM plant from Punawale area.This was proposed in2008 when Punawale was outer area but now it is the most crowded area& health of more than lakh people at risk
14th July 2023 will always be etched in golden letters as far as India’s space sector is concerned. Chandrayaan-3, our third lunar mission, will embark on its journey. This remarkable mission will carry the hopes and dreams of our nation.