पुणे महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यामध्ये प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळं ही प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम साहेब यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या या आक्षेपांची सखोल चौकशी करण्याचं आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणालाही नियुक्त देणार नसल्याचं आश्वासन यावेळी आयुक्त साहेबांनी दिलं. तसंच नॉर्मलायझेशनमुळं कोणत्याही विद्यार्थावर अन्याय होणार नाही, याबाबतही त्यांनी आश्वस्त केलं.
#पुणे_महापालिका #पदभरती_घोटाळा
PMC भरती परीक्षेमध्ये झालेल कथित हा गैरप्रकार की दुसर काय?
महानगरपालिका प्रशासन शांत का ?
विद्यार्थ्यांना गोंधळात टाकून DV लिस्ट publish करणे किती योग्य ?
विद्यार्थ्यांकडून १०००/९०० रुपये तुमच्या किश्या भरण्यासाठी घेता का?
@PMCPune#pmc
पुणे महापालिका भरतीत 26 डुप्लिकेट उमेदवार?
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती निकालात तब्बल २६ उमेदवारांची नावे दोनदा आढळली आहेत. नोंदींमध्ये वेगवेगळे रोल नंबर आणि वेगवेगळे प्रवर्ग नमूद आहेत.
निकालाच्या पहिल्याच पानावर सर्व मजकूर टाईप असताना फक्त तारीख मात्र हस्ताक्षरात आहे. सही डिजिटल नाही तर इमेज आहे.पहिल्याच पानावर "पान क्र. 31" असा उल्लेख दिसत असल्याने मूळ फाईलशी छेडछाड झाल्याची शंका येते.
याशिवाय, भरती परीक्षा तीन वेगवेगळ्या दिवशी झाल्याचे असताना Normalization पद्धतीचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. निकालाच्या PDF मध्ये Editable DOCX File Path दिसत असल्याची बाबही दस्तऐवज व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित करते. तसेच Digital Signature किंवा Tamper-Proof Authentication, Final Answer Key, Objection Report आणि Subject-wise Marks सार्वजनिक नाही.
या प्रकरणात स्वतंत्र Digital Forensic Audit, Recruitment Process Audit आणि तांत्रिक चौकशी करून सर्व तथ्ये सार्वजनिक करावीत.
@navalMH@PMCPune
#पुणे_महापालिका #कनिष्ठ_अभियंता_भरती #Transparency #DigitalForensicAudit #JusticeForCandidates #26_डुप्लिकेट_उमेदवार
राज्याचे दोन्ही जलसंपदा मंत्री @RVikhePatil@girishdmahajan माजी वनमंत्री @SMungantiwar साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले. याबाबत @CMOMaharashtra देखील स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.
#WRD_JE
युवांना नोकऱ्या देऊ, बेरोजगारांना भत्ता देऊ या आश्वासनाच्या बळावर सत्ता मिळवणारे महायुतीचे सरकार आज मात्र युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतीबंधानूसार ८ हजारहून अधिकची पदे रिक्त असतानाही पदभरती केली जात नाही. वारंवार राज्यभरातील युवांकडून मंत्र्यांना निवेदने दिली गेली पण यावर अजूनही कारवाई झालेली नाही. परिणामी आज संभाजीनगर येथील जलसंधारण विभागाच्या कार्यालयाबाहेर युवांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
तरी सरकारने तात्काळ जलसंधारण विभागाच्या रिक्त पदांसह इतरही विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करावी व परिक्षा #TCS केंद्रावरच घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#WCD #पदभरती
राज्य सरकारने वारंवार घोषणा करून बेरोजगारांची दिशाभूल केली असून प्रत्यक्षात जलसंधारण विभागातील एकही जाहिरात, आकृतीबंधाचा निर्णय किंवा भरती प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. त्यामुळे वाल्मी, छत्रपती संभाजीनगर येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे भव्य ‘रोजगार सत्याग्रह’ आंदोलन प्रदेश सरचिटणीस व रोजगार विभागाचे संयोजक धनंजय शिंदे आणि शहर जिल्हाध्यक्ष युसूफ शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
राज्यातील लाखो बेरोजगार अभियंते आणि युवकांची थट्टा करणाऱ्या राज्य सरकारला ठोस इशारा देत काँग्रेस पक्षाने आज स्पष्ट केले की, जोपर्यंत जलसंधारण विभागाचा आकृतीबंध मंजूर होत नाही, तोपर्यंत जलसंधारणमंत्री संजय राठोड यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही!
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वाल्मीच्या आयुक्त डॉ. अंजली रमेश यांना निवेदन सादर केले. आकृतीबंध तातडीने मंजूर करणे आणि सर्व रिक्त पदांची तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली. आयुक्त डॉ. रमेश यांनी, “सदर मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून राज्य सरकारशी तातडीने चर्चा करू; निर्णयाबाबत बेरोजगारांना माहिती देण्यात येईल,” असे आश्वासन दिले. युवकांना न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल आणि सरकारच्या खोट्या आश्वासनांना आता जिल्ह्यात स्थान राहणार नाही.
यावेळी महिला काँग्रेस अध्यक्षा दीपालीताई मिसाळ, प्रदेश सचिव प्रकाश भगनुरे पाटील, प्रदेश सचिव प्रवीण केदार, प्रमोद सोनवणे तसेच स्थानिक कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, बेरोजगार तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@Dhananjay4INC
#rojgar #chatrapatisambhajinagar
जलसंधारण विभाग पदभरतीचा पंचवार्षिक.....!
पदभरती घोषणा - 2024
आकृतीबंध -2025/26
प्रत्यक्ष जाहिरात (शक्यता) – 2026
नियुक्ती – 2027
लोकशाहीच्या पाण्यात उमेदवारांचा संयम अजूनही तरंगतोय.!
@SanjayDRathods@naikindranil@Dhananjay4INC
पुढील काही दिवसांत #WALMI , छत्रपती संभाजीनगर येथे “जलसंधारण विभाग पदभरतीसाठी” जोरदार मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे! या मोर्च्यात राज्यातील बेरोजगार तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.
डिसेंबर २०२४ पासून आज पर्यंत ९ वेळा पदभरतीचे माध्यमांतून लाखो बेरोजगारांना आश्वासन देऊन ती पूर्ण न करता जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी “बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली” आहेत. आता संघर्षाशिवाय पर्याय नाही! ✊
@INCHarshsapkal@VarshaEGaikwad@INCMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SanjayDRathods@degree_holders@Mpsc_Andolan
#RojgarCongress #रोजगारसत्याग्रह
महाराष्ट्र शासनातील सर्व विभागाच्या सरळसेवा पदभरती जाहिराती येत असताना जलसंधारण विभाग का जाहिरात प्रसिद्ध करत नाही....?
#जलसंधारण_पदभरती
मंत्री महोदय उत्तर द्या....
@SanjayDRathods@naikindranil
हे पण आपण स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून केलेले ट्विट आहे.
बेरोजगार विद्यार्थ्यांना अजून किती दिवस नादी लावणार आहे जलसंधारण विभाग....?
हेच का गतिमान सरकार.....?
@Dev_Fadnavis@SanjayDRathods
अधिवेशन काळात सभागृहात देखील अनेक वेळा पदभरती बाबत घोषणा झालेल्या आहेत परंतु अद्याप देखील पदभरती बाबत काही ठोस पाऊले उचलली जात नाहीत. जर लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध झाली नाही तर दिवाळी नंतर सर्व बेरोजगार विद्यार्थ्यांना घेऊन #WALMI बाहेर उपोषण करायला बसावे लागेल.