उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना लवकरात लवकर शासकीय आस्थापनेत समाविष्ट करून रोजगार देण्यात यावा, अशी या पत्राद्वारे मागणी आहे.
#महा_युवा_प्रशिक्षणार्थी@mieknathshinde
अहिल्यानगर मध्ये उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांना युवा प्रशिक्षणार्थी संघटनाच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक येळे, प्रवक्ते युवराज तरवडे, राहुरी तालुकाध्यक्ष राहुल कोकाटे, सचिव प्रल्हाद क्षीरसागर,शाहनवाज मनियार उपस्थित होते.
#महा_युवा_प्रशिक्षणार्थी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांनी काल नागपुरात आंदोलन केल्यावर त्यांना बदडून काढण्यात आले, निवडणुकीत सरकारसाठी हे तरुण राबले त्याचे बक्षीस त्यांना देण्यात आले.
या तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यांना सरकार रोजगार देणार का?*
काँग्रेस विधिमंडळ नेते यांचा सरकारला सवाल!
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आता त्या तरुणांना रस्त्यावर सोडले आहे. काल आंदोलन केले तर त्यांना बदडून काढण्यात आले ही कसली व्यवस्था असा सवाल उपस्थित केला.
निवडणुकी आधी ही योजना आणली ,आता ती योजना बंद करून टाकली. या मुलांनी सरकारसाठी प्रचार केला, तुमच्यासाठी निवडणुकीत ते राबले त्याचे बक्षीस काय दिले तर काल आंदोलन केले म्हणून बेदम मारहाण केली. यातील मुलांना फ्रॅक्चर झाले आहेत, इतकी असंवेदनशील वृत्ती सरकारची आहे. या मुलांच्या भविष्याचे काय? तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले होते त्यांना आम्ही सेवेत कायम करू त्याच काय झालं.
यावर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रशिक्षणार्थींना आम्ही नवीन योजनेत सामावून घेऊ आम्ही याबाबत नवीन धोरण करणार आहोत असे आश्वासन सभागृहात दिले.
सत्तेत येण्यासाठी महायुतीने राज्यातील युवांना नोकरीचे आश्वासन दिले. राज्यातील युवांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सारखी कंत्राटी योजना आणली गेली. पण या योजनेतील युवांचा गेल्या ६ महिन्यांपासूनचा पगार देखील सरकारने केला नाही. सोबतच कार्यकाळ संपल्यावर युवांना काय करायचं याबाबतही सरकारने कसलीही स्पष्टता दिली नाही.
परिणामी राज्यभरातील युवांकडून आज नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे. सदरील आंदोलक युवांच्या संतप्त भावना सरकारने समजून घेणे गरजेचे असताना सरकार मात्र 'गरज सरो वैद्य मरो' या प्रकारे निष्ठुरपणे वागत आहे. सरकारने तात्काळ आंदोलक युवांशी संवाद साधून काहीही विपरित घडणार नाही याची काळजी घेण्यासोबतच युवांचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, ही विनंती...!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
तिवसा बसस्थानकासमोर झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. नागपूरकडे मोर्चासाठी निघालेल्या तरुण प्रशिक्षणार्थीला असा जीवघेणा प्रसंग ओढवणं ही मोठी शोकांतिका आहे.
शोकाकुल कुटुंबीयांना मनःपूर्वक संवेदना. या कठीण प्रसंगी त्यांना धैर्य मिळो हीच प्रार्थना. 🙏
प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन वाहतूक व्यवस्थेत आवश्यक ते तात्काळ बदल करावेत, जेणेकरून संघर्ष न्यायाचा असला तरी किंमत कोणाच्याही जीवांची ठरू नये.