अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले.
बातमी आलेल्या दिवसापासून यावर काही लिहावं असं वाटत होतं परंतू प्रकरण कसं पुढे सरकतंय आणि बातमीच्या ओळींमागे काय लपलंय ते जरा पहात होतो .
या विषयवार देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रसिद्ध मौन बाळगलं आहे. श्री. नरेंद्र मोदीच काय पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्री पदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले त्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाही ? दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची पळवापळवी करता करता या सगळ्याची इतकी सवय झाली किंवा मन कोडगं झालंय की देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचं पण काही वाटणं बंद झालं आहे का ? का अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेच २०२४ मध्ये भाजपला लोकांनी नाकारले म्हणून रामाला पुन्हा वनवासात ढकललं जात आहे?
अयोध्येत राममंदिर उभं राहिलं तेंव्हा या देशातील कोट्यवधी हिंदूंना परमोच्च आनंद झाला होता. आपल्या मर्यादापुरुषोत्तमाच्या जन्मस्थानाच्या जागी देऊळ पाडून, काही शतकांपूर्वी तिथे मस्जिद उभारली गेली. पुढे अनेक शतकं हिंदूंच्या मनाला या गोष्टीचा खेद होता. पुढे १९८० च्या दशकांत विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी रामजन्मभूमी आंदोलन उभं केलं. आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेसाठी देशातील हिंदू या आंदोलनाच्या मागे उभा राहिला. सामान्य हिंदू माणसांनी या आंदोलनाला आर्थिक बळ दिलं, करसेवकांनी सेवा दिली, इतकंच काय असंख्य करसेवकांचा जीव यांत गेला. शरयू नदीत तरंगणारी त्यांची शवं आज देखील स्मरणात आहेत.
हे आंदोलन कुठल्या एका संघटनेचं नव्हतं किंवा फक्त भारतीय जनता पक्षाचं नव्हतं (जरी त्यांचा तसा दावा असला तरी ), त्यात शिवसैनिक पण मोठ्या संख्येने सहभागी होते, इतकंच नाही तर अग्रेसर होते. पण हिंदू पुनुरुत्थानासाठी झालेल्या आंदोलनाचं श्रेय आपण घ्यावं असं त्यावेळच्या एकाही नेत्याला वाटलं नाही, अगदी बाळासाहेबांना पण वाटलं नाही.
पुढे सर्वोच्च न्यालयालयाने निवाडा दिला. मशिदीच्या जागी राम मंदिर उभारायचा मार्ग मोकळा झाला. पण मंदिरात जेंव्हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ आली तेंव्हा मात्र पंतप्रधानांनी एकट्याने त्याची पूजा केली. तेंव्हा गाभाऱ्यात मात्र इतर कोणीही नव्हतं. जर देवावर तुमचा विशेषाधिकार असेल तर त्याच देवाच्या हुंडीतल्या अपहाराबद्दल बोलण्याची, लोकांना आश्वस्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का ?
मुळात अयोध्येतील राममंदिर हे या देशातील कोट्यवधी हिंदूंचं, साधू संतांचं आणि करसेवकांचं आहे. इथे देणगी म्हणून किंवा श्रद्धा म्हणून लोकं जेंव्हा पैसे किंवा दागिने, सोनं अर्पण करतात तेंव्हा त्या पैशाला कष्टाच्या घामाचा गंध असतो आणि श्रद्देचं कवच असतं. सोनं, दागिने अर्पण करताना असंख्य महिला भक्तांनी त्यांच्याकडे चालत आलेलं स्त्रीधन अर्पण केलेलं असू शकतं. जे काही आहे ते श्रीरामामुळे आहे या भावनेतून भक्तांनी दाखवलेली ही कृतज्ञता.
परंतु मला एक गोष्ट समजत नाही की या आपल्या सर्व देवी देवतांच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना करताना म्हणे त्यात प्राण फुंकले जातात आणि मग प्रतिष्ठापना झाल्याचे सांगतात. त्या आमच्या देवी देवतांच्या हातात तलवारी, धनुष्य बाण, गदा, चक्र वगैरे शस्त्रं जी असतात तेच या नराधमांचा बंदोबस्त का नाही करत ? की या प्राण असलेल्या भक्तांमधे दगड फुंकला आहे ? आपण श्रद्धेने दिलेले दान देवाला न जाता विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्याच खिशात आणि घशात जातं हे पुन्हा एकदा या निमित्ताने भक्तांना समजलं असेल असं मी मानतो ! देवी देवतांची पूजा करा पण या विश्वस्तांची आणि या मार्गाने राजकारण करणाऱ्याची पूजा करू नका आणि कोणतही (दान ) या लोकांच्या पदरात टाकू नका !
मुंबईतील नाले १००%, ११०% असे वाट्टेल ते दावे केले गेले पण तरीही मुंबई का तुंबली ? महापौर महोदयांच्या समोरच अधिकारी मॅनहोलमध्ये जाता जाता वाचतो. आणि आज तर एक माणूस मॅनहोलमध्ये पडला. या सगळ्यावर मात्र मौन ? राजसाहेब नेहमी म्हणतात सत्ताधार्यांच्यासाठी विकास म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मनाला येईल तसा आणि त्यांच्या सोयीचा जो असेल तो विकास. मोठ्या मोठ्या घोषणा म्हणजे विकास. रस्ता, उड्डाणपूल यावर दुसऱ्याच दिवशी खड्डे पडतात हा विकास.
#MNSAdhikrut
Someone Said "आम्ही हातात बांगड्या नाही घातल्या..."
तुमची आमची लढाई केवळ भाषा, जमीन आणि वसाहतवादाची नसून वैचारिक दृष्टिकोनाची पण आहे !
मराठी पोरींच मनगट पाहिलंय का कधी ?
#बांगडी
साटम असो
शेलार असो
की काका असो
की देवाभाऊ असो…
या सरकार चे दिवस भरत आहेत.
जेव्हा सर्वनाश होण्याची तयारी असते तेव्हा देव माणसाला अमर्यादित पाप करण्याची मुभा देतो.
यांनी राम पण लुटला….
सर्वनाश अटळ.
#सरकार
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पावसाळ्यापूर्वी १०४% नालेसफाई झाली असल्याची अधिकृत घोषणा केली होती.
१००% नालेसफाई समजू शकतो पण हे १०४% नालेसफाई कशी काय ? असा प्रश्न भाजपचे अमित साटम यांच्यासह आम्हालाही पडला आहे. तेव्हा कृपया करून महापौर ताईंनी उत्तर द्यावे.
@TawdeRitu#तुंबई
राजसाहेबांचं भाकीत अवघ्या २४ तासांत खरं ठरलं!
'विरोधक बाहेरून नाही, तर आतूनच तयार होतील' या विधानाचा जिवंत पुरावा आज महाराष्ट्राने पाहिला.
देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतल्या आयुक्त भिडेंवर खापर फोडत शिंदे गटाचे उपमहापौर संजय घाडी यांनी आज तात्पुरती वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असेल;
....पण त्यांच्या मनातील ती सुप्त खदखद आणि अंतर्गत धुसफूस आता थेट चव्हाट्यावर आली आहे.महायुतीमधील हा अंतर्गत स्फोट आता लपवून लपणार नाही, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे!
राजसाहेब यांच्या जन्म दिवसानिमित,मनसे कामगार सेना पुणे तर्फे संपर्क अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे व कामगार नेते गजानन राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने “ज्ञानदिप बालक अनाथ आश्रम” येथे मोफत अन्नदान करून त्याच मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला.
@RajThackeray@MNSReportEng#MNS
आधी भाजप मध्ये येण्याची ऑफर👀
राजू दादाने ऑफर तुडवून लावली✅
दीपेश म्हात्रे ह्यांनी पुन्हा राजू दादाला ऑफर दिली👀
राजू दादाने भीक नाही घातली ✅
ED ने राजू दादाच्या भावाच्या घरी धाड टाकली!👀
ह्याहून एकच कळते
जब सरकार तुमसे डरती है,ED को आगे करती है!
@mnsadhikrut@rajupatilmanase
बाब्याने १८०० कोटीची जमीन घेतली आणि बाबांना माहीत नाही म्हणजे बाबांना हजार,२ हजार कोटी ने फरक पडत नाही रे ...
इतकी साधी गोष्ट तुम्हाला समजू नये ...
लाख,दोन लाख कोटीचा विषय असता तरच बाबा अर्थात दादांना कल्पना असती ...
बाकी क्लिन चीटसाठी आपले
देवा भाऊ आहेतच ना ...!!!
मग कशाला चिंता ...!!!
महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती नासवली ती अमाप पैसा असलेल्या राजकारण्यांनी. राजकारणात घोडेबाजार करून पुरोगामी महाराष्ट्राला बिहार आणि अधिक मागासलेल्या राज्यांच्या पंगतीत बसवण्यात सध्याच्या स्वार्थी सरकारचा खूप मोठा वाटा आहे. हे आता एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर ह्यांनी सुद्धा जाहीर पणे मान्य केले आहे. हा व्हिडिओ नक्की बघा!
#महाराष्ट्र #राजकारण #पैसा
महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचा अपमान कराल...
महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला आव्हान देण्याचा प्रयत्न कराल....
महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अपमान कराल....
कितना भी एक रहोगे तो फिर भी पिटोगे !
BJP IT cell would want you to believe DF is the infra man with his lucrative big projects and announcements but they won’t tell you that RT is the real visionary when it comes to infra. There are a lot of ‘I told you so’ moments with Raj Thackeray.