आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकरांनी ४५ दिवसांत आरोग्य विभागाची भरती करण्याचे आश्वासन दिले. आज ४-५ महिने झाले, जाहिरातच नाही!
पण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मात्र वेळेत जाहीर झाली. तरुणांच्या भरतीला वेळ नाही, पण निवडणुकीला मात्र ‘फास्ट ट्रॅक’!
आरोग्यमंत्री, ४५ दिवसांचे आश्वासन कुठे गेले?
@abitkar_prakash
प्रति,
मा. प्रकाश आबिटकर
मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
विषय : आरोग्य विभागातील गट 'क' व गट 'ड' पदभरती तातडीने सुरू करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील हजारो पात्र बेरोजगार युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना सार्वजनिक आरोग्य विभागातील गट 'क' व गट 'ड' मधील तांत्रिक व अतांत्रिक पदांची भरती अनेक महिन्यांपासून रखडलेली आहे. आरोग्य विभागाने काही महिन्यांपूर्वी “४५ दिवसांत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करू” असे आश्वासन दिले होते. मात्र, या मुदतीच्या तिपटीपेक्षा अधिक कालावधी उलटूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, राज्यातील अनेक ठिकाणी आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती व पायाभूत सुविधा तयार असूनही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ती केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याची परिस्थिती आहे. याचा थेट परिणाम ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवेवर होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने पुढील मागण्या करण्यात येत आहेत 1. गट 'क' व गट 'ड' मधील सर्व रिक्त पदांची अद्ययावत पदसंख्या जाहीर करून तात्काळ भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी.
2. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक व निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे वेळापत्रक जाहीर करावे.
3. तयार असलेल्या आरोग्य उपकेंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची तातडीने नियुक्ती करून ती पूर्ण क्षमतेने सुरू करावीत.
4. आरोग्य विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी.
5. ४५ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या पूर्वीच्या आश्वासनाची पूर्तता का झाली नाही, याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी.
या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही व स्पष्ट वेळापत्रक जाहीर केले नाही, तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने संबंधित कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येईल. बेरोजगार युवकांना रोजगार आणि महाराष्ट्रातील जनतेला सक्षम सार्वजनिक आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. शासनाने या प्रश्नाकडे तातडीने गांभीर्याने पाहून निर्णय घ्यावा, ही विनंती.
आपला,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस तथा अध्यक्ष
रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (MPCC)
@abitkar_prakash @INCMaharashtra@INCRojgar
#health #dhananjayshinde #recruitment
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख करणारे MPSC चे महाभ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी मोठमोठे मोर्चे झाले, पण अद्यापही भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा झालेला नाही. पुण्यातल्या ७ सप्टेंबर रोजीच्या विद्यार्थ्यांच्या भव्य आक्रोश मोर्चात अध्यक्षांचा राजीनामा न झाल्यास पुन्हा आंदोलनाची घोषणा विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार गणेशोत्सव झाल्यानंतर २६ सप्टेंबरपासून पुण्यात विद्यार्थ्यांसमवेत मी स्वत: आंदोलनाला बसणार असून याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे कळवण्यात आलंय.
भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन स्वच्छ प्रतिमा असलेले अध्यक्ष नेमावेत ही विद्यार्थ्यांची प्रामाणिक भावना आहे. भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, दिलेल्या शब्दाप्रमाणे २०२६ मध्ये ७० हजारांची मेगाभरती तत्काळ सुरू करावी आणि राजस्थानप्रमाणे १०० रु. च्या कार्डवर वर्षभर परीक्षा या तीन प्रमुख मागण्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी सहकार्य करावं. नोटिसा द्यायच्याच असतील तर कोणत्याही विद्यार्थ्यांला त्रास न देता मला नोटिसा द्या!
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय हा होणारच असल्याने सर्वांनी विद्यार्थ्यांच्या एकजुटीला सहकार्य आणि ताकद द्यावी.
काल पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी MPSC पेपरफुटीविरोधात आवाज बुलंद केला आणि आज तोच आक्रोश छत्रपती संभाजीनगरमध्येही पाहायला मिळत आहे.
हा महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न आहे.
विद्यार्थ्यांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढतोय. आता सरकारनेही डोळे उघडण्याची वेळ आली आहे.
MPSC च्या अन्यायाविरोधातील चळवळीचा महत्वाचा योद्धा ऋषिकेश गांगुरडे पाटील सोबत काल पुण्याच्या मोर्चातील ग्रेट भेट!
ऋषिकेश,
आम्हाला तुझा अभिमान आहे!
@INCMaharashtra#MPSC#MPSC_आक्रोश_मोर्चा
मा. मुख्यमंत्री महोदय
@Dev_Fadnavis
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा झाला. विशेष म्हणजे या मोर्चात कोणताही राजकीय नेता सहभागी नव्हता, तरीही विद्यार्थ्यांची अफाट गर्दी होती.
पुण्यातील मोर्च्यानंतर हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप भाजपा आणि त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, संभाजीनगरच्या मोर्चाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे कि हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा आहे.
विद्यार्थी राज्यभर स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या मनात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विश्वासघात झाल्याची भावना आहे आणि त्यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारने आरोप-प्रत्यारोपात वेळ न घालवता विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि त्यांच्याशी थेट संवाद साधावा.
कारण आज ही फक्त एक ठिणगी आहे…
या ठिणगीचा वणवा व्हायला फार वेळ लागणार नाही.
@RahulGandhi@NANA_PATOLE@INCHarshsapkal@supriya_sule@vishwajeetkadam@mpsc_office@satejp
आयोगाच्या #अध्यक्षांपासून शिपायापर्यंत संपूर्ण कार्यकारिणीची जबाबदारी निश्चित करून फेररचना झालीच पाहिजे!
एकही ‘सडका आंबा’ व्यवस्थेत शिल्लक राहता कामा नये. 🍋🟠
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या व्यवस्थेवर केवळ मलमपट्टी नको—संपूर्ण CLEAN-UP हवा!
MPSC ला विश्वासार्हता परत मिळवायची असेल, तर पूर्णपणे पारदर्शक आणि जबाबदारी निश्चित करणारी #REFORM हीच काळाची गरज आहे.
@mpsc_office@RRPSpeaks@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@LoksattaLive@abhijeet_dipke@abpmajhatv@TV9Marathi
#MPSC #MPSCReform #StudentsJustice
MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि भोंगळ कारभाराविरोधात पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी काढलेला 'आक्रोश मोर्चा' हा सरकारच्या अपयशाचा ढळढळीत पुरावा आहे!
या मोर्चातील मुलं ही शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची मुलं आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी काहींच्या वडिलांनी जमीन विकली आहे तर काहींच्या वडिलांनी इतकं कर्ज काढले आहे की आयुष्यभर कष्ट केले तरी फेडू शकणार नाही. पेपर फोडणाऱ्यांनी त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे.
माय बाप सरकाराला जनाची नाही मनाची तरी असेल तर त्यांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष न करता तातडीने हालचाली कराव्यात आणि लाखो तरुण-तरुणींच्या भवितव्याशी खेळणाऱ्या MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा घ्यावा !
#MPSCStudentProtest #MPSC #PuneProtest #JusticeForMPSCStudents
अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक विद्यार्थी रात्रीचा दिवस करतात, जिवापाड मेहनत करून MPSC परीक्षांचा अभ्यास करतात. पण, ऐनवेळी काही भ्रष्ट प्रवृत्ती त्यांचे स्वप्न हिरावून नेत असेल, परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेलाच भ्रष्टाचाराची वाळवी लागली असेल तर या विद्यार्थ्यांच्या संतापाचा कडेलोट होणे स्वाभाविक आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, परीक्षेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या रास्त मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे. यापुढेही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष सक्रियपणे कार्यरत असेल.
#MPSC #mpscexam #Students #akroshmorcha
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा केवळ परीक्षा घेणारी संस्था नसून, राज्यातील लाखो युवक-युवतींच्या कठोर परिश्रमांचा, त्यांच्या स्वप्नांचा तसेच त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याचा विश्वासाचा आधार आहे. वर्षानुवर्षे परिश्रम करून विद्यार्थी या व्यवस्थेवर विश्वास ठेवून स्पर्धा परीक्षांना सामोरे जातात.
मात्र आपल्या सरकारच्या कार्यकाळात MPSC संदर्भात, विशेषतः ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांसह, परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता व विश्वासार्हता याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सदर आरोपांची निष्पक्ष, स्वतंत्र व वेळबद्ध चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे तसेच दोषींवर कठोर कारवाई करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
आज पुणे येथे हजारो विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत, त्यांच्या मागण्या रास्त व स्पष्ट आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्ष चौकशी, वेळबद्ध भरती प्रक्रिया, गैरप्रकारांविरुद्ध कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा एवढच त्यांचं म्हणणं आहे.
केवळ आश्वासनांद्वारे हा प्रश्न मार्गी लागणार नाही. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा आणि संबंधित निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी.
MPSC मधे पारदर्शकता येण्यासाठी ही गोरगरिबांची मुल रस्त्यावर आली आहेत, MPSC अध्यक्ष, सदस्य पासून ते शिपाई पर्यंत बदल झाला पाहिजे पण राज्याचे प्रमुख @Dev_Fadnavis हे आयोगाच्या अध्यक्षाच्या पाठीशी दिसतात, त्यांना हे विद्यार्थी दिसत नाहीत का? MPSC अध्यक्षाला वाचवून या विद्यार्थ्यांचा रोष देवेंद्र फडणवीस का अंगावर घेत आहेत? विवेक भीमनवार एवढा महत्वाचा माणूस आहे का? असा प्रश्न मला पडतो… @bhimanwar
#MPSC पेपरफुटी विरोधात आजचा पुण्यातील महामोर्चा
MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी.
राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे वाटोळं कुणी केले ते समोर आलेच पाहिजे, अन्यथा तरुणांचा आणखी उद्रेक निश्चित आहे.
@mpsc_office
देशात पेपरफुटी आणि परीक्षेतील गोंधळाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असून देशभरात सरकारच्या कारभाराविरोधात मोर्चे निघत आहेत. आज पुण्यात हजारो विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेत. विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता #MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा. तसेच सरकारने त्यांचा आवाज ऐकून प्रश्न सोडवावेत, त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय द्यावा !
@CMOMaharashtra
#ChhatronKiGunj #MPSC #आक्रोशमोर्चा #पुणे
#MPSC च्या उत्पादन शुल्क (विभागीय) परीक्षेत मार्किंग पॅटर्न लीक करण्यात दुसरं-तिसरं कुणी नाही तर चक्क आयोगाचाच सह सचिव दर्जाचा अधिकारी दोषी असल्याची माहिती समोर आली आहे. हे शॉकिंग आहे. इकडं विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करायचा आणि तिकडं आयोगाने पेपर विकायचे, हे बिलकूल खपवून घेतलं जाणार नाही.
म्हणूनच आजचा हा आक्रोश मोर्चा आहे.
#MPSC च्या शुद्धीकारणाशिवाय हा लढा थांबणार नाही..!
#विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी