@RRPSpeaks दादा आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे हा अत्यंत महत्वाचा आणि गरजेचा असा मुद्दा जिवंत आहे .. कृपया प्रतिज्ञापत्र दाखल करे पर्यंत विद्यार्थ्यांच्या मागे असे च उभा रहा .. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
लिपिक टंकलेखक परीक्षा २०२३ मधील एकूण ७००६ जागांपैकी ४२६५ जागांवर नियुक्त्या झाल्या असल्या, तरी साधारणतः २७०० पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. याप्रकरणी खुल्या प्रवर्गातील रिक्त जागा, तसेच राखीव प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतून जाहिरातीप्रमाणे राहिलेल्या रिक्त जागा पूर्ण क्षमतेने भराव्यात, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका (Writ Petition) दाखल आहे.
#MPSC विद्यार्थ्यांच्या सत्याग्रह आंदोलनात लिपिक टंकलेखक परीक्षा २०२३ मधील उर्वरित जागा भरण्याची मागणी केली होती. त्या��र विद्यार्थीहिताची भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन शासनाने दिले होते. दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिव व्ही. राधा मॅडम यांची भेट घेऊन याविषयी उच्च न्यायालयात शासनाकडून विद्यार्थीहिताचे प्रतिज्ञापत्र सादर करावे, याबाबत चर्चा केली होती. त्यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेत लवकरच शपथपत्र सादर करण्याचा शब्द दिला होता. नोव���हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने न्यायालयाने रिक्त जागा भरण्यासंदर्भात शासनाची भूमिका विचारली आहे.
ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने आता दिलेल्या शब्दाप्रमाणे २८ ऑक्टोबर २०२६ पूर्वी विद्यार्थीहिताची भूमिका घेणारे शपथपत्र तत्काळ न्यायालयात सादर करावे, ही विनंती!
@Dev_Fadnavis
MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांना पदावरून का हटवलं जात नाही? हा घ्या त्य��चा जिवंत पुरावा!
पूर्वीच्या काळी राजाच्या दरबारात त्याची खोटी स्तुती करणारे, लाळघोटेपणा करणारे 'भाट' असायचे. आजच्या डिजिटल युगात भिमनवार हे फडणवीस साहेबांच्या दरबारातील आधुनिक भाट आहेत. हीच त्यांची 'विशेष पात्रता' असल्यामुळे, विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश असतानाही त्यांना पदावरून हटवलं जात नाही. ज्या शासनाला विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यापेक्षा स्वतःची चापलुसी करणारे 'भाट' जा��्त प्रिय वाटतात, त्या राज्याचं भविष्य अंधकारमय असतं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, विद्यार्थ्यांना 'उत्तरदायी' अधिकारी पाहिजेत, लाचार चाटुकार नकोत.
लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरला आग लावून केवळ सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांना तुम्ही अजून किती दिवस पाठीशी घालणार?
हाकला या भ्रष्ट सरकारी जावयाला…!
शासकीय सेवेत असताना अशी पोस्ट इतर कुण्या अधिकाऱ्याने केली असती, तर त्याला लगेच साइड पोस्टिंगला फेकलं असतं; पण मुख्यमंत्र्यांनी सगळे निकष धाब्याव��� बसवून आपल्या मित्राला IAS केलं आणि आता राज्यातील विद्यार्थ्यांच्या मानगुटीवरही बसवलं.
धन्य ते सरकार आणि अजब तो कारभार..!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेली ‘व्ही. राधा समिती’ची बैठक ही लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी सरकारपुरस्कृत प्रशासकीय ‘औपचारिकता’ ठरली आहे.
हजारो विद्यार्थ्यांनी एकमुखाने #ObjectivePattern व सर्व एक्सा�� #offline ची ठाम मागणी लावून धरलेली असताना, समितीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित मागणीबाबत एकही स्पष्ट भूमिका मांडली नाही. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी सोयीस्कर मौन का बाळगले, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी स���ितीची स्थापना करण्यात आली असेल, तर विद्यार्थ्यांची सर्वाधिक आग्रही मागणी असलेल्या #ObjectivePattern या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता आधीच निश्चित करण्यात आलेल्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनलाइन परीक्षा पद्धतीचाच आग्रह धरला जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळख��्या जाणाऱ्या पुण्यात डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे समर्थन करणाऱ्या खासगी क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि दुसरीकडे उन्हातान्हात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुरेसा संवाद व प्रतिनिधित्वाची संधी न देणे, हा कोणता न्याय?
पहिल्याच डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले असताना, त्याच परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार न करता तिचाच आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
जर या समितीचा दौरा आणि बैठक केवळ विशिष्ट घटकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आयोजित करण्यात आली असेल, तर त्याचा आम��ही तीव्र निषेध करतो.
ही समिती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की केवळ त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घेतले जाणार असतील, तर हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि #ObjectivePattern बाबत स्पष्ट, पारदर्शक व लेखी भूमिका जाहीर करावी. अन्यथा, प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.
@maha_governor
@MahaDGIPR
@bhimanwar
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RahulGandhi
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
@supriya_sule
@vishwajeetkadam
@satejp
@atullondhe
@Jayant_R_Patil
@VijayWadettiwar
@TV9Marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
@saamTVnews
@News18lokmat
@SakalMediaNews
@LoksattaLive
@lokmat
@mataonline
@ashish_jadhao
@waglenikhil
@_prashantkadam
@aajtak
@mumbaitak
@pudharionline
@LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii
MPSC उच्चस्तरीय समितीचे सर्व सन्मानित सदस्य,
आपल्या सर्वांबद्दल आदर आहे, परंतु एवढे वर्षभर ऑनलाइन होणार नाही, हे समिती सदस्यांचे वक्तव्य पटले नाही. एवढे वर्षभर ऑनलाइन होणार नाही, म्हणजे एक वर्षानंतर ऑनलाइन होणार आहे का? असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.
वर्षभर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार नाही, ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी वारंवार मांडलेली भूमिका विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे. ऑनल���इन परीक्षा घेण्यासाठीच भिमनवार साहेबांना ताकद दिली गेली आहे आणि समिती देखील ऑनलाईनच्या बाजूचीच भूमिका पुढं रेटणार असेल तर समितीचे पुढचे दौरेच विद्यार्थी होऊ देणार नाहीत. त्यामुळे आपण ऑनलाईन परीक्षेच्या विरोधातील विद्यार्थ्यांची भावना समजून घ्यावी.
एक वर्षच काय, पुढचे शेकडो वर्षे सुद्धा #MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या…
हम है मैद��न में...!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
विद्यार्थी बंधू-भगिनींनो तयारीला लागा…
सोमवारी तुमच्या हक्काच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा….
आज रस्त्यावर उतरला नाही तर कायम रस्त्यावर रहावं लागेल आणि घोटाळे करणारे महत्त्वाच्या पदांवर जाऊन तुमच्या डोक्यावर बसतील.
म्हणूनच जिंकण्यासाठी हक्काचा लढा लढू आणि न्याय मिळवू…!
#विद्यार्थी_हक्काचा_लढा
पेपरफुटीप्रकरणी MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा आणि या पदावर स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी, यासह लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांच्या इतरही काही मागण्या आहेत. याच मागण्यांच्या पार्श्वभूमीवर ‘विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ सोमवार, दि. ��� सप्टेंबर रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर चौकापासून (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल) जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी १० वाजता विद्यार्थी आणि शिक्षकांचा विराट आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
या आक्रोश मोर्चात मीदेखील सहभागी होणार असल्याचा शब्द पुण्यात विद्यार्थ्यांशी बोलताना दिला आहे. त्यासाठी पोलीस सहआयुक्त संजय दराडे साहेब, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे साहेब, उपायुक्त ऋषिकेश रावले साहेब आणि मिलिंद मोहिते साहेब यांची भेट घेऊन मोर्चाला परवानगी देण्याची विन���ती केली. या भेटीवेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सुनील माने, प्रमोद पाटील, विविध क्लासेसचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी त्यांच्यासोबत कालही होतो, आजही आहे आणि यापुढेही कायम राहणार आहे. सरकारला २ दिवसांचा वेळ आहे. या काळात सरकारने अध्यक्षांना हटवून विद्यार्थ्यांच्या इतरही मागण्या मान्य केल्या नाहीत, तर संघर्ष अटळ आहे. येत्या काळात आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून या संघर्षाची व्याप्तीही वाढवू आणि विद्यार्थी व शिक्षकांची ताकद सरकारला दाखवून देऊ आणि निर्णय घेण्यास भाग पाडू..!
#विराट_आक्रोश_मोर्चा #Protest #MPSC
मा.@mpsc_office@bhimanwar दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदासाठी 70 लाख रुपये रेट सुरू होता म्हणून ऐकण्यात येत आहे.... हे सर्व पेपर फोडून सुरू होत की उत्तरपत्रिका ���्लँक ठेवून नंतर भरल्या जात होत्या याचा तपास होणे अत्यावश्यक आहे..... परीक्षा कक्षातील CCTV तपासा आणि आयोगातील अधिकारी कर्मचारी यांच्या हालचाली सुद्धा पाहून घ्या.... चांगलाच मोठा चुना लावलेला दिसतोय आयोगातील भ्रष्ट लोकांनी....#पारदर्शकता #MPSC #TRUST @CMOMaharashtra @satejp @INCHarshsapkal
मा.@mpsc_office@bhimanwar महाराष्ट्र गट ब मुख्य परीक्षा 2025 निकाल आपल्याद्वारे अजून जाहीर करण्यात आलेला नाही..निकाल यावेळी एकच अंतिम असणार आहे कारण ऑप्ट���ंग आउट पर्याय बंद आहे ,त्यामुळे आपण बैठक क्रमांक मोजणी न करता डोके मोजून निकाल जाहीर करा..जेणेकरून उमेदवार रिपीट होणार नाहीत.
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्��्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनला��न परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
एमपीएससीने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षांच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व त्यांच्या न्याय्य मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. रामचंद्र दळवी यांच्या नेत���त्वात साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन नवी मुंबईतील MPSC च्या मुख्य कार्यालयासमोर सुरू केले आहे.
सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या संवेदनशील मागणीला पाठिंबा देऊन उपोषणात सहभागी व्हावे.
@INCHarshsapkal @satejp
@DalviAaba @Dhananjay4INC
यापुढच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याच्या #MPSC ने काढलेल्या परिपत्रकाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करुन हा निर्णय तातडीने मागे घेऊन या परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली. तसंच नॉर्मलायझेशनच��� मुद्दाही उपस्थित करुन विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही पद्धत हटवण्याची मागणी केली. सरकारने #MPSC च्या माध्यमातून हा निर्णय बदलला नाही तर विद्यार्थ्यांचं अधिक मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी दिला.
#पावसाळी_अधिवेशन_२०२६
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न
आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांचा सरकार नेहमीच धसका घेतंय..
आजही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा धसका घेऊन सरकारने छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासूनच शेकडो पोलिसांचा ताफा रस्त्यावर उतरवलाय… शिवाय आंदोलन लोकांपर्यत पोहोचू नये म्हणून जॅमरही लावलाय..
पण विद्यार्थ्यांचं हे आंदोलन जोरात होणार… आणि आंदोलकांच्या घोषणांनी सुस्तावलेल्या सरकारला कानठळ्याही बसणार..!
त्यासाठी मीही पोचतोय…!
भेटू १० वाजता.. विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील मैदान,
छत्रपती संभाजीनगर.
मा. @mpsc_office@bhimanwar छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू असलेल्या आंदोलना कडे पाहून तरी जरा शहाणे व्हा आयोगाराव पावसात सुरू आहे हे आंदोलन तुम्ही जरा तरी विचार करा..... मंत्रालयातून आलेला आदेश तुम्हाला बंधनकारक नाही तुम्ही स्वायत्त आहात..…. ऑनलाइन रद्द ONLY ऑफलाईन जाहीर करा.