“एक कचोरी, दोन समोसा.. मर्दों का क्या भरोसा?”
चार शब्दांचा विनोद आहे…
पण प्रत्येक पुरुषाची गोष्ट चार शब्दांत संपत नाही.
काही पुरुषांचं संपूर्ण आयुष्यच
मला काय हवंय? यापेक्षा
माझ्या माणसांना काय हवंय?
या एका प्रश्नाभोवती फिरत राहतं.
वयाच्या ज्या टप्प्यावर स्वतःची स्वप्नं रंगवायची असतात, त्याच वयात कुणी घराचा EMI मोजत असतो, कुणी आई-वडिलांच्या औषधांचा खर्च,
कुणी बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी,
तर कुणी मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या वर्तमानाशी तडजोड करत असतो.
नोकरी आवडत नसली तरी सोडता येत नाही…
शहर आवडत नसलं तरी परतता येत नाही…
मन थकलं तरी थांबता येत नाही…
कारण त्याच्या थांबण्यावर कधीकधी
संपूर्ण घराचं चालणं अवलंबून असतं.
पुरुषांना आर्थिक जबाबदारी स्वीकारण्याची, भावना आवरण्याची आणि संकटात मजबूत राहण्याची सामाजिक अपेक्षा आजही अनेक कुटुंबांत खोलवर रुजलेली आहे.
म्हणूनच कित्येक पुरुषांचं दुःख रडण्यात दिसत नाही;
ते वाढलेल्या कामाच्या तासांत,
कमी झालेल्या झोपेत,
रद्द केलेल्या स्वतःच्या इच्छांमध्ये
आणि महिनाअखेरीस घराकडे पाठवलेल्या पैशांत दिसतं.
बापाच्या जुन्या चपला नेहमी गरिबीचं लक्षण नसतात…
कधी त्या मुलाच्या नव्या बुटांची किंमत असतात.
भावाने स्वतःचा फोन आणखी वर्षभर वापरणं कंजूषपणा नसतो…
कधी त्यामागे बहिणीच्या फीची पावती असते.
नवऱ्याने स्वतःची इच्छा पुढच्या महिन्यावर ढकलणं विसरभोळेपणा नसतो…
कधी त्यामागे कुटुंबाची एखादी गरज आधी पूर्ण झालेली असते.
आणि मुलाने घरच्यांना फोनवर
“मी मस्त आहे, काळजी करू नका” म्हटलं,
म्हणजे प्रत्येक वेळी तो खरंच मस्त असतो असं नाही…
कधी त्या एका वाक्यामागे
अपयश, कर्ज, कामाचा ताण, एकटेपणा
आणि तरीही घरच्यांना काळजी लागू नये म्हणून जपलेलं हसू असतं.
सगळे पुरुष देव नसतात.
सगळे विश्वासास पात्रही नसतात.
पण काही चुकीच्या पुरुषांच्या उदाहरणावरून
प्रत्येक पुरुषाच्या निष्ठेची थट्टा करणंही वास्तव नाही.
कारण काही पुरुष
“मी तुमच्यासाठी खूप केलं”
हे आयुष्यभर सांगत नाहीत…
ते फक्त करत राहतात.
त्यांच्या त्यागाला मथळे मिळत नाहीत,
त्यांच्या वेदनांना स्टेटस मिळत नाही,
आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांना टाळ्याही मिळत नाहीत.
तरीही ते रोज उठतात…
पुन्हा लढतात…
पुन्हा कमावतात…
आणि स्वतःच्या स्वप्नांचा एक छोटासा तुकडा बाजूला ठेवून
आपल्या माणसांच्या स्वप्नांना जागा करून देतात.
पुरुषाच्या खांद्यावरचं ओझं नेहमी दिसत नाही,
कारण अनेकदा त्याच ओझ्याला जग
“कर्तव्य” हे साधंसं नाव देऊन मोकळं होतं.
म्हणून “मर्दों का क्या भरोसा?” म्हणण्याआधी एवढंच...
कधीतरी त्या पुरुषाचीही गोष्ट वाचा,
जो स्वतःसाठी जगायला विसरला,
कारण त्याच्यावर विश्वास ठेवून
त्याचं अख्खं घर जगत होतं.
@RahulAsks साहेब, बाकी काहीही असु दे. ढेरी मात्र कमी आहे. आपल्या मनात असणाऱ्या स्वप्रतीमेला AI च्या मदतीने समोर आणले आहे. रिअल टाइम मध्ये हे achieve करन जरा अवघड आहे. सध्या ह्यावरच समाधान मानूयात..
लाईटबिलावरील फक्त नाव बदलायचे असल्यास पुण्यात 2500-3000 लागतात. तशी त्यांची पावती 130/- ची आहे. पण सगळ्यांची पोटे भरल्याशिवाय हे काम होत नाही. नाहीतर अँप्लिकेशन 200% रिजेक्ट केले जाते.
तुमच्याकडे काय रेट चालू आहे?
#महाभ्रष्टवितरण#पुणे
कुठला राजकीय नेता म्हणजे महाराष्ट्र नाही.
कुठल्या घटनात्मक पदावर बसलेला माणूस म्हणजे महाराष्ट्र नाही.
महाराष्ट्र म्हणजे केवळ आणि केवळ,
क्षत्रियकुलावंतस श्री छत्रपती शिवाजी महाराज.
आनंदी, निरोगी आणि प्रोडक्टिव्ह शहरं घडवायची असतील, तर विकासाची दिशा माणूस, पर्यावरण आणि भविष्यातील पिढ्यांना केंद्रस्थानी ठेवणारी असली पाहिजे.
पर्यावरण, शिक्षण, शाश्वत विकास आणि नगररचनेवरील भारतातील ज्येष्ठ नगररचनाकार प्रो. अनिता गोखले बेनिंजर यांच्यासोबतचा हा विचारप्रवर्तक संवाद प्रत्येक जागरूक नागरिकाने नक्की पाहावा.
#ProfAnitaGokhaleBeninger #Podcast #UrbanPlanning #INCMaharashtra #Maharashtra @INCMaharashtra #harshwardhansapakal
@DrVrushaliRaut महाराष्ट्राच्या अधिपतनासाठी खरं जबाबदार 6pm -10 pm च्या देव देवीच्या मालिका आहेत. देऊळ नाहीत दाखवत कधी.. देऊळबंद चा रतीब चालू आहे.. जशी मागणी तसा पुरवठा..
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज
महाभारत
रामायण
मराठ्यांचा पूर्ण इतिहास
नेताजी सुभाषचंद्र बोस
महाराणा प्रताप
गुरूगोविंदसिंग
यावर Lord of the rings किंवा Passion of Christ किंवा ट्रॉय, Schindler's list या सिनेमाप्रमाणे किंवा Game of Thrones, Chernobyl, Dark या वेब सिरीज प्रमाणे अत्युत्कृष्ट casting, सिनेमोटोग्रफी, आणि उत्कृष्ट स्क्रिप्ट यांचा वापर होऊन त्या भव्यदिव्य दर्जाचे सिनेमे किंवा वेब सिरीज बनवण्यात आले पाहिजेत. असे कोणाकोणाला मनातून नेहमी वाटते?
#Thread
व्यक्तिगत व सामूहिक मानसिक आरोग्य -
बऱ्याच शिक्षित लोकांनाही वाटत अंगात येणे ही अंधश्रद्धा आहे. अजिबात नाही. अंगात येणे अबोध मनात (sub conscious) दडपलेल्या विविध भावना उफाळून येतात त्याचा परिपाक आहे.
बरेच लोक विचारतात - जास्त करून महिलांच्या अंगात का येत? कारण आपल्या पितृसत्ताक पूरुषसत्ताक व्यवस्थाने स्रियांचे इतके शोषण केले आहे की त्याना आपल्या भावना - दुःख कुठं मांडता येत नाही. या दुःखाचा निचरा कसा करावा कळत नाही. तेव्हा इथूनच ही मानसिक बदलाची प्रक्रिया सुरू होते.
माणसाला जाणीव सोबत नेणिव म्हणजे, अबोध मन असते. माणसाच्या मनाच्या पलीकडेही एक सुप्त मन असते, तेथे अनेक जुनाट आठवणी - तीव्र मानसिक धक्के - दबून असतात - विविध माध्यमातून ते वर उफाळून येतात.
इंग्रजी मध्ये सबकॉन्शीअस माईंड म्हणतात. वैद्यकीय दृष्टीने नेणिवेचा शोध सिगमंड फ्रॉइड या ऑस्ट्रियन शास्रज्ञाने लावला.
प्रत्येक माणसावर लहानपणी पासून काही न काही मानसिक आघात होतात - किंवा त्या आघाताचे परिणाम पुढे चालून विविध मानसिक व शारीरिक कृतीत दिसतात. मानसोपचार शास्र याला PTSD म्हणते (Post-Traumatic Stress Disorder) या मानसिक आघाताचा परिणाम माणसावर कुठल्या न कुठल्या माध्यमातून राहतो. मानसिक आरोग्य बद्दल आपल्यकडे लोक थेट मान्य करत नाही की मला मानसिक त्रास आहे. कारण आपला समाज याची स्वीकृती करत नाही. कारण अशावेळी आपल्याला वेडा मेंटल सायको ठरवेल अशी भीती असते. प्रत्येक माणूस कुठल्या न कुठल्या तणावातून जात असतो. त्याचे निरसन नीटसे केले नाहीतर माणसाचे सबकॉन्शीअस माईंड विकृतीची वाट धरू लागते. काही माणसे निर्भिड मनाची असल्याने ते आपल्या सबकॉन्शीअस विकृतीकडे जाऊ न देता, चांगल्या कामात वळवतात , जसे की प्रेमात अपयश आलेले लोक पुढं चालून आपल्या दुःखी भावनांना कविता शेर गझल मधून रुपांतरीत करतात. तर काही जण या अपयशाचे रूपांतर लैंगिक विकृतीत करतात - तथा महिला द्वेषात करतात. हे माझे मत नाही - मनोविश्लेषण शास्त्राचे प्रयोगसिद्ध सिद्धांतन आहे.
किंवा जे पिढ्यान पिढ्या माणसाच्या - समुहाच्या मनात मानसिक आदिबंध निर्माण होत आले आहेत. त्याचे वहन DNA मधून होते. पण ते फारच मोठ्या प्रमाणात किंवा , 100 टक्के होते अशातला भाग नाही. मानवी स्वभाव केवळ DNA मधून तयार होत नाही , तर तो DNA मधून येणारी पुसटशी आनुवंशिकता आणि कुटुंब व परिसरातुन येणारे विविध अनुभव ज्ञान यातुन मानवी स्वभावाची जडणघडण होते.
ही जडणघडण होताना जुने आदिबंध आणि व्यक्तीगत - सामूहिक जीवनातील मनोव्यापार यातून माणसाच्या स्वभावाची रचना होते.
व्यक्तीचे जसे मानसिक आरोग्य असते तसे समूहाचे सुद्धा मानसिक आरोग्य असते - कार्ल युंग या फ्रॉइड शिष्याने हे वैज्ञानिक गृहीतक मांडले - याला ते collective conscious म्हणतात - मराठीत सामूहिक अवचेतन म्हणतात.
युद्ध , महामारी , त्सुनामी, सामूहिक मिरवणूकी, सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना, सण उत्सव - इव्हेंट - दंगली - आदी बाबतीत - माणसे कुठंतरी एकात्मिक विचार करतात. किंवा sub consciously एक कृती करतात. किंवा एक समूह दुसऱ्या समूहाबाबत बरा वाईट विचार करतो - ही जी एक समूहाची दुसऱ्या समूहाबाबत जी मानसिक भूमिका आहे यालाच सामूहिक अवचेतन म्हणतात.
हिटलरने जर्मनीत जर्मन लोकांच्या मनात ज्यू बद्दल पसरवलेली सामाजिक घृणा - चीड. आदी बाबी या सामजिक मानसिक आरोग्याचा भाग बनतात. आपल्याकडे व्यक्तिच्या मानसिक आरोग्य बद्दल फार प्रबोधन नाही, तिथे सामूहिक अवचेतन - collective conscious बद्दल अजाणतेपण असणार.
व्यक्तिगत व मानसिक जाणीव नेणिवांचा जो मनोव्यापार चालतो , आणि जुने आदीबंध जे पिढ्यातून येतात - आणि सामाजिक परिस्थिती मधून माणसाचे मानसिक आरोग्य घडले जाते.
विविध मानसिक आघातचा सामना करणे माणसाला फार कठीण असते, अनेक लोक यातून कंटाळून गेलेले असतात. अशावेळी आपण आपल्या आसपासच्या माणसाना धीर देणे एक सामजिक कर्तव्य आहे.
तसेच काही मानसिक ताण जाणवत असल्यास त्या व्यक्तीने एकटे न राहता - सार्वजनिक जीवनात स्वतःला व्यक्त करावे - सतत काही न काही चांगल्या सामजिक कृती कराव्या. सामुदायिक सण उत्सवात भाग घ्यावा. आपल्या प्रियजनाशी आपल्या भावना मांडाव्या. तसे केलं नाही तर ; विविध भाव भावनांचा निचरा योग्य प्रकारे झाला नाही तर - त्या दबून राहतात - मनावर प्रचंड दडपण येते. मग असे दबलेल्या भावना - कधी कधी वाईट मार्गाने उफाळून येतात. अस होऊ द्यायचे नसेल प्रत्येकाने व्यक्त झालं पाहिजे - तेही चांगल्या पद्धतीने - स्वतःला कामात - वाचनात - संगीत ऐकण्यात - खेळात - विविध आनंददायी कृतीत स्वतःला व्यस्त राखले पाहिजे. इतरांना आपण मानसीक आधार दिला पाहिजे.
#मानसिक_आरोग्य #मन #अंधश्रद्धा
On 8 February 2026, at an event in Mumbai, RSS Chief Mr. Mohan Bhagwat made a statement to the effect that insisting on language and occasionally agitating for it is a kind of disease.
Several dignitaries from different fields were invited to this event, and some of them actually attended. But I would like to tell Mohanrao Bhagwat clearly: They did not attend out of affection for you; they did so out of their fear of Narendra Modi’s government. Otherwise, why nobody ever attended such dull and boring sermons before? So first, please come out of the misconception that they came there for you.
Anyway…
Firstly, we assume Mr. Bhagwat surely knows the history of why reorganization of the states along linguistic lines became a necessity in this country.
If love for one’s language and one’s region seem like a disease to Mr. Bhagwat, then we would like to point out that this ‘disease’ is rampant across majority of the states in this country.
From Karnataka to Tamil Nadu in the South, there are strong linguistic and provincial identities. The same sentiment exists in West Bengal, Punjab, and even Gujarat.
Has Mr. Bhagwat tried to understand what this sentiment really is? When large groups from four or five states migrate en masse to other states, behave arrogantly there, reject the local culture, insult the local language, and create their own vote banks, resentment builds among the local people, leading to eruptions. You call this a disease? And if this is a disease, as you say, then it has spread to Gujarat as well. When thousands of people from Uttar Pradesh and Bihar were chased out of Gujarat, why didn’t you go there to give lessons on harmony? Why didn’t you give the same lessons in Karnataka, Tamil Nadu, Andhra Pradesh, Punjab, or West Bengal?
It is not because the Marathi people are tolerant, but because the rulers here are spineless, that Mr. Bhagwat dares to speak this way. A few months ago, just before elections, Bhaiyyaji Joshi provoked the Marathi people by saying that Mumbai’s language is not only Marathi but also Gujarati, attempting to woo Gujarati speakers. All this was done to see how the BJP could benefit indirectly. Why should the Rashtriya Swayamsevak Sangh—which calls itself a non-political organization—get involved in such matters in the first place?
We have respect for the work of the Sangh, but that does not mean it should indulge in taking indirect political stance. And if you insist on doing so, then first show the courage to reprimand the government for imposing Hindi across the country (which, incidentally, is not even the national language), and only then lecture us on harmony.
And do not try to force-fit ‘Hindutva’ in all this. I have said this many times: If Hindus get attacked, we will retaliate as Hindus. It was the Maharashtra Navnirman Sena that took out a march against the riots instigated by the Raza Academy, that agitated against loudspeakers on mosques, and that took a stand against the nuisance caused to citizens by loud DJs and loudspeakers during Hindu festivals as well. What is wrong is wrong—we say it plainly. When will you, Mohanrao? There’s chaos unfolding across the country in the name of Hindutva—when will you speak about it? The grotesque manner in which women are made to dance during Kanwar Yatras in North India, the fact that India ranked 9th in beef exports in 2014, but is now ranked 2nd, and the spectacle of politics around cow slaughter that is being staged within the country, provoking communal frenzy—when will you speak about all this? When will you take the government to task over those traders?
Anyway, what you choose to do is up to you. For us, the Marathi language and the Marathi people are the ultimate and supreme priority.
Linguistic and regional identities will continue to exist in this country, and they will certainly continue to exist in Maharashtra as well. This is our ‘raison d'etre’, and whenever such situations arise, Maharashtra will rise with fury.
Raj Thackeray
“माणसातला माणूस जागा करणारे काही दिवस…”
माणसातला माणूस जागा आहे,
हे दाखवणारे काही दिवस असतात…
ते दिवस कुठल्या कॅलेंडरवर लाल रंगात लिहिलेले नसतात.
ते अचानक येतात.
दार ठोठावून नाही…
थेट मनात शिरून येतात.
त्या दिवशी घडणाऱ्या गोष्टींचा
आपला आणि आपला काहीही संबंध नसतो…
तरीसुद्धा,
आपसूक आपले डोळे पाणावतात.
कारण त्या दिवशी
आपण “मी” नसतो,
आपण फक्त एक माणूस असतो.
कधी रस्त्यावर अपघात पाहिलाय?
आपण त्या माणसाला ओळखत नाही.
त्याचं नाव, गाव, जात, धर्म… काहीच माहिती नसतं.
तरीही,
एक क्षण असा येतो की
आपली महत्वाची कामं सोडून देतो,
अपघात पाहून आपल्या आत काहीतरी हलतं.
का?
कारण त्या क्षणी
आपण स्वतःला त्याच्या जागी ठेवतो.
“हा मीही असू शकलो असतो…”
ही जाणीव माणसाला माणूस बनवते.
त्या क्षणी
आपण श्रीमंत नसतो, गरीब नसतो,
मोठे नसतो, लहान नसतो,
आपण फक्त हळवे बनलेलो असतो.
गायनाकोलॉजिस्ट च्या कॅबिन बाहेर बसलेली एखादी आई पाहिली आहे का?
हातात रिपोर्ट,
डोळ्यांत भीती,
ओठांवर देवाचं नाव.
ती तुमची आई नसते…
तरी तुम्हाला
आपल्या आईची-बहिणीची-बायकोची आठवण येते.
त्या दिवशी
तुमचा धर्म नाही विचारला जात.
तुमचा स्टेटस नाही विचारला जात.
तुमची माणुसकी विचारली जाते.
आणि त्या दिवशी
जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं,
तर समजा, माणसातला माणूस अजून जिवंत आहे.
आयुष्य चारच दिवसांचं आहे,
हे दाखवणारे काही दिवस असतात.
ते दिवस बहुतेकदा स्मशानाच्या वाटेवर सापडतात. चितेसमोर उभं राहिल्यावर कोणीही मोठा नसतो.
कोणीही लहान नसतो. तिथे फक्त एकच सत्य उरतं,
त्याचं सगळं संपलं आहे.
त्या चार दिवसात
त्याने काय मिळवलं, हे त्याचं बँक बॅलन्स सांगत नाहीत… त्याचे पुरस्कार सांगत नाहीत… त्याची गाडी, बंगला सांगत नाही…
ते सांगतात
चितेसमोरचे हुंदके.
त्या हुंदक्यांना ऐकायला शिकलात तर कळेल,
“हा माणूस चांगला होता”
की
“हा माणूस फक्त मोठा होता”
“याने वेळ दिला”
की
“याने फक्त उपदेश दिले”
“याने माणसं जोडली”
की
“याने फक्त स्वतःचा फायदा पाहिला”
मरणानंतर आपली ओळख
आपल्या शब्दांनी नाही,
आपल्या वागणुकीने ठरते.
एका छोट्या गावात, एक खूप साधा शिक्षक होता.
ना मोठं घर,
ना मोठी पोस्ट,
ना सोशल मीडियावर फॉलोअर्स.
तो अचानक देवाघरी गेला…
पण त्याच्या अंत्ययात्रेला संपूर्ण
गाव रडत होतं.
कोणी म्हणालं,“माझ्या मुलाला यांनी शिकवलं”
कोणी म्हणालं,“मला चुकीच्या मार्गावरून यांनी परत आणलं”
कोणी म्हणालं,“माझ्यावर विश्वास ठेवणारा हा एकच माणूस होता”
हा माणूस श्रीमंत नव्हता…
पण परिपूर्ण होता.
आपण रोज काय साठवतोय?
पैसा?
की आठवणी?
पद?
की नाती?
अहंकार?
की आधार?
कारण शेवटी
आपल्याबरोबर काहीच जात नाही.
आपल्या मागे
आपण कसे होतो
हेच राहतं.
आपल्याला शिकवलं गेलं,
“रडायचं नाही”
“मजबूत रहा”
“भावना दाखवू नका”
पण मित्रांनो,
डोळे पाणावतात,
तेव्हा माणूस कमजोर होत नाही…
तेव्हा तो खरा असतो.
जो रडू शकतो,
तो समजूनही घेऊ शकतो.
आणि जो समजून घेऊ शकतो,
तो माणूस राहतो.
आपण सगळेच व्यस्त आहोत.
आपण सगळेच थकलेले आहोत.
आपण सगळेच संघर्षात आहोत.
पण तरीही…
एखाद्याशी नीट बोलणं,
एखाद्याचं ऐकून घेणं,
एखाद्याच्या दुःखात थांबणं,
हे काही फार मोठे त्याग नाहीत.
हे फक्त माणूस असण्याचे पुरावे आहेत.
उद्या,
जर आपल्याही आयुष्याचे ते चार दिवस संपले…
तर चितेसमोर उभे असलेले लोक
काय म्हणतील?
“तो खूप चांगला होता”
की
“तो खूप अक्करमाशी होता”
कारण यशाला
शोक नसतो…
माणसाला असतो.
माणसातला माणूस जागा आहे,
हे दाखवणारे काही दिवस असतात…
पण खरं सांगायचं तर,
तो माणूस
दररोज जागा ठेवता आला पाहिजे.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा…
जेव्हा आपला शेवटचा दिवस येईल,
तो कुठलाही मोठा दिवस नसेल.
ना बँड-बाजा असेल,
ना घोषणा,
ना “आज माझा शेवटचा दिवस आहे” अशी पाटी.
तो दिवसही
इतर दिवसांसारखाच असेल.
लोक कामावर जात असतील…
कोणी हसत असेल…
कोणी भांडत असेल…
जग चालूच असेल…
फक्त
आपण नसू.
आणि त्या दिवशी
आपली ओळख
आपल्या नावाने नाही,
आपल्या पदाने नाही,
आपल्या पैशाने नाही…
तर
कुणाच्या डोळ्यातून पडणाऱ्या
एका थेंबाने होईल.
तो थेंब सांगेल,
“हा माणूस आपला होता…”
“याने मला वेळ दिला होता…”
“याने माझं ऐकून घेतलं होतं…”
“याने माझ्या वेदना कमी केल्या होत्या…”
जर त्या दिवशी
कुणाचे डोळे ओले झाले,
तर समजा,
आपलं आयुष्य वाया गेलं नाही.
कारण
पैसा आठवणीत राहत नाही…
यश फोटोमध्ये अडकतं…
पण
माणूस
डोळ्यात राहतो.
आणि म्हणूनच…
जमल्यास
प्रत्येकाशी नीट बोला…
लोकांना माफ करा…
लोकांची दुःख हलकं करा…
कारण, उद्या कोणासाठी तुम्ही डोळ्यातला तो थेंब असाल…
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !
असो . . .
मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो !
भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे.
दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे.
ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?
मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?
संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा.
आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार?
असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे.
या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील !
राज ठाकरे ।
@RohanMagdum7 खरंच आहे.कायमस्वरूपी WFH द्यायला पाहिजे. गावच वावर सोडून इकडे पुण्यात यायची अजिबात इच्छा होत नाही. पण काय करायचं.. ये पेट बडा पापी है मेरे दोस्त..