मैंने 7 साल बॉस के लिए रातें जलाईं, बदले में 500 रुपये मिले—फिर उसी 12 करोड़ के प्रोजेक्ट में मेरा नया ID देखकर पूरा ऑफिस काँप गया
मेरे पुराने बॉस का फोन सुबह 8 बजे आया, और कॉल उठाते ही उन्होंने चीखकर कहा—
“आर्या, तू अभी तक ऑफिस क्यों नहीं पहुँची? 12 करोड़ का प्रोजेक्ट आज सबमिट होना है! अगर क्लाइंट ने कॉन्ट्रैक्ट कैंसल कर दिया तो भरपाई तेरे बाप करेगा?”
मैंने मोबाइल कान से थोड़ा दूर कर लिया।
7 साल तक जिस आदमी ने मुझे इंसान नहीं, मशीन समझा था, वही आज भी मुझे आदेश दे रहा था।
सबसे अजीब बात यह थी कि मैं अब उसकी कर्मचारी थी ही नहीं।
और आज मेरा पहला दिन उसी क्लाइंट कंपनी में था, जिसके सामने वह हमेशा मुझे नीचा दिखाकर खुद चमकता था।
मैं आर्या मेहरा, गुड़गांव की एक मिडिल क्लास लड़की, जिसने नोएडा की एक मार्केटिंग एजेंसी में 7 साल तक दिन-रात काम किया। त्योहार हो, रविवार हो, बुखार हो या घर में परेशानी—मेरे लिए हमेशा एक ही लाइन होती थी, “आर्या संभाल लेगी।”
मेरे बॉस राघव भाटिया को लगता था कि मेरी चुप्पी मेरी कमजोरी है।
फोन पर वह फिर गरजा—
“कहाँ मर गई है तू? फाइनल रिपोर्ट का पासवर्ड क्या है? क्लाइंट के लोग रास्ते में हैं!”
मैंने शांत आवाज में कहा—
“सर, मैंने तो 10 दिन पहले इस्तीफा दे दिया था।”
कुछ सेकंड खामोशी रही। फिर लाइन कट गई।
उसके 2 मिनट बाद HR की नेहा मैम का फोन आया।
“आर्या, ये क्या बचपना है? राघव सर बहुत गुस्से में हैं। हाँ, बोनस को लेकर थोड़ा इशू हुआ था, पर इतना बड़ा प्रोजेक्ट छोड़कर कोई भागता है क्या?”
मैं हँसी नहीं, बस मुस्कुरा दी। वह बोनस नहीं, मेरी इज्जत का मजाक था।
पिछले साल मैंने उसी प्रोजेक्ट से कंपनी को करोड़ों का फायदा दिलाया था। प्रेजेंटेशन मैंने बनाए, क्लाइंट मीटिंग मैंने संभाली, रात 3 बजे तक रिपोर्ट मैंने सुधारी। मेरी माँ की तबीयत खराब थी, फिर भी मैंने अस्पताल के कॉरिडोर में बैठकर एक्सेल शीट भेजी थी।
लेकिन वार्षिक समारोह में “साल की सर्वश्रेष्ठ कर्मचारी” का अवॉर्ड मिला मेरी जूनियर सिया मल्होत्रा को।
उसे 2 लाख का बोनस, नया फोन और सबके सामने तालियाँ मिलीं।
मुझे मिला—500 रुपये का गिफ्ट वाउचर।
जब मैंने पूछा, “मेरा बोनस इतना कम क्यों?”
नेहा मैम बोली थीं—
“आर्या, तुम मेहनती हो, पर टीम में घुलती-मिलती नहीं। ऑफिस पार्टी में नहीं आतीं, लोगों से हँसती-बोलती नहीं। कंपनी सिर्फ काम नहीं देखती, व्यवहार भी देखती है।”
मैंने तब भी कुछ नहीं कहा था। क्योंकि जिस दिन टीम पार्टी कर रही थी, मैं क्लाइंट के लिए डेक बना रही थी। जिस रात सबने पब में फोटो डाली, मैं माँ को डॉक्टर के पास ले जाकर वापस लैपटॉप खोलकर बैठी थी।
आज वही लोग मुझे “कृतघ्न” कह रहे थे।
मैंने नेहा मैम से कहा—
“मेरे सभी हैंडओवर फाइल्स सर्वर पर हैं। मेरा नोटिस भी पूरा हो चुका है। अब कृपया मुझे फोन मत कीजिए।”
वह झल्लाईं—
“तुम समझती क्या हो खुद को? तुम्हारी उम्र 31 है, शादी नहीं हुई, डिग्री भी बड़ी नहीं है। बाहर इतनी आसानी से नौकरी नहीं मिलती। इंडस्ट्री छोटी है, राघव सर चाहें तो तुम्हारा करियर खत्म कर देंगे।”
मेरी उंगलियाँ ठंडी पड़ गईं, मगर आवाज नहीं काँपी।
“मैम, 7 साल मैंने डर में काम किया। अब नहीं।”
कॉल काटते ही मेरी आँखें भर आईं। मैं अपने छोटे से कमरे में आईने के सामने खड़ी थी। माँ रसोई में चाय बना रही थीं और बोलीं
“बेटा, आज नई नौकरी का पहला दिन है। रोना मत। जिसकी मेहनत सच्ची होती है, भगवान देर से सही, दरवाजा खोलता जरूर है।”
मैंने उनके पैर छुए और बैग उठाया
आज मुझे “तारा इंफ्रा ग्रुप” में जॉइन करना था वही बड़ा क्लाइंट, जिसके 12 करोड़ के कैंपेन को मैंने अपने हाथों से खड़ा किया था।
ऑफिस पहुँचते ही रिसेप्शनिस्ट ने मुस्कुराकर कहा
“मैम, अर्जुन सर आपका इंतजार कर रहे हैं।”
अर्जुन खन्ना, तारा ग्रुप के डायरेक्टर, हमेशा सीधे बोलते थे। उन्होंने मुझे बैठने को कहा और सामने एक फाइल रख दी
“आर्या, तुम्हारी पुरानी कंपनी ने आज हमारे प्रोजेक्ट का फाइनल ऑडिट बुलाया है। सच कहूँ तो हमें भरोसा नहीं है। हमें वह इंसान चाहिए जो इस काम को सच में जानता हो।”
मैं समझ गई
“आज तुम हमारी तरफ से जाओगी। प्रोजेक्ट ऑडिट हेड बनकर।”
मेरे हाथ में नया ID कार्ड दिया गया।
उस पर लिखा था
Project Audit Head: आर्या मेहरा
मुझे लगा जैसे 7 साल की बेइज्जती का जवाब मेरे हाथ में रख दिया गया हो।
लेकिन जैसे ही मैं पुरानी कंपनी के गेट पर पहुँची, मैंने शीशे के दरवाजे के पार राघव सर को देखा। वह सिया पर चिल्ला रहे थे, और मेरी पुरानी सीट पर बैठा कोई मेरी फाइलें खोलने की कोशिश कर रहा था।
मैंने गहरी साँस ली दरवाजा खुला।
और पूरे ऑफिस की नजर एक साथ मेरी गर्दन में लटके तारा ग्रुप के ID कार्ड पर जम गई।
थोडं थांबू… gas असेल
हेच वाक्य heart attack मध्ये सर्वात महाग पडतं
OPD आणि ICU मध्ये वारंवार दिसलेलं एकच सत्य…
छातीत दुखायला सुरुवात होते
रुग्ण थांबतो
कुटुंब थांबतं
आणि वेळ निघून जातो
1️⃣ Heart attack सुरू होतो तेव्हा
शरीर आपल्याला थांबायला सांगत नाही…
👉 तो action घ्यायला सांगत असतो
• artery मध्ये clot तयार होतो
• blood flow अचानक कमी होतो
त्या क्षणापासून
heart muscle ला oxygen मिळणं थांबतं
2️⃣ पहिले 2–3 तास हेच “golden window” असतात
clinical practice आणि guidelines सांगतात:
90–120 minutes मध्ये artery उघडली तर muscle मोठ्या प्रमाणात वाचतो
3–6 तासांनंतर damage irreversible होऊ लागतो
म्हणजेच प्रत्येक तास muscle कमी करत जातो
3️⃣ सर्वात मोठी चूक “wait and watch”
“थोडं थांबू…”
“gas असेल…”
“रात्र आहे… सकाळी जाऊ…”
हे decisions छोटे वाटतात
पण याच वेळेत clot स्थिर होतो आणि damage वाढतो
4️⃣ Pain कमी झाला म्हणजे धोका गेला असं नसतं
काही वेळा pain कमी होतो
पण blockage तसाच राहतो
आणि मग पुढचा attack
अधिक मोठा आणि धोकादायक असू शकतो
5️⃣ उशीराची किंमत काय असते?
✅ वेळेत पोहोचला तर:
angioplasty वेळेत होते
heart ची pumping power (EF) टिकते
रुग्ण normal आयुष्य जगू शकतो
❗ उशीर झाला तर:
muscle permanently damage
EF कमी (30–40%)
आयुष्यभर औषधं + मर्यादा + repeated admissions
decision काही तासांचा…
परिणाम आयुष्यभराचा
6️⃣ ICU मध्ये आम्ही treatment देतो…
पण outcome आधीच ठरत असतो
रुग्ण किती वेळात पोहोचला
हा factor सर्वात मोठा असतो
औषधं सारखी असतात…
machines सारख्या असतात…
वेळ वेगळी असते
7️⃣ urgency म्हणजे panic नाही…
urgency म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय
छातीत दुखत असेल तर
“observe” नाही…
“act immediately”
8️⃣ एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या
heart attack मध्ये
“time is muscle” ही फक्त line नाही
ही रोज ICU मध्ये दिसणारी reality आहे
“छातीत दुखायला सुरुवात झाली की
घड्याळ तुमच्यासाठी चालू झालेलं असतं”
ही माहिती फक्त तुमच्यासाठी नाही…
ती योग्य वेळी तुमच्यामुळे कुणाला उपयोगी पडण्यासाठी आहे
Like ❤️ | Repost | Follow
Dr Ravindra L Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
#TimeMatters #HeartAttackAwareness #ClinicalWisdom #GoldenHour #JustForHearts #CardiacEmergency #TimeIsMuscle
सेन्सेक्स एका महिन्यापूर्वी ८५,००० अंशावर होता तो मागच्या आठवड्यात शुक्रवारी ८१,५०० अंशावर बंद झाला. म्हणजे ४००० अंशाने खाली..
फक्त मागच्या आठवड्यात पाच दिवसात परकीय गुंतवणूकदार संस्थांनी १०,००० कोटी रुपयांचे भारतीय शेयर्स विकले. त्यांच्या भारतीय शेयर्सचा विक्रीचा सपाटा काही थांबत नाही.
सेन्सेक्स खाली गेला की कारणांची जंत्री लावतात. उदा आता कारणे दिली जात आहेत ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर केलेला दावा, अदानीवर न्यूयॉर्क कोर्ट समन्स बजावू शकते इत्यादी
ही कारणे देताना आव असा असतो की शेयर्स / सेन्सेक्स जो वर गेला तो फक्त आणि फक्त मेरीटवर. त्यात सट्टेबाजी नसते.
ट्रम्प जगात धुमाकूळ घालणार याचे आपले रंग दाखवायला सुरुवात होऊन एक वर्ष झाले , अडाणी वरील आरोप मार्केटला माहित होते. जगात हे सर्व काही घडत असताना गेल्या वर्षभरात सेन्सेक्स ११,००० अंशांनी वधारला होता. त्यावेळी ही कारणे मग का आडवी आली नाहीत.
___________________
माझा मुद्दा वेगळा आहे. नेहमीच असतो.
शेयर मार्केट माझ्या टीकेमुळे सुधारणार नाहीये. माझा कन्सर्न फक्त मार्केटमधील सामान्य गुंतवणूकदारांबद्दल असतो. त्यातील अनेक जण आयुष्यात पहिल्यांदा गेल्या चार पाच वर्षात शेअर्स मध्ये गुंतवणूक करू लागले आहेत, त्यांना जगात, देशाच्या अर्थव्यवस्थेत, नक्की काय सुरू आहे याची माहिती घेण्यास वेळ , कुवत देखील नसतो. मग त्याचे परिणाम अभ्यासणे, त्याचे अन्वयार्थ लावणे दूरच
शेयर मार्केट नको तेवढे वर चढले आहे, जरा सबुरीने घ्या असे लिहिले रे लिहिले की लगेच “हे डावे लोक संपत्ती निर्माण विरोधी असतात” वगैरे लेबले लावणारे तलवारी पाजळत अंगावर येतात. मी त्यांच्या तोंडी कधी लागत नाही.
शेयर बाजारात जे स्ट्राँग गुंतवणूकदार असतात त्यांना सल्ले देण्याची गरज नसते. स्ट्राँग गुंतवणूकदार इन्फॉर्मेड आणि तातडीने निर्णय घेतात, इंटरनेट वरून अपडेटेड राहतात, त्यांच्या गुंतवणुकी नेहमीच diversified असतात. शेअर्स त्यापैकी फक्त एक असतो. सर्वात महत्वाचे. तोटा झालाच तर तो शोषून घेण्याची क्षमता असते. त्यांच्या राहणीमानात काहीही फरक पडणार नसतो.
सामान्य नागरिकांना / छोटे गुंतवणूकदार वीक गुंतवणूकदार म्हटले जाते. त्यांची तोटा सहन करण्याची / जोखीम क्षमता कमी असते. माहिती / अभ्यास नसल्यामुळे ते टिप्स वरून गुंतवणुकीचे निर्णय घेतात , आणि शेयर/ मार्केट खाली जाऊ लागले की पॅनिक होतात. शेअर्स विकतात. जोखीम क्षमता फक्त पैशातून नाही तर फक्त रिस्क कॅपिटल मधून येते जे या वर्गाकडे कमी असते. त्याचे सोंग देखील आणता येत नाही.
________________________
काही वर्षाच्या अनुभवावरून सामान्य गुंतवणूकदार” शहाणपण दाखवू लागले आहेत असे आकडेवारी वरून दिसते.
देशातील डिमॅट अकाउंट उघडणाऱ्यांचा उत्साह कमी झाला आहे. जरी एकूण डिमॅट अकाऊंटची संख्या २१ कोटींवर असली डिमॅट अकाउंट उघडणाऱ्या लोकांची संख्या सतत घटत आहे. मार्केटमध्ये सक्रिय गुंतवणूकदारांची संख्या कमी होत आहे. २०२४ मध्ये ५ कोटी होती ती २०२५ मध्ये ४.५ कोटींवर आहे. म्युच्युअल फंड. एस आय पी इत्यादींमध्ये गुंतवणुकी होत आहेत , पण त्यांचा वेग मंदावला आहे
जे चांगले लक्षण आहे. रस्त्याप्रमाणे गियर चेंज करणे, स्पीड कमी करणे हेच तर हवे आहे. “आपले शीर आपल्याच धडावर” हा मंत्र येथे देखील हवा.
संजीव चांदोरकर (२७ जानेवारी २०२६)
एक दिवस... तुम्ही विचार कराल:
लवकर सुरुवात केली असती तर?
जरा जास्त धैर्य दाखवलं असतं तर?
अजून थांबलो नसतो तर?
भीती क्षणिक आहे,
पण पश्चात्ताप सोबतच राहतो.
#weareforyou365
माझा कर्मावर खूप विश्वास आहे, नाही सोडत ते तुम्हाला सहजासहजी, इंदुरीकर महाराजांची हयात गेली लोकांच्या लेकरांना नावं ठेवण्यात, पण शेवटी कर्माने गाठलंच...
“हृदयविकाराचा झटका”
काय करायचं? घाबरायचं नाही, समजून घ्या!
तुमच्या नातेवाईकाला अचानक छातीत जोरदार दुखायला लागलं, घाम आला, श्वास घ्यायला त्रास… हृदयविकाराचा झटका असू शकतो. अशा वेळी काय कराल? कोणी ambulance बोलवतो, कोणी tablet देतो, पण खरं योग्य treatment काय?
हा मार्गदर्शक लेख आहे. डॉक्टर, पेशंट, नातेवाईक आणि सामान्य नागरिकांसाठी सुद्धा उपयोगी!
1. तातडीनं रुग्णालयात पोहोचा. “Golden Hour” चा फायदा घ्या. पहिल्या 1 तासात (Golden Hour) रुग्णालयात गेलात, तर हृदय वाचण्याची शक्यता 80% पेक्षा जास्त असते.
2. प्राथमिक उपचार करताना जर डॉक्टरांशी संपर्क होतोय आणि हृदयविकाराचा संशय पक्का आहे, तर Dispersible Aspirin 325 mg तोंडात ठेवून चघळा.
3. ECG व Troponin टेस्ट त्वरित करा. रुग्णालयात गेल्यावर ECG आणि Troponin I/T चा report हृदयविकाराचा प्रकार स्पष्ट करतो.
4. दोन मुख्य पर्याय:
Thrombolysis (TPA injection)
•रुग्णालयात इंजेक्शन (Streptokinase / Tenecteplase / Alteplase) दिलं जातं जे रक्तातील clot विरघळवतो.
•50-70% success rate.
•खर्च: ₹3000 (Streptokinase) ते ₹30,000+ (Alteplase/TPA) पर्यंत.
Primary Angioplasty (Best if available)
•रुग्णाला लगेच Cath Lab मध्ये नेऊन direct block काढतात आणि stent टाकतात.
•Success rate: 90-95%
•खर्च: ₹1.5 लाख ते ₹2.5 लाख (depending on stent type, hospital).
•आयुष्यमान भारत/महात्मा फुले योजना मध्ये काही हॉस्पिटल्समध्ये मोफत किंवा कमी दरात उपलब्ध.
5. जर Angioplasty शक्य नसेल, तर Thrombolysis करा , पण उपचाराची संधी दवडू नका. रात्री, ग्रामीण भाग, किंवा Cath Lab नसलेल्या हॉस्पिटलमध्ये थ्रोम्बोलायसिसच पर्याय असतो.
मग पुढे आवश्यक असेल तर Rescue Angioplasty केली जाते.
6. हॉस्पिटलमध्ये 4-5 दिवस राहावं लागतं. Stent टाकल्यावर 1–2 दिवस ICU आणि नंतर general ward.
7. पुढील काळजी: औषधं, Diet, आणि Cardiac Rehab. Lifelong blood thinners (Ecosprin, Clopidogrel), BP/Sugar कंट्रोल, lipid-lowering medicines (statins) लागतात.
Lifestyle सुधारल्यास future attacks टाळता येतात.
8. Cardiac Rehab आवश्यक पण दुर्लक्षित. चालणं, श्वासाचे व्यायाम, आहार, मानसशास्त्र यांचं combination - scientifically proven to reduce future heart attacks.
Just For Hearts सारखे year-round monitoring programs फार उपयोगी.
9. घाबरू नका , पण वेळ वाया घालवू नका. Ambulance रस्त्यात अडली, डॉक्टर मिळेपर्यंत वेळ गेला, injection नाही मिळालं… अशा चुका टाळता येतात पूर्व तयारीने. नातेवाईकांनी CPR शिकणंही उपयुक्त.
10. हृदयविकार होऊ नये म्हणून: रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा
90% heart attacks lifestyle-related असतात. दिवसातून 30 मिनिटं चालणं, सकस आहार, नियमित तपासणी हाच खरा उपाय!
हा पोस्ट सर्व कुटुंबांमध्ये, ग्रुप्समध्ये share करा. Emergency आली तर कशाचाही विचार करायला वेळ नसतो , हे ज्ञान जीव वाचवू शकतं.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#HeartAttack #CardiacCare #GoldenHour #TPAvsAngioplasty #CardiologistAdvice #JustForHearts #HeartHealth #EmergencyTips #ShareToSave
आज आहे.. सोने चांदी इ कमोडिटीच्या
F & O ची एक्सपायरी..हजारो कोटींची उलाढाल..
आणि आजच्याच दिवशी भारतातले सर्वात मोठे कमोडिटी exchange.. @MCXIndialtd बंद पडले..😭🤯😂
ह्याची गोष्ट..ज्यात ३ पात्र आहेत - #MCX , 63 moons आणि @TCS लै भारी आहे..ती यानिमित्ताने आज सांगतो..👇
सरासरी घराचे🏡 कर्ज १५ वर्षे चालते.
सरासरी SIP 💰फक्त २.५ वर्षे टिकते.
लोक बँकांना 🏦 कित्येक वर्षे पैसे भरतात,
पण संपत्ती निर्माण करण्यावरचा विश्वास काही महिन्यांतच संपतो.
जर SIP ला EMI सारखं मानलं तर काय होईल?
मध्यमवर्गीय फक्त कर्जमुक्तच नाही, तर श्रीमंतही होईल का?
Are you tired of paying too much tax? If so, you're not alone.
Check out this comprehensive list of available deductions to taxpayers! 🧵
#TaxPlanning#Taxsavings
All in one Page!
Retweet if you like it and share it with others!
आपल्या कुटुंबात किती लोक रहातात..कोण काय करतोय.. त्यांची आर्थिक सामाजिक पत काय आहे.. हे जर कुटुंब चालवणाऱ्या प्रमुखास माहिती नसेल.. तर तो कशाप्रकारे भविष्याचे नियोजन करत असेल..?
आपली जनगणना होऊन किती वर्षे झाली..लक्षात घ्या.. आपलं सगळं नियोजन कोणत्या डेटाच्या जिवावर सुरुय..❤️
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
विविध फंड्स आणि त्यांचे प्रकार समजून घेतल्यास, आपल्या उद्दिष्टांनुसार योग्य निवड केली जाऊ शकते.
अधिक माहितीसाठी मेसेज करा..
#MutualFunds#Investment#FinancialPlanning
आरोग्य विमा घेणं ही सध्याच्या काळातील महत्वाची गरज बनली आहे. आजारपण आणि दुखापतींच्या खर्चामुळे आरोग्य आरोग्य विमा घेणं आवश्यक बनलं आहे.
१. आरोग्य विम्याची आजारपणात सर्वात जास्त गरज असते. एकदा प्रीमियम भरल्यानंतर वर्षभराच्या कालावधीत विशिष्ट रकमेचा विमा दिला जातो.
"गुंतवणूक ही फक्त पैसा वाढवण्याची प्रक्रिया नाही, तर सुरक्षित भविष्यासाठी घेतलेला शहाणपणाचा निर्णय आहे. आज लहान पाऊल उचलले तर उद्या मोठा फायदा मिळेल."
#आर्थिकनियोजन#गुंतवणूक#आर्थिकयोजना
बीड जिल्हा आणि #जरांगे_पॅटर्न . मी दहा वर्षे झालं ट्विटरवर आहे आत्तापर्यंत कोणत्याच पक्षाची बाजू घेतली नाही एकदम न्यूट्रल राहून हा थ्रेड वाचवा.
लोकसभेला बूथ सांभाळायला सुद्धा कार्यकर्ते नसलेल्या शरद पवार गटाला जिल्ह्यातील मराठा समाजाने बहुमत दिलं. पण निवडून आल्यास त्यांनी (1/n)
#StockMarketअभ्यास
🚨🚨 मार्केट पडलंय तर आता कोणते शेअर घ्यायचे ? 🚨🚨
#थोड्क्यात
आता मार्केट पडलंच आहे तर
अनेक लोक जे शेअर जास्त पडलेत ते शेअर घ्यायला जातील..पण..
असे करणे नेहमीच फायद्याचे नसते..!🤯
खरं तर..
मार्केट जेव्हा पडतं तेव्हा असे शेअर घ्यायला पाहिजेत जे सर्वात कमी पडलेत..!
विशेषकरून अशा लोकांनी ज्यांना ५ वर्षाच्या आत परत पैसे पाहिजेत..!
का म्हणताय ?👇
आपल्याला वाटतं की जो शेअर जास्त पडलाय तो शेअर जास्त वर जाईल आणि मग आपल्याला जास्त नफा होईल..!
आणि हे खरं पण आहे..पण ह्या वरच्या विचारात आपण हा विचार करत नाही की तो शेअर परत वर जायला किती वेळ घेईल..?!
ज्याअर्थी एखादा शेअर किंवा एखादे सेक्टर इतर सेक्टर पेक्षा जास्त पडते ह्याचा अर्थ आपल्यापेक्षा जास्त अक्कल आणि पैसा असणाऱ्या (DII/FII etc)लोकांनी तिथून पैसे काढून घेतले आहेत..आणि साहजिकच त्याला काहीतरी कारण असणार..जे मला किंवा तुम्हाला कळेलच असे नाही..!🛬
याउलट..जे सेक्टर किंवा शेअर सर्वात कमी पडलाय तिथे साहजीकच सर्वात कमी शेअर विकले गेलेत आणि जेव्हा कधी मार्केट वर जाईल तेव्हा ते अजूनच वेगाने आणि कदाचित सर्वात आधी वर जातील..!🛫
थोडक्यात काय तर -
जे कमी पडलेत ते कमी काळ पडलेले राहायची शक्यता जास्त आहे आणि
जे जास्त पडलेत ते खूप जास्त काळ पडलेले राहू शकतात ह्याची शक्यता जास्त आहे..!
टीप
१) वाचायला ऐकायला वरील पद्धत चुकीची वाटेल काहींना पण ह्या पद्धतीला Momentum Investing असे म्हणतात. आणि ही पद्धत ५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ संयम असणाऱ्या ( म्हणजे आपण सर्वच की 😬😜) लोकांसाठी आहे.
२) प्रॉब्लेम असा आहे की भारतात बफेटला खूपच मानतात..पण बफेट ने जसे शेअर अनेक वर्ष सांभाळले तसे राहू द्यायची..किंवा तेव्हडा संयम ठेवायची ना आपली तयारी असते ना mentality..!
म्हणून मग अनेक वर्ष ठेऊ म्हणून शेअर घेतले जातात पण बाकीचे शेअर वर चालले आणि आपला नाही गेला की आपण मागे पडतोय असे म्हणत हळूच विकले जातात..😬😅
३) हे खालचे फोटो👇 सेक्टर wise गेल्या ३ महिन्यात कोण किती पडले ते दाखवत आहेत..ते बघा आणि योग्य ते सेक्टर व त्यातील शेअर निवडून मलाही सांगा..😅
४) Btw बफेट ने जे केलंय त्याला value investing म्हणतात.. जे फार फार फार फार कमी लोक करतात..तुम्ही जर त्या प्रकारात मोडत असाल तर त्यावरही असच कधीतरी लिहेनच..✌️
५) वर लिहिलेले फक्त आणि फक्त माझे मत आहे..आणि मी कोणी ह्या क्षेत्रातला तज्ञ नाही कृपया ह्याची नोंद घ्यावी..🙏
#अभिजात
#म
#StockMarketअभ्यास#IPO
>>>🔴 कोणत्याही IPO ची लॉटरी लागली..🤑
की पुढे काय करायचं ?
शेअर विकायचे का राहू द्यायचे? 🔴<<<
अशावेळी आपल्यासमोर काय काय पर्याय आहेत ते बघू..👇
>> १) एकही शेअर न विकणे.
हा पर्याय तसा चांगला वाटतं असला तरी हा जे खरेखुरे गुंतवणुकदार आहेत त्यांच्यासाठी आहे.
कारण - एका पाहणीनुसार
IPO लिस्ट झाल्यानंतर पुढच्या एका वर्षात ७५%हून जास्त कंपन्यांचे शेअर हे IPO च्या किमतीच्या खाली येतात.*
आता जो पुढच्या १०+ वर्षाच्या गुंतवणुकीचा , विचार करून शेअर घेतोय त्याला हा फरक पडत नाही..पण खरं सांगायचं तर असे गुंतवणुकदार आजच्या सोशल मीडियाच्या काळात नाहीच..म्हणून आपल्याला जरी वाटतं असेल की मी गुंतवणुकदार आहे तरी
जर समजा तुमचा शेअर पुढे खाली आला तर आपला निर्णय चुकला तर नाही असा विचार येणार म्हणजे येणारच..😅
म्हणून हा पर्याय रिटेल गुंतवणूकदारांसाठी नाहीच असे समजूनच आपण चालायचे..!
>> २) सगळे शेअर विकले.
हा पर्याय तर पहिल्या पर्यायापेक्षा कधीही चांगला.
कारण धंद्याचा नियमच आहे - आज हातात असणारा पैसा हा भविष्यात कधीतरी मिळणाऱ्या पैशापेक्षा कधीही चांगला..!
म्हणून प्रॉफिट बुक केला म्हणून कधीही पश्चात्ताप करायचा नाही..पुढे मग तो शेअर कितीही वाढू दे..आज आपल्या हातात खरेखुरे पैसे आले ना..बास्स..!
पण हा पर्यायही मराठी माणसाला पचत नाही असं मी अनेकदा पाहिलं आहे.
आपण विकलेला शेअर पुढे जाऊन वाढला की उगाच तेव्हा विकला नसता तर हा विचार करून अनेकदा पुढचे विकायचे शेअर न विकून नुकसान करून घेणे ही पद्धत पण काय खूप दुर्मिळ नाही..😬
>> ३) थोडे शेअर विकायचे.
हा सुवर्णमध्य अनेकांना पटण्यासारखा आहे.
आता ह्यासाठी आपण इथे IPO चे थ्रेड वाचता..त्या IPO चा जो अभ्यास करता त्यावरून नक्की किती शेअर विकायचे ते ठरवू शकता.
तरी हा निर्णय सोपा जावा म्हणून ह्या सूचनेची मदत होते का बघा👇
IPO कंपनीचे
१)भविष्य खूप उज्ज्वल वाटतं असेल तर -
२५% शेअर लगेच विकायचे.
२) तुम्हाला त्या IPO बद्दल काहीच कळत नसेल..माहीत नसेल तर - ५०% शेअर.
३) तुम्हाला माहित असेल की IPO तर भंगार आहे पण तरी मार्केट मध्ये हवा आहे म्हणून फायदा मिळतोय तर ७५% शेअर लगेच विकून टाकायचे.
आणि बाकी जे शेअर राहतील..
त्यांना विकून मिळालेल्या फायद्याच्या ५०% वर स्टॉप लॉस लावायचा.
उदा. १०० चा शेअर १५० ला लिस्ट झाला आणि मी काही शेअर विकले तर
विकलेल्या शेअर वर मला झालेला फायदा ५०₹
आता मी बाकीच्या शेअर ला ५०%ने
म्हणजे ५०₹ चे ५०% = २५₹
१२५₹ वर Stoploss लावायचा.
म्हणजे १२५₹ पर्यंत जर शेअर पडला तर राहिलेले सगळे शेअर विकून बाहेर पडायचे..!
ह्या तिसऱ्या पद्धतीने IPO कोणताही असला तरी
लॉस व्हायचा थोडा धोका घेऊन मोठ्या नफ्याची शक्यता
शेअर नंतर वर गेला किंवा खाली गेला तरीही कायम राहते..!
#म
टीप -
१) मला IPO लागला की मी काय करेन हे फक्त मी वर नमूद केले आहे.
२) मला कधीही IPO लागलेला नाही म्हणून मला ह्या सर्वाचा शून्य अनुभव आहे ह्याची आपण निर्णय घेताना नोंद घ्यावी.
३) वरील थ्रेड काहींनी हा प्रश्न विचारला म्हणून लिहिण्यात आला.. त्यांचे धन्यवाद..🙌
आणि म्हणून काही प्रश्न असेल तर नक्की विचारत रहा..मला जितकं कळतं तितकं तर मी नक्की सांगेन..फक्त नंतरचा निर्णय पूर्णपणे तुमचाच आहे ह्याची जाणीव असू द्या..😅😜🙏
४) आणि शेवटचं म्हणजे प्रत्येक IPO फायद्याचं राहतो असे नाही म्हणून लॉस मध्ये आला तर काय ह्याचं उत्तर काय हे ठरवता येतं का ते विचार करून बघाच एकदा..😉🖖