@Dhananjay4INC PMC JE (Civil) परीक्षेसाठी खूप विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा दूर-दूरची खाजगी परीक्षा केंद्रे नियुक्त करण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांची विनम्र विनंती आहे की परीक्षा जवळील व TCS iON Digital परीक्षा केंद्रांवर नियोजित तारखेलाआयोजित करण्यात यावी.
@PMCPune@CMOMaharashtra
PMC JE परीक्षेचे सेंटर हे TCS iON डिजिटल च असावे या साठी याआधी आंदोलन झाले होते मग पुन्हा private सेंटर का दिले? विद्यार्थ्���ांनी फक्त काय आंदोलनच करत राहायचं का? 350-400 km लांब सेंटर आणि रिपोर्टींग सकाळी 8 वा. उशिर झाला तर प्रवेश नाही..अजून किती अंत बघणार @PMCPune @Dev_Fadnavis
संदर्भ : महाराष्ट्र_काँग्रेस/२०२६/००६.
प्रति,
मा. आयुक्त,
पुणे महानगरपालिका,
पुणे.
विषय : PMC Junior Engineer (Civil) परीक्षा केवळ TCS iON अधिकृत केंद्रांवर घेण्याबाबत.
महोदय,
पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या Junior Engineer (Civil) पदाच्या परीक्षेबाबत, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो व��द्यार्थ्यांच्या वतीने ही बाब आपल्या निदर्शनास आणत आहे.
दिनांक १ डिसेंबर २०२५ पूर्वीच सदर परीक्षा TCS iON या अधिकृत आणि विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी, अशी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सकारात्मक विचार होईल, या अपेक्षेने पुणे महानगरपालिकेने परीक्षेची तारीख पुढे ढकलली होती. मात्र, आता हीच परीक्षा २५ जानेवारी २०२६ रोजी खासगी (Private) परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येत असल्याचे समजते, जे अत्यंत चिंताजनक आहे.
१) परीक्षा सुव्यवस्था आणि केंद्र व्यवस्थापन :
सदर परीक्षा पुन्हा खासगी केंद्रांवर आयोजित करण्यात आली असून, अनेक उमेदवारांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून ३००-४०० किलोमीटर अंतरावर केंद्रे वाटप करण्यात आली आहेत. सामान्यत: अशा मोठ्या प्रमाणातील परीक्षा TCS iON सारख्या सक्षम यंत्रणेमार्फत २-३ दिवसांच्या स्लॉटमध्ये सुव्यवस्थितपणे पार पाडता येतात. मात्र, PMC सारखी महत्त्वाची परीक्षा एकाच दिवशी ४२,००० पेक्षा अधिक उमेदवारांसाठी खासगी केंद्रांवर घेण्यात येत आहे. यातील अनेक केंद्रांची रेटिंग, सुविधा आणि पारदर्शकता अत्यंत निकृष्ट असल्याची वस्तुस्थिती आहे.
२) परीक्षा गांभीर्य आणि उमेदवारांचा मानसिक त्रास :
अचानक आणि पुरेशी पूर्वसूचना न देता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास नियोजन, निवास व्यवस्था तसेच काही उमेदवारांना स्थानिक ��्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ड्युटीसंबंधी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तब्बल २ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या परीक्षेसाठी अपारदर्शक आणि असुविधाजनक खासगी केंद्रांवर परीक्षा देण्याची सक्ती केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता, आपणास विनम्र विनंती आहे की, PMC Junior Engineer (Civil) परीक्षा दिनांक २५ जानेवारी २०२६ ही केवळ TCS iON अ���िकृत केंद्रांवरच आयोजित करण्यात यावी. यामुळे परीक्षेतील पारदर्शकता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता सुनिश्चित होईल. तसेच, उमेदवारांचा अनावश्यक प्रवासाचा त्रास टाळून योग्य आणि समतोल परीक्षा वातावरण निर्माण होईल.
आपण विद्यार्थ्यांच्या हक्क, भविष्य आणि प्रशासकीय जबाबदारीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी करिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग (भ्रमणध्वनी : ९८६७६ ९३५८८)
प्रत,
मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, प्रांताध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@PMCPune @INCHarshsapkal @INCMaharashtra @CMOMaharashtra
PMCJE जाहिरात आली 2024 ला
2 years पेपर नाही
एक notification येत.1 dec 2025 ला पेपर होणार विद्यार्थ्यांना choice center सोडून वेगळं private center येत 500+ km लांबच ..
विद्यार्थ्यांच्या त्यांच्या हक्कासाठी लढलेtcs ion center साठी
Exam postponed होतेय
परत तेच #pmc#TCSion
PMC JE (Civil) परीक्षा ज्या कारणामुळे ज्या समस्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती त्या समस्येचं निवारण न करता परत एकदा त्याहीपेक्षा खूप दूर अंतरावरती आणि प्रायव्हेट सेंटर वरती परीक्षेचे ठिकाण देण्यात आले.
महानगरपालिका आयुक्त आणि आयबीपीएस तुमचा नेमका हेतू काय ?
@PMCPune
��ाज्यातील सर्व स्पर्धात्मक आणि भरती परीक्षा अनेक वर्षांपासून अधिकृत, सुरक्षित आणि विश्वासार्ह TCS iON केंद्रांवर सुरळीतपणे पार पडत आहेत. मात्र 25 जानेवारी 2026 रोजी होणारी पुणे महानगरपालिका ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक खाजगी, कमी दर्जाच्या आणि खराब रेटिंग असलेल्या केंद्रांवर घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आणि गोंधळ निर्माण झाला आहे.
उमेदवारांकडून आधीच भरमसाठ परीक्षा शुल्क आकारूनही, स्वतःच्या शहरापासून 300–400 किमी दूर खाजगी केंद्रावर परीक्षा द्यावी लागणे हे अत्यंत गैरसोयीचे व अन्यायकारक आहे. प्रवासाचा खर्च, राहण्याची सोय, वेळेची उधळपट्टी, धावपळ आणि मानसिक ताण या सर्वांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या तयारी व आत्मविश्वासावर होत आहे.
यापूर्वी अनेक भरती परीक्षांमध्ये खाजगी केंद्रांवर तांत्रिक बिघाड, गैरप्रकार, अव्यवस्था आणि व्यवस्थापनातील त्रुटी दिसून आल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास आधीच कमी झाला आहे. अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिका सारख्या महत्त्वाच्या भरती प्रक्रियेसाठी खाजगी, कमी दर्जाच्या केंद्रांचा वापर करणे हे पूर्णपणे अव्यवहार्य आणि विद्यार्थ्यांवर अ��्याय करणारे आहे.
आज राज्यभरातील हजारो उमेदवार अचानक जाहीर झालेल्या दूरच्या केंद्रांमुळे त्रस्त आहेत. खाजगी केंद्रांचा निर्णय तातडीने मागे घेऊन परीक्षा केंद्रांचे पुनर्नियोजन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसानीसाठी पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील. या संपूर्ण लढ्यात NSUI विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभी आहे. अधिकृत TCS iON केंद्रांवर��� परीक्षा घ्या. विश्वास, सुरक्षितता आणि पारदर्शकतेशी तडजोड मान्य नाही.
यावेळी NSUI चे महासचिव निशांत देशमुख, प्रदेश महासचिव अँड. कौस्तुभ पाटील,कृष्णा साठे, आदित्य भिसे, NSUI चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@Maharashtransui
#PMC JE Exam 25/1/2026 ला होणार आहे तरी बऱ्याच students ला खूप लांबचे सेंटर दिले आहेत आणि ते पण private सर्व विद्यार्थी ची मागणी अशी आहे की exam TCS ion वर घ्यावी.
#PMC ला नम्र विनंती आहे की exam 25/1/2026 ला च घ्यावी फक्त TCS ION वर घ्यावी ही नम्र विनंती.
#PMC_JE@pmc
PMC कनिष्ठ अभियंता (JE) परीक्षा 25 जानेवारी 2026 ही फक्त TCS iON Digital Center वर घ्यावी.
Digital iON चे आश्वासन असूनही Private Center देण्यात आले आहेत.
काही उमेदवारांना 450+ किमी दूर केंद्र दिले गेले आहे.
आयुक्तांनी तात्काळ दखल घ्यावी.
#PMC#JEExam#TCSiON#StudentIssues
PMC Junior Engineer (Civil) परीक्षा 25 जानेवारी 2026 रोजी खाजगी व खराब रेटिंगच्या केंद्रांवर घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. 300-400 किमी दूर परीक्षा केंद्र, अचानक जाहीर केलेली तारीख आणि हजारो विद्यार्थ्यांचा गोंधळ म्हणजे त्यांचा मानसिक-आर्थिक छळ आहे.
ही परीक्षा फक्त TCS ION अधिकृत केंद्रांवर आयोजित करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना पारदर्शकता, सुव्यवस्था व सुरक्षितता मिळेल.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
जाहीर पाठिंबा ✊📘
पुण्यातील सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन आंदोलन हे लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक आहे. आपल्या हक्कांसाठी शांत, शिस्तबद्ध आणि वैचारिक मार्गाने लढा देणे हीच खरी लोकशाही आहे.
PMC तसेच MJP व MAHATRANSCO संदर्भातील अन्यायकारक निर्णयांविरोधात विद्यार्थ्यांनी उचललेले हे पाऊल संविधान, समान संधी आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने आहे. पुस्तक हातात घेऊन रस्त्यावर उतरलेली तरुणाई ही कुठल्याही सरकारसाठी गंभीर इशारा असते.
काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाऊ नये, त्यांच्या भविष्या���ी खेळ केला जाऊ नये, हीच आमची ठाम भूमिका आहे.
@INCMaharashtra @INCIndia @PMCPune
#पुस्तकवाचनआंदोलन #विद्यार्थीहक्क #संविधान #लोकशाही #पुणे #Dhananjay_Shinde #DhananjayShinde
PMC पेपर ला अवघे 4 दिवस राहिलेत 500+ km लांब त्यातपण Private Center देऊन विद्यार्थ्यांवरती होणार अन्याय थांबवा. लवकरात लवकर अधिकृत Center देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
PMC Jr इंजिनिअर पदभरतीसाठी २५ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्जात निवडलेली परीक्षा केंद्रे देण्यात आलेली नाहीत.
काही विद्यार्थ्यांना शेकडो किमी अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. पुणे महापालिका आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करून परीक्षा केंद्रे बदलून अधिकृत TCS iON Centre वर परीक्षा घ्यावी.
#TCSion
@PMCPune@navalMH
राज्यातील अनेक परीक्षा TCS iON Center वर सुरळीत होत असताना 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या PMC ज्युनियर अभियंता परीक्षा खाजगी आणि वाईट रेटींग असलेल्या केंद्रावर का घेतली जात आहे? आधीच भरमसाठ फी त्यात आपल्या शहरापासून शेकडो किमी लांब असलेली खाजगी परिक्षा केंद्रे विद्यार्थ्यांसाठी सोईस्कर नाहीत. मागील काही परीक्षांमधील गैरप्रकार पाहता या परिक्षा खाजगी परीक्षा केंद्रावर न घेता अधिकृत अशा TCS ioN केंद्रावरच घ्याव्यात जेणेकरून पारदर्शकता आणि व्यवहार्यता जपली जाईल.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
@Liberal_India1 राज्यातील अनेक परीक्षा TCS iON Center वर सुरळीत होत असताना 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या PMC ज्युनियर अभियंता परीक्षा खाजगी आणि वाईट रेटींग असलेल्या केंद्रावर का घेतली जात आहे? आधीच भरमसाठ फी त्यात आपल्या शहरापासून शेकडो किमी लांब असलेली खाजगी परिक्षा केंद्रे विद्यार्थ्यांसाठी
PMC JE परीक्षा 25 Jan खाजगी व खराब रेटिंगच्या केंद्रांवर घेणे हा विद्यार्थ्यांवरील सरळ अन्याय आहे.
300–400 किमी प्रवास, खर्च, मानसिक ताण आणि पूर्वीच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
परीक्षा सुरक्षितता व पारदर्शकतेसाठी फक्त TCS iON अधिकृत केंद्रांवरच घ्यावी.
पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंत��ावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे. हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. माझी पुणे महापालिका आय��क्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी.
@navalMH @PMCPune