Even if paper was leaked by one person,MPSC cancelled entire exam for transparency -said the Hon. CM.
We believe PMC will uphold the same principle.
We respect and love PMC. This is not about fraud but about TRUST in PMC.
Re-Exam ASAP @PMCPune@navalMH@Dev_Fadnavis@RRPSpeaks
MPSC & the Hon’ble High Court cancelled exams and ordered Re-Exams when malpractice was suspected.
Bcoz u can't remove poison frm a Cup of Tea & drink the rest.
Similarly we request an immediate Re-Exam while investigation continues @MMRDAOfficial@DrSanMukherjee@Dev_Fadnavis
कनिष्ठ अभियंता भरतीत मोठा गैरप्रकार; पेपर फुटल्याचे महापालिकेने मान्य केले, मग नियुक्त्या का सुरू ठेवल्या?
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून, परीक्षेचा पेपर फुटल्याचे खुद्द पुणे महानगरपालिकेनेही मान्य केले आहे. विद्यार्थ्यांनी या गैरप्रकाराचे पुरावे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिकेने तीन विद्यार्थ्यांवर कारवाई केली. मात्र, पेपर फुटला होता हे मान्य केल्यानंतर हा गैरप्रकार केवळ तीन विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित होता, हे महापालिकेने कशाच्या आधारे ठरवले? फुटलेला पेपर आणखी किती उमेदवारांपर्यंत पोहोचला? किती उमेदवारांनी त्याचा लाभ घेतला? या प्रश्नांची उत्तरे न शोधताच इतर उमेदवारांना नियुक्त्या देण्याची घाई का करण्यात आली?
तीन विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, मग संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी का झाली नाही? पेपर फुटल्याचे मान्य असताना त्याच परीक्षेच्या निकालावर आधारित नियुक्त्या वैध कशा ठरू शकतात? हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल, तर त्यांना पुन्हा समान आणि निष्पक्ष संधी देणे ही महापालिकेची जबाबदारी नाही का? त्यामुळे कनिष्ठ अभियंता भरतीतील सर्व नियुक्त्या तात्काळ स्थगित करून, संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्यावी, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे.
या प्रकरणात पुणे महानगरपालिका प्रशासनातील काही बड्या व्यक्तींच्या सहभागाबाबत शिवसेनेकडे खात्रीदायक माहिती आणि महत्त्वाचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे मोठ्या माशांना वाचवून केवळ तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? संपूर्ण रॅकेटची चौकशी कोण करणार? आणि दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाने द्यावीत. वेळप्रसंगी शिवसेनेकडे उपलब्ध असलेले पुरावेही जनतेसमोर मांडले जातील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कारवाई होईपर्यंत शिवसेना हा लढा आक्रमकपणे लढणार आहे.
@PMCPune@pmccarepune@PMCCare
#PMC #shivsena #punecity #hadapsar
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता परीक्षेतील घोटाळ्याची व्याप्ती फक्त तीन उमेदवार आणि दोन कर्मचारी यांच्यापर्यंत आहे हे कशाच्या आधारावरून ठरवले गेले आहे, याबाबतचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा आणि याचा तपास हा पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात यावा.
@PMCPune
One candidate went from 60 and 80 in recent exams to 200 out of 200 in MMRDA JE Civil. 😳
Another reportedly jumped from single digits to 196. And 13 of 16 toppers came from one Nagpur centre.
Abhijit Dipke: What magic was happening there? If jobs are being managed by setting, stop this exam drama and auction government jobs like IPL.
Aspirants: We protest for advertisement, centre, result and joining. If students fight for every basic step, when will they study?
पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणायचं आणि त्याच पुण्यात पेपरफुटी, परीक्षा घोटाळे आणि भरतीतील अनियमितता सुरू ठेवायची, हा चंद्रकांत पाटील यांच्या विभागाचा कारभार आहे.
@ChDadaPatil
‘रोजगार न्याय यात्रे’तून महाराष्ट्रातील युवकांचा बुलंद आवाज! ✊
रिक्त पदांची तातडीने भरती, प्रलंबित भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे, सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेणे आणि पेपरफुटीविरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने पुण्यात ‘रोजगार न्याय यात्रा’ काढण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यात्रेचा प्रारंभ केला. यावेळी AICC सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्री. बी. एम. संदीप आणि AICC सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्रीमती रेहाना क्रिस्टी यांनी पुणे महानगरपालिका येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना ठाम पाठिंबा दिला. यात्रेत गोपाल तिवारी व अतुल लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बळीराम डोळे यांच्यासह पुणे शहर व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, युवक, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दिवसरात्र मेहनत करून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना माफी मिळणार नाही. भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यात्रेदरम्यान सिंचन भवन येथे मुख्य अभियंता तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन युवकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि भरती प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्ताधारित व भ्रष्टाचारमुक्त होईपर्यंत काँग्रेसचा हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.
@INCHarshsapkal@BMSandeepAICC@RayazRehana@atullondhe
@CongressRojgar
@PMCPune@CollectorPune #Dhananjay_Shinde #DhananjayShinde
आज ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानिमित्त पुणे येथे उपस्थित असताना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांनी भेट घेऊन त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या माझ्या निदर्शनास आणून दिल्या.
👉सदर उमेदवारांनी निदर्शनास आणून दिल्यानुसार, मागील काही वर्षांपासून राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदे रिक्त असूनही सदर रिक्त पदांच्या भरतीसाठी आवश्यक त्या जाहिराती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. विशेषतः जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, नगरपरिषद प्रशासन तसेच इतर संबंधित विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांमुळे पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे.
👉जलसंधारण विभागातील भरतीबाबत संबंधित विभागाचे मा. मंत्री महोदय यांच्याकडून वेळोवेळी घोषणा करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे. तथापि, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
👉त्यामुळे संबंधित विभागांनी उपलब्ध रिक्त पदांची वस्तुनिष्ठ आकडेवारी निश्चित करून, पदांची आवश्यक मंजुरी व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कालबद्ध कार्यवाही करणे आवश्यक आहे.
👉MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत
नुकत्याच पार पडलेल्या MMRDA सहाय्यक अभियंता-२ पदाच्या परीक्षेच्या निकालाबाबत काही उमेदवारांनी गंभीर स्वरूपाचे आक्षेप उपस्थित केले आहेत.
काही उमेदवारांच्या प्राप्त गुणांमध्ये असामान्य स्वरूपाची तफावत असल्याचे तसेच काही विशिष्ट परीक्षा केंद्रांशी संबंधित निकालांच्या स्वरूपाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सदर आक्षेपांची सत्यता अथवा वस्तुस्थिती अधिकृतरीत्या पडताळून पाहणे आवश्यक असून, कोणत्याही निष्कर्षापूर्वी संबंधित परीक्षा यंत्रणेमार्फत संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे तांत्रिक व स्वतंत्र परीक्षण करण्यात यावे.
यामध्ये आवश्यकतेनुसार परीक्षा केंद्रांवरील CCTV चित्रीकरण, बायोमेट्रिक नोंदी, सर्व्हर लॉग, उमेदवारांची उपस्थिती नोंद, प्रश्नपत्रिका वितरण व संकलन प्रक्रिया, उत्तरपत्रिका/डिजिटल प्रतिसाद, गुणांकन प्रक्रिया तसेच इतर संबंधित इलेक्ट्रॉनिक नोंदींची पडताळणी करण्यात यावी.
सदर पडताळणीअंती वस्तुस्थिती स्पष्ट करून पात्र उमेदवारांच्या हिताचे संरक्षण होईल, अशा पद्धतीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
👉पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेबाबतही काही उमेदवारांनी आक्षेप नोंदविले असून, सदर प्रकरणाची चौकशी/परीक्षण करण्यासाठी IBPS कडून अहवाल प्राप्त होणे अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा परिस्थितीत संबंधित अहवाल प्राप्त होऊन त्यातील निष्कर्षांचा विचार होण्यापूर्वीच नियुक्ती प्रक्रियेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला जात असल्यास, त्याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांचा सखोल विचार करूनच पुढील नियुक्तीविषयक कार्यवाही करण्यात यावी, अशी उमेदवारांची मागणी आहे.
👉वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने शासन व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी
1. राज्यातील विविध विभागांमधील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांची अद्ययावत संख्या जाहीर करावी.
2. आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून रिक्त पदांच्या भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने जाहिराती प्रसिद्ध कराव्यात.
3. MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची स्वतंत्र व तांत्रिक पद्धतीने पडताळणी करावी.
4. आवश्यकतेनुसार CCTV, बायोमेट्रिक, सर्व्हर लॉग, परीक्षा केंद्रनिहाय माहिती व गुणांकन प्रक्रियेची तपासणी करावी.
5. पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेबाबत IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त करून त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करावी.
6. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित राहील याची दक्षता घ्यावी.
7. उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांबाबत संबंधित प्राधिकरणाने अधिकृतरीत्या वस्तुस्थिती स्पष्ट करावी.
ही मागणी कोणत्याही विशिष्ट उमेदवाराच्या विरोधात नसून, पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, भरती प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि शासकीय सेवेत गुणवत्तेच्या आधारे निवड व्हावी, या व्यापक उद्देशाने करण्यात येत आहे.
राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने सदर बाबींवर तातडीने सकारात्मक व कालबद्ध कार्यवाही करावी, ही अपेक्षा.
रोजगार न्याय यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पुणे मनपा येथून सुरुवात.
आयोजक :
रोजगार व स्वयंरोजगार विभाग,
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
@Dhananjay4INC@CongressRojgar
I have been informed by several aspirants about serious allegations of irregularities in the MMRDA JE recruitment exam.
Candidates who couldn’t even secure decent marks in other exams have reportedly emerged as toppers in the MMRDA exam.
Interestingly, many of the toppers are reportedly from the same exam centre.
This raises serious questions and must be thoroughly investigated!
अभ्यासाचा काहीही संबंध नाही अशा लोकांना @MMRDAOfficial परीक्षेत टॉपर केलेले आहे, मुंबई, अहिल्यानगर, ठाणे, सोलापूर सहित घोटाळे करण्यासाठी नागपूर हे परीक्षा केंद्र देण्यात आले होते, याची न्यायालीन चौकशी होणे गरजेचे आहे. यशाचा एकमेव मार्ग नागपूर परीक्षा केंद्र
@DrSanMukherjee
@DrSanMukherjee आपण कोणत्या आधारावर परीक्षेत घोटाळे झाले नाहीत म्हणत आहात?विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांना निराधार कोणत्या पुराव्यानिशी म्हणत आहात?
एकदा स्वतः निकाल बघून घ्या किंवा सद्सदविवेकबुद्धीला देखील विचारून पाहा की खरच २०० पैकी २०० मार्क पडू शकतात का?
#MMRDA_Scam#youth
साहेब कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा याकडे थोडं लक्ष द्या वेळात वेळ काढून...आम्ही गरीबाची पोरं अभ्यास करून पोस्ट घेतो आणि इथे पैसेवाले पैसे देऊन पोस्ट घेऊन जातात तुमचं लक्ष कुठे आहे साहेब आम्हा विद्यार्थ्याकडे लक्ष द्या साहेब.
@narendramodi@Dev_Fadnavis@mieknathshinde