@saurabhkoratkar नंदुरबार, गडचिरोली, मेळघाट, किनवट, पालघर अशा कित्येक जिल्ह्यांतील, प्रामुख्याने आदिवासीबहुल भागांत, पायाभूत सुविधा आणि विशेषतः सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता वर्षानुवर्षे का होऊ शकली नाही, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
यासाठी आरोग्य सुविधा व जनजागृती वाढवावी लागेल.क्षयरोगाचे भविष्य आशादायक असले तरी आव्हाने कायम आहेत.भारतात MDR-TB आणि कुपोषणावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.जागतिक आणि भारतीय स्तरावर सहकार्य, संशोधन आणि निधी वाढल्यास हा आजार नष्ट होऊ शकतो.यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे लागेल.
#क्षयरोग (#टीबी) हा एक प्राचीन आणि गंभीर आजार आहे, जो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूंमुळे होतो. हा आजार प्रामुख्याने फुफ्फुसांना प्रभावित करतो, परंतु शरीराच्या इतर भागांवरही परिणाम करू शकतो. मानवी इतिहासात क्षयरोगाचे मूळ हजारो वर्षांपूर्वी आढळते. #endtb#rntep 👇
तथापि, कोविड-१९ मुळे निदान आणि उपचारात अडथळे आले, ज्यामुळे २०२०-२१ मध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढली. भविष्यात टीबी नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन लसींचा विकास महत्त्वाचा ठरेल. WHO च्या अंदाजानुसार, २०३० पर्यंत जागतिक टीबी प्रकरणे ५०% ने कमी होऊ शकतात, परंतु भारताला 👇
हे मंदिर ४ मार्च २०२१ रोजी उघडले गेले. भक्त गर्भगृहात प्रार्थना करू शकतात आणि देवाला पुस्तके अर्पण करू शकतात, आणि त्याबदल्यात प्रसाद म्हणून एक पुस्तक मिळते. तिथे कोणतेही पुजारी नाहीत किंवा हुंडी नाही आणि कोणत्याही जाती किंवा धर्माच्या व्यक्ती मंदिरात प्रार्थना करू शकतात.
प्रपोयिल हे चेरुपुझा जवळचे एक गाव आहे, जे कन्नूर, केरळपासून ६४ किमी अंतरावर वसलेले आहे. प्रपोयिलमध्ये एक मंदिर आहे,जे पुस्तकाचे मंदिर म्हणून ओळखले जाते. कदाचित जगातील एकमेव अशा प्रकारचे हे मंदिर आहे. या मंदिरातील देवता ही एका पुस्तकाची शिल्पकृती आहे. #पुस्तक@LetsReadIndia
तेव्हा, स्त्रीकडे बघण्याच्या मानसिकतेत किंचितसा बदल होऊन त्या पुरुषप्रधान संस्कृतीने हा दिवस देणगीरुपाने दिला. आज सोहळे साजरे होत असतील परंतु स्त्रीत्वाकडे एक परिपूर्ण आणि स्वतंत्र परिप्रेक्ष्यातून बघणे, पुरुष आणि स्त्री, या दोन्ही घटकांना शक्य होईल, तेव्हाच महिलादिन साजरा होईल
तसं बघायला गेलं तर, उत्क्रांतीची सुरुवात एकपेशीय सजीवांपासून झालेली असली तरीही उत्क्रांतीच्या निम्नस्तरावर असलेले सजीव हे उभयलिंगी आहेत, हे सत्य आहे.
केव्हातरी, त्यांतील स्त्री तत्व वेगळे होऊन, नर आणि मादी, अशा दोन जाती निर्माण झाल्या. #महिलादिन 👇
स्त्री म्हणून तिला केवळ शरीररचनेच्या दृष्टीने दुय्यम ठरविण्याच्या भूमिकेला आजही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अंगांनी सहमती आहेच. आणि त्यातून बंडखोरी होऊन जेव्हा पुरुषप्रधान व्यवस्थेला समांतर अशी व्यवस्था स्त्रियांकडून निर्माण होते, असे प्रस्थापितांच्या लक्षात आले 👇