MARDA मध्ये वारंवार जॉनी जोसेफच का?
MMRDA भर्ती प्रकरणी कोर्ट मॉनिटर्ड SIT मार्फत चौकशी करावी!
मा. श्री. धनंजय शिंदे
अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग,
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
@Dhananjay4INC
📍 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा
@RahulAsks यापूर्वी देखील महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, कृषी तसेच #FSO#DISCRIPTIVE परीक्षेत पेपर तपासण्यावेळी मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली होती.
👉 धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य दिलेल्या उमेदवारांना स्वतः लिहिलेली उत्तरपत्रिका पाहण्यासाठी #MAT मध्ये जावे लागले होते आणि त्यानंतर #MAT च्या आदेशाने उमेदवारांना उत्तरपत्रिका भेटल्या होत्या. मिळालेल्या उत्तरपत्रिकेत देखील काही प्रश्न जे एकदम #FACTUAL होते त्यामध्ये देखील दोन उमेदवारांना वेग वेगळे गुणांकन करण्यात आले होते.
📍 सरळसेवा
👉 #TCS #IBPS मध्ये तर सर्वात मोठा भष्टाचार झालेला आहे, तलाठी भरती असो किंवा जलसंधारण ( जी नंतर विद्यार्थ्यांनी आवाज उठवला, आंदोलन केले नंतर रद्द केली) भरती असो. ताजे उदाहरण द्यायचे झाले तर पुणे मनपा कनिष्ठ अभियंता चालू परीक्षेतून कॉम्प्युटरच्या स्क्रीन वरील प्रश्नासहित फोटो बाहेर आलेला आहे व #MMRDA Asst Engg परिक्षेत तर नागपूर या एकाच परीक्षा केंद्रावरून टॉपर आहेत, त्यामधील अनेकांचा आणि अभ्यासाचा काहीही संबंध नाही अशी लोक MMRDA मध्ये Asst Engg बनणार आहेत ज्यांना २०० पैकी २०० मार्क पडलेले आहेत आणि प्रामाणिक पोर याविरुद्ध लढा देत आहेत. भयंकर आहे हे सगळ वरून खालपर्यंत कुंपणच शेत खात आहे.
ज्या पद्धतीने औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्याचप्रमाणे @MMRDAOfficial मधील Assistant Engineer पदाच्या भरती प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या गंभीर आक्षेपांचीही स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
विशेषतः भंडारा जिल्ह्यातील किती उमेदवारांची निवड झाली, त्यांची निवड प्रक्रिया काय होती आणि त्यासंदर्भात कोणाची भूमिका होती, याची सखोल पडताळणी करण्यात यावी.
कायमचा पत्ता ठाणे, अहिल्यानगर ,सोलापूर किंवा इतर भागातील असलेल्या उमेदवारांना नागपूर परीक्षा केंद्र का देण्यात आले? एखाद्या विशिष्ट परीक्षा केंद्रातून असामान्य प्रमाणात उच्च गुण मिळविणारे उमेदवार आढळत असल्यास त्याची स्वतंत्रपणे तांत्रिक तपासणी का होऊ नये?
CCTV फुटेज, बायोमेट्रिक नोंदी, सर्व्हर लॉग, परीक्षा केंद्रनिहाय उपस्थिती, प्रश्नपत्रिका वितरण, डिजिटल प्रतिसाद आणि गुणांकन प्रक्रियेची तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक आहे.
म्हणून चौकशी समिती नेमायचीच असेल तर ती उच्च न्यायालयाच्या विद्यमान/निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने नेमण्यात यावी. अन्यथा आम्हाला अन्यायग्रस्त सुशिक्षित बेरोजगार स्पर्धा परीक्षा उमेदवारांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करावे लागेल.
@DrSanMukherjee@MMRDAOfficial@BaliramDoleyINC@NANA_PATOLE@Mpsc_Andolan
#MMRDA_SCAM #AssistantEngineer #Recruitment #ExamTransparency #JusticeForStudents
MMRDA भरती परीक्षा : योगायोग की गंभीर प्रश्नचिन्ह?
MPSC ने ड्रग्स इन्स्पेक्टर पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेने कारवाई केली.
मग MMRDA भरती परीक्षेबाबतही विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर संशय निर्माण झाला असताना किमान चौकशी करण्याचे औदार्य MMRDA दाखवणार आहे का?
काही उमेदवारांच्या यापूर्वीच्या स्पर्धा परीक्षांतील गुण आणि MMRDA परीक्षेतील गुणांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.
उदाहरणार्थ—
▪️ Tushar Funde — BMC SE: 7.5/100 → MMRDA: 200/200
▪️ Aniket Dhere — BMC SE: 8.5/100 → MMRDA: 198.38/200
▪️ Gaurav Yekekar — Nagpur JE: 48/200 → MMRDA: 198/200 (Rank 7)
▪️ Akash Rakhade — PMC JE: 82/200 → MMRDA: 198/200 (Rank 11)
▪️ Yogesh Kumar Kathe — BMC SE: 7.5/100 → MMRDA: 192/200
हे आकडे गैरप्रकार सिद्ध करत नाहीत, पण एवढी मोठी तफावत निश्चितच चौकशीची मागणी करते.
म्हणून MMRDA ने विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी—
➡️ CCTV Footage
➡️ Server Logs
➡️ Login-Logout Records
➡️ IP/Device Mapping
➡️ Response Patterns
➡️ परीक्षा केंद्रनिहाय आणि उमेदवारनिहाय डेटा
यांची स्वतंत्र आणि तांत्रिक चौकशी करावी.
जर सर्व काही नियमानुसार झाले असेल तर चौकशीतून ते स्पष्ट होईल आणि विद्यार्थ्यांच्या मनातील संशय दूर होईल.
आणि जर गैरप्रकार झाला असेल, तर दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
MPSC ने एका परीक्षेप्रकरणी कारवाई केली; MMRDA आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार की पारदर्शक चौकशी करून सत्य समोर आणणार?
हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि सरकारी भरती प्रक्रियेवरील विश्वासाचा हा प्रश्न आहे.
संशय निर्माण झाला आहे, तर चौकशी झालीच पाहिजे!
#MMRDA #MMRDARecruitment #ExamTransparency #RecruitmentExam #MPSC #StudentsJustice
मा. मुख्यमंत्री महोदय, एक कळकळीची विनंती…🙏
हे चित्र आजच्या स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेतील कडू वास्तव अधोरेखित करते. जवळपास प्रत्येक परीक्षेत गैरप्रकारांच्या तक्रारी समोर येत आहेत. गोरगरीब व कष्टकरी विद्यार्थी रस्त्यावर उतरून पुरावे सादर करतात; मात्र तरीही संबंधित विभागांकडून अपेक्षित ती ठोस कारवाई होताना दिसत नाही.
याचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत नाही, तर त्यांच्या पालकांनाही प्रचंड मानसिक त्रास आणि असहायतेचा सामना करावा लागत आहे.
केंद्र सरकारने पेपरफुटी व परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात कायदा केला असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसेल, तर महाराष्ट्रात याबाबत आपण स्वतः पुढाकार घेऊन कठोर, पारदर्शक आणि तातडीची व्यवस्था निर्माण करावी, ही कळकळीची विनंती.
कारण अधिकारीवर्ग हा कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कांचा रक्षक असला पाहिजे; गैरप्रकार करणाऱ्यांचा नव्हे.
एका विद्यार्थ्याचा विश्वासघात म्हणजे संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वासाला तडा.
कष्टकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
#MMRDA_Scam #PMC_JE_Scam
#MPSC #Recruitment #PaperLeak #CompetitiveExams #Students #Maharashtra
परीक्षा झाली… पण प्रक्रिया पारदर्शक होती का?
डमी उमेदवार, संशयास्पद निकाल, परीक्षागृहातील फोटो आणि बनावट भरतीचे आरोप…इतक्या तक्रारींनंतरही स्पष्ट उत्तर का मिळत नाही?
तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास का ढासळतोय, हे समजून घेण्यासाठी चॅनेलवरील पूर्ण व्हिडिओ पाहा.
#RecruitmentExam #PMC #ExamScam #YouthQuestions #ExamTransparency #LegalAwareness #VijayKumbhar
PMC recruitment, recruitment exam, exam scam, recruitment fraud, dummy candidate, suspicious results, exam transparency, youth questions, government recruitment, Pune Municipal Corporation, competitive exams, legal awareness, Vijay Kumbhar
औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणासंदर्भात कोणाकडेही काही माहिती, पुरावे किंवा संबंधित बाबींची माहिती असल्यास, त्यांनी पुढे येऊन गुन्हे शाखा, मुंबई पोलीस यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पेपरफुटीच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. परीक्षार्थींच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात प्रत्येक महत्त्वाची माहिती तपास यंत्रणेला मिळणे आवश्यक आहे.
#MumbaiCaseFiles
#MumbaiPoliceCrimeBranch
#DrugInspectorPaperLeak
@RRPSpeaks WRD विभागातील JE, CEA या पदाच्या 3000+ जागा रिक्त असताना अजून पण प्रशासन रिक्त जागा भरत नाही आहे..
@Dev_Fadnavis
लवकरात लवकर आकृतीबंधाला मान्यता देऊन 2026 मध्येच MPSC मार्फत ऑफलाईन पद्धतीनेच पदभरती पूर्ण करावी.
@RRPSpeaks WRD विभागातील JE, CEA या पदाच्या 3000+ जागा रिक्त असताना अजून पण प्रशासन रिक्त जागा भरत नाही आहे..
@Dev_Fadnavis
लवकरात लवकर आकृतीबंधाला मान्यता देऊन 2026 मध्येच MPSC मार्फत ऑफलाईन पद्धतीनेच पदभरती पूर्ण करावी.
@RRPSpeaks आम्ही हजारो सिव्हिल इंजिनिअर तरुण वय संपत चाललेल्या चिंतेत दिवस काढत आहोत. अभ्यास करून करून आणि वाट बघून आता संयम सुटत चालला आहे. कृपया कोणतीही तांत्रिक कारणं न दाखवता AEE, AE, JE पदांची मेगाभरती लवकरात लवकर सुरू करा.
@RRPSpeaks डिसेंबर 2024 मध्ये माननीय जलसंपदामंत्री @girishdmahajan साहेब यांनी मेगा भरती ची घोषणा केली होती मात्र अद्याप पर्यंत विभागाकडून कोणत्याही प्रकारची हालचाली दिसत नाहीत.
आपणास विनंती आहे की,सर्व बेरोजगार अभियंत्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करावा.
@Dev_Fadnavis@RVikhePatil
@RRPSpeaks डिसेंबर 2024 मध्ये माननीय जलसंपदामंत्री @girishdmahajan साहेब यांनी मेगा भरती ची घोषणा केली होती मात्र अद्याप पर्यंत विभागाकडून कोणत्याही प्रकारची हालचाली दिसत नाहीत.
आपणास विनंती आहे की,सर्व बेरोजगार अभियंत्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करावा.
@Dev_Fadnavis@RVikhePatil
जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदं भरण्याचं मागणीपत्र लवकरात लवकर MPSC कडं पाठवण्यात यावं. हजारो अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण या पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कोणताही विलंब न लावता AEE, AE, JE व CEA संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis
MPSC अध्यक्ष डॉ. विवेक भीमनवार आणि सचिव महेंद्र हरपळकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना संरक्षण देऊ नये !
MPSC ने विद्यार्थी, शिक्षक आणि परीक्षा तज्ज्ञांशी चर्चा न करता ऑनलाइन परीक्षा (CBT)चा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात आणि Drug Inspector परीक्षेतील गैरप्रकाराची चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास परीक्षा रद्द करावी, या मागणीसाठी हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सलग ९ दिवस साखळी उपोषण केले. तिसऱ्या दिवशी दादांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.
काँग्रेस नेते मा. विजय वडेट्टीवार आणि मा. सतेज पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा विधानसभेत लावून धरला. अखेर Drug Inspector परीक्षा रद्द झाली.
आता अध्यक्ष डॉ. विवेक भीमनवार आणि सचिव मा. महेंद्र हरपळकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
पेपरफुटी व गैरप्रकार करणाऱ्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. दोषी कितीही मोठ्या पदावर असो, त्याला राजकीय संरक्षण मिळता कामा नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना संरक्षण न देता निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करावी.
आमचा स्पष्ट इशारा:
येत्या १ आठवड्यात अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा दिला नाही, तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने MPSCच्या बेलापूर मुख्यालयाला घेराव घालण्यात येईल आणि दोघांचा राजीनामा होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील.
विद्यार्थ्यांना धमक्या नकोत, न्याय हवा, MPSCची विश्वासार्हता वाचवण्यासाठी संघर्ष सुरूच राहील!
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@bhimanwar@mpsc_office@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Mpsc_Andolan@degree_holders@INCMaharashtra
#MPSC #Congress #ExamScam #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
आजपर्यंत आयोगावर कोणीही टीका केली की काही जण स्वतः आयोगाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे येत होते. मात्र औषध निरीक्षक पेपरफुटीच्या प्रकरणानंतर हीच मंडळी अत्यंत हताश आणि निराश झालेली दिसत आहेत. त्यांना बसलेला धक्का स्पष्ट जाणवतोय.
कदाचित आयोगातील काही लोकांना याची जाणीव नसेल; पण महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा केवळ एक सरकारी आयोग नाही—तो महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, मेहनतीचा आणि विश्वासाचा विषय आहे.
या आयोगावर अनेक तरुणांचे वर्षानुवर्षांचे कष्ट, आशा आणि भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे परीक्षेतील गैरप्रकाराची बातमी ही केवळ एक बातमी नसते; ती हजारो-लाखो विद्यार्थ्यांच्या मनावर आघात करणारी घटना असते.
MPSC बद्दलचा हा जिव्हाळा शब्दांत व्यक्त करता येत नाही… तो फक्त अनुभवता येतो.
म्हणूनच अपेक्षा एकच—
विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी पारदर्शकता, जबाबदारी आणि कठोर कारवाई.
#MPSC #MPSCStudents #PaperLeak #Transparency #StudentsVoice
महाराष्ट्र के छात्रों ने एक लड़ाई जीत ली है।
MPSC की ड्रग इंस्पेक्टर परीक्षा और पूरी भर्ती प्रक्रिया रद्द हुई - यह सरकार की मेहरबानी नहीं, उन छात्रों की जीत है जो मार्च में ड्रग इंस्पेक्टर परीक्षा के पेपर लीक के बाद से डटे रहे।
दबाव झेला, तानें सुने, महीनों इंतज़ार किया - पर आवाज़ उठाना नहीं छोड़ा। आप सब पर गर्व है।
पर याद रखिए - एक परीक्षा रद्द होना जीत है, न्याय नहीं। जब तक लीक कराने वालों को सज़ा नहीं मिलती, यह लड़ाई अधूरी है।
आगे और लड़ाइयां हैं। और हर एक में मैं आपके साथ हूं।
हमें इस पूरे system को ठीक करना है - ताकि हर बच्चे के लिए शिक्षा बेहतर हो, और मेहनत का दाम हर किसी को मिले।
#ChhatronKiGoonj