@Dev_Fadnavis ji परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 90 पैकी 25 ते 30 खाजगी सेटंर हे भंगार आहेत. तेथील पीसी व कीबोर्ड हे बाबा आदम च्या जमान्यातील असल्याचे समजते @mybmc तुमच्या दृष्टिकोनातून सगळं कसं आलबेल आहे, नाही का? आणी हो या परीक्षे साठी आपण सुमारे 250 मनपातील अभियंत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे ते सर्वस्वी चुकीचं असून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व अभियंत्यांवर होणारा खर्च हा IBPS कडून वसूल करण्यात यावा याची कृपया नोंद घ्यावी. @mieknathshinde साहेब गोरगरीब मुलांना अजून ही आपल्याकडून आशा आहे कि आपण या परीक्षा पुढे ढकलून TCS ION Digital Centers वरच घेण्याचे डॉ भूषण गगराणी साहेबांना निर्देश देण्यात यावेत हि विनंती.@AjitPawarSpeaks दादा या TCS ION Digital Centers साठी परीक्षार्थी कडून प्रत्येकी ₹1000/- असे 1 लाख 14 हजार फॉर्म भरून आले आहेत म्हणजे IBPS कडे 11 कोटी 40 लाख जमा झाले आहेत याउपरही मुंबई महापालिके कडून मिळेल ती अतिरिक्त रक्कम!!!तरी सर्वत्र बोंब! @RRPSpeaks@iambadasdanve@Awhadspeaks
संभाव्य पेपर फुटी बाबत....
मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी ९ फेब्रुवारी, २०२५ आणि मार्च २०२५ मध्ये IBPS या संस्थेमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी 1 लाख अर्जदार विद्यार्थ्यांनी भरलेल्या पर्यायी परीक्षा केंद्रांच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रे खाजगी असल्यामुळे गेल्या अनेक परीक्षांचा इतिहास पाहता त्या केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे.
गेल्या ५ - ६ वर्षांत झालेल्या तलाठी, मृद व जलसंधारण, म्हाडा आदी विभागांच्या परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रांवर घेतल्या गेल्या होत्या व या खाजगी केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे घोटाळे झाले आहेत. खाजगी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचे प्रकारही झाले आहेत.त्यामुळं शासनावर सदर परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची नामुष्की आओढावली होती हे सर्वश्रुत आहेच. हि बाब सातत्याने आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती, परंतु पालथ्या घड्यावर पाणीच.
हजारो विद्यार्थ्यांना दूरच्या जिल्हातील खाजगी केंद्रे त्यांनी पर्याय दिला नसतांनाही अलाॅट केले आहेत व हीच बाब संशयास्पद आहे. एव्हढ्या महत्वाच्या परीक्षेचं नियोजन खाजगी परीक्षा केंद्रांवर झाल्यामुळे परीक्षार्थींमध्ये विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे. IBPS या संस्थेचे, दुसरी शासनमान्य संस्था असलेल्या TCS ION सोबत करार असल्यामुळे TCS ION ची स्वतःची मोठी क्षमता असलेली परीक्षा केंद्रे या परीक्षांसाठी वापरता येऊ शकतात. त्यामुळं ही परीक्षा TCS ION च्या केंद्रांवर घेण्यात यावी,ज्याची क्षमता 25000 आहे, जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
#BMCJESEIONDigital
@mybmc@Dev_Fadnavis@mieknathshinde@RRPSpeaks@AjitPawarSpeaks
आज मुंबई मनपा मुख्यालयात आयुक्त डॉ भूषण गगराणी साहेब यांची भेट घेतली व 9 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता सरळसेवा भरती परीक्षा TCS ION Digital Centers वरच घेण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते मा.अंबादास जी दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आग्रही मागणी करण्यात आली. सोबत मा. नगरसेवक सचिन पडवळ!
"आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा खाजगी केंद्रांवर आयोजित केल्या जात असून, यामुळे गैरप्रकार व घोटाळ्यांची शक्यता वाढली आहे.आयुक्त मा. भूषण गगराणी यांनी तातडीने लक्ष घालून तरुणांना न्याय द्यावा."
- @Dhananjay_AAP ,उपाध्यक्ष, #आप_महाराष्ट्र@mybmc
मुंबई महानगरपालिका सारख्या महत्वाच्या परीक्षांसाठी विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करत असतात. मात्र, SE आणि JE परीक्षांसाठी अधिकृत #TCS_Ion_Digital केंद्र न देता खासगी परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत.
हे पूर्णतः अन्यायकारक असून, परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. @mybmc ने तत्काळ यात सुधारणा करून अधिकृत परीक्षा केंद्रांवरच परीक्षा घ्याव्यात.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
#BMCRecruitment
BMC कनिष्ठ अभियंता सर्व पदांची परीक्षा TCS च्या अधिकृत ION डिजीटल केंद्रावरच झाल्या पाहिजेत. ज्या सेंटर वर पेपरफुटी ची घटना घडली आहे ते सुद्धा सेंटर आता दिले गेले आहेत. तुम्हाला बोगस पणा करायचा असेल तर तसे सांगा डायरेक्ट पदे भरा विद्यार्थी काही म्हणार नाही पण अस करून त्यांना त्रास तर देऊ नका. रात्रंदिवस प्रामाणिक विद्यार्थी अभ्यास करत आहे आणि तुम्ही असा बोगस पणा करत असाल तर विद्यार्थी शांत बसणार नाही हे लक्षात घ्या. @Dev_Fadnavis साहेब हेच का आपला राज्य आणि पारदर्शकता?
@mybmc@CMOMaharashtra @degree_holders @Dhananjay_AAP @AUThackeray
प्रति,
मा. एकनाथ शिंदे
नगर विकास मंत्री व पालक मंत्री : मुंबई
महाराष्ट्र राज्य.
महोदय,
आपण मुंबईचे पालकमंत्री आहात.
मुंबई महानगरपालिकेच्या SE आणि JE परीक्षा खाजगी केंद्रांवर न घेता सरकारमान्य TCS Ion या संस्थेच्या परीक्षा केंद्रावर घेण्याच्या लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन त्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc@mybmc@AAPMaharashtra@TCS@TCS_iON
#DhananjayShinde
#TCS_Ion_digital
#BMCRecruitment
मुंबई महानगरपालिका सारख्या महत्वाच्या परीक्षेची तयारी विद्यार्थी वर्षानुवर्ष करत असतात परंतु SE आणि JE चे परीक्षेसाठी आलेले केंद्र अधीकृत #TCS_Ion_digital न देता खासगी परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहेत @mybmc ने यात तत्काळ बदल करून अधिकृत परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात याव्या.
✊BMC Exam साठी iON सेंटरच हवी...
IBPS ने लोकल सेंटर दिल्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय
सर्व विद्यार्थ्यांची मागणी iON सेंटरच पाहिजेत...
महाराष्ट्रात अजून एक मोठा घोटाळा होण्याची शक्यता...
#BMC_iONexamसेंटरचद्या@mybmc@CMOMaharashtra @degree_holders @RRPSpeaks@mieknathshinde
#BMC मधील कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी येत्या ९ फेब्रुवारीला #IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑप्शन मध्ये भरलेली सेंटर सोडून त्यांना भलतेच सेंटर देण्यात आले आहेत. पुण्याच्या मुलांना भंडारा, नागपूर अशा लांबच्या ठिकाणची सेंटर देण्यात आली आहेत. काही सेंटर तर अत्यंत गैरसोयीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी देण्यात आले आहेत. जिथे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं ही परीक्षा TCS ION Digital सेंटर्समध्ये घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्य शासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य गैरप्रकाराला आळा घालावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सरळसेवा भरती २०२४ मध्ये महाघोटाळ्याची शक्यता?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “कनिष्ठ अभियंता” पदाची परीक्षा खाजगी केंद्राच्या ऐवजी फक्त IBPS या सरकारमान्य संस्थेच्या स्वतःच्या परीक्षा केंद्रावर होणे गरजेचे आहे. या विषयावर आम्ही ६ महिन्यांपूर्वी महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन योग्य खबरदारी घेण्याची विनंती केली होती.
खाजगी परीक्षा केंद्रे घोटाळ्याचे अड्डे बनल्याचे गेल्या अनेक परीक्षा घोटाळ्यांवरून सिद्ध झाले आहे. तलाठी घोटाळ्याच्या विरोधात आम्ही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीसोबत मा. मुम्बई उच्च न्यायालयात केलेली याचिका प्रलंबित आहे.
खाजगी केंद्रावर परीक्षेचे नियोजन झाल्यामुळे लाखो तरुणांमध्ये विश्वासघात झाल्याची भावना असून आयुक्त मा. भूषण गगराणी यांनी यात स्वतः लक्ष घालून तरुणांना “न्याय” द्यायला हवा.
मुंबई महानगर पालिकेने याबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर हजारो तरुण तरुणींना घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल!
@AUThackeray@mybmc @degree_holders @Mpsc_Andolan@AAPMaharashtra
#BMC_JE #BMC_SE
#TCS_ION_Digital #IO
#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३)परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाला महाराष्ट्राचा रहिवासी दाखला सक्तीचा नसल्याने इतर राज्यातील तरुणही यासाठी अर्ज करतील परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होऊ शकतो. त्यामुळे सदर परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करावा.
तसेच या परीक्षेसाठी GATE परीक्षेच्या १०% गुणांची अट टाकल्याने GATE परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. वास्तविक GATE परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार फारच कमी असतात, तसेच भरमसाठ परीक्षा शुल्क असल्याने बहुतांश उमेदवार GATE देणंही टाळतात. त्यामुळे महापारेषण, महानिर्मितीसाठी ज्याप्रमाणे GATE परीक्षेची कुठलीही अट नाही त्याप्रमाणे महावितरणनेही GATE परीक्षेची अट शिथिल करण्यासंदर्भात विचार करावा ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis