खंडेराव.. या देशाला फक्त तलवार आणि गोळीचा इतिहास नाही.. इथं लेखणीचा इतिहास आहे.. बोरूचा इतिहास आहे.. चरख्याचा इतिहास आहे.. चरख्याच्या धाग्यांनी गुंफलेले विचार काळाला बांधून ठेवतील.. देशावर जेंव्हा जेंव्हा काळ चालून येईल.. तेंव्हा तेंव्हा ते विचार अधोरेखित होतील..❤️
#नेमाडपंथी
#MPSC करणाऱ्या मित्रांनी सुरुवातीची दोन वर्षे पूर्ण वेळ अभ्यास करावा. त्यात निवड झाली तर ठीक नाहीतर एखादी पार्ट-टाइम नोकरी किंवा दोन पैसे मिळतील असे कोणतेतरी काम करून अभ्यास करावा. वर्षानुवर्षे फक्त अभ्यास करून पोस्टविना राहणे हे किती वेदनादायी असते याची लाखो उदाहरणे आहेत.
दोन पैसे कमावून अभ्यास करण्यातला आत्मविश्वास काय असतो त्याचा अनुभव एकदा घेऊन बघाच.
साधी पायवाट ते रस्ता, महामार्ग अन पुढे सगळं आभाळ मोकळं होतं ते शिक्षण आणि वाचनामुळे…..
अमुलाग्र बदल घडतो, आपण नक्की काय वाचतोय यावर आपली दिवसभराची कृती ठरते.
योग्य पुस्तकं व मार्गदर्शकांची निवड यात फार महत्वाची ठरते.
टिप - आपल्याला ज्यात करियर करायचेय त्या वाचनाला प्राधान्य हवे.
खानदानी संपत्ती शालीन असते.. कारण ती उभी करण्यासाठी कैक पिढ्या खपलेल्या असतात.. त्या खपलेल्या पिढ्यांच्या अनुभवावर आणि संस्कारावरच लक्ष्मी प्रसन्न असते.. म्हणून अनुभव आणि संस्कार यांच्याकडेच लक्ष्मी पाणी भरते..❤️
#लक्ष्मीपूजन
सतत मनोरंजन, आराम आणि डोक्याला फारसा ताणतणाव नसावा असं वाटणं ही दरिद्र्याकडे जाणारी वाट आहे.
त्याऐवजी सतत नवं काहीतरी वाचतं, शिकत राहणं आणि सर्वात महत्वाचं कामात व्यग्र असणं हे शाश्वत श्रीमंतीकडे घेऊन जाते.
इंटरनेटचा फक्त तासाभराचा योग्य वापरही आपल्याला प्रगतीची नवी दिशा दाखवतो
‘वीस रुपये वाचावे' म्हणून' पायी चालणारी आई. अन 'वीस मिनिट वाचावे' म्हणून गाडीवरून फिरणारी पोरं, कदाचित हाच आजच्या जगण्याचा जनरेशन गॅप म्हणावा..
🙏🏻आधुनिकपणा 🙌
#माझा_क्लिक
It’s difficult to say who exactly Jarange Patil belongs to, but one thing is certain — winning and retaining the trust of such a massive crowd is no ordinary feat.
Even I, like many others, doubted whether such a huge gathering would ever happen, but we were proven wrong.
गरिबी, बेरोजगारी, मागासलेपणा, धार्मिक-जातीय अस्थैर्य आणि गुलामी मानसिकतेच्या हतबलतेचा फायदा उठवून “स्थानिक संसाधनांवर ताबा” हा फार जुना डाव आहे.
“आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा…..” असं कोणीही, कितीही ठरवलं, अगदी जबरदस्ती केली तरी का सुर्यास्त अन सुर्योदय कंट्रोल करणारंय का कोणी?
दरवेळी कोणतरी नवा “आयटम” येतो.
आपल्या भाषेला तुच्छ लेखतो, मराठी माणसांची इज्जत काढतो.
त्याला “वाह्ह वाह” मिळते. टाळ्या पडतात. हशा पिकतो.
मग तेवढ्यापुरतं चर्चा, महाचर्चा, आरोळ्या, आपण पेटून उठतो. हे वर्षानुवर्षे चाललंय.
त्यात नवलं काय? नवं काय?
मराठी माणूस आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणं हेच याला उत्तर आहे, पण ते परवडणार आहे का आपल्याला?
देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक निर्घृणपणे केल्या जाणाऱ्या हत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याआधीही खैरलांजी, तसेच बौद्ध समाजाच्या स्त्रियांची नग्न धिंड काढणे यांसारखे प्रकार महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत. त्याचवेळी+
#justiceforsantoshdeshmukh
लहानसहान सोडा..मोठ्या उद्योगांनाही सुरवातीला मज्जा वाटत होती.. पण तत्कालीन मजेच्या भरात दूरगामी परिणाम लक्षात येण्याची शक्यता न्हवती.. ते आत्ता त्यांना लक्षात येत आहेत.. मग ते आर्थिकदृष्ट्या असो की वाढीसाठीची इकोसिस्टिम.. हा मांडलेला खेळ एकतर त्यांचा जीव घेईल किंवा जीवच घेईल..❤️
महाराष्ट्रात फळं व अन्नप्रक्रिया उद्योग खूप वाढायला हवेत.
▪️आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड आहे.
▪️परफेक्ट लोकेशन्स आहेत.
▪️बाजारात मागणीही आहे.
▪️बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर व इकोसिस्टमही आहे.
गरज आहे ती जास्तीत जास्त मराठी तरुणांनी यात उतरण्याची. शिकण्याची. तग धरून राहण्याची.
ज्यादिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्यादिवशी मराठी भाषा जन्माला आली
- तारा भवाळकर(98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा)
🧡🧡🚩🚩🚩