माझे रत्नागिरीचे सहकारी माझ्या कुटुंबाचा एक भाग आहेत. आज अनेक दिवसानंतर सगळ्यांना एकत्र भेटलो.
मी कुठल्या पदावर असलो काय आणि नसलो काय या लोकांना कधी फरक पडला नाही, एकात दुसरा सोडला तर कोण इतक्या वर्षात फुटला नाही. माझे सततचे पराभव बघून सुद्धा सावलीसारखे माझ्यासोबत राहिले.
मी कधी तोंडावर त्यांचे आभार मानत नाही पण खरोखरच मी नशीबवान आहे की असे सहकारी कुटुंब मला भेटले.
📍 सिंधुदुर्गनगरी | १ मे २०२६.
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!!
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच क्रीडा, महिला व बालविकास आदी विभागातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
आमदार श्री. सतेज (बंटी) डी. पाटील यांचे सुपुत्र चि. तेजस आणि चि.सौ.कां. स्नेहा यांचा शुभविवाह सोहळा निमित्त आज आयोजित स्वागत समारंभास खासदार श्री. नारायणराव राणे व आई सौ. निलम राणे, आमदार श्री. निलेशजी राणे यांच्यासह उपस्थित राहून नवंदाम्पत्याचे अभिनंदन केले व त्यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या !
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांत महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) पहिल्या स्थानी!
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र सागरी मंडळास प्रथम क्रमांक प्राप्त होणे ही अत्यंत अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन!
आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथील कार्यक्रमात आदरणीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.प्रदीप यांनी पारितोषिक स्वीकारले. यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mahamaritime1
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बजेट १००% खर्च करून सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रामध्ये नंबर एक पोझिशन मिळवली आहे.
ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, मी मनापासून सिंधुदुर्गाचे पालकमंत्री श्री नितेशजी राणे, सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणि अधिकारी वर्ग यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
गुढीपाडवा व माझ्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली.
@Shivsenaofc
📍 विधान भवन, मुंबई.
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
यावेळी आंबा व काजू पिकांचे झालेले मोठे नुकसान, हवामानातील बदल आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी मांडलेली वस्तुस्थिती मा. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ऐकून घेत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. 👇
✅ अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई जाहीर करणार.
✅ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – सरकारचा ठाम निर्धार.
✅ समाधानकारक नुकसानभरपाई देण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
✅ याच आर्थिक वर्षात मदत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
या बैठकीस मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. श्री. नारायणरावजी राणे साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे, मा. मंत्री श्री. उदयजी सामंत, मा. मंत्री कु. अदितीताई तटकरे, मा. मंत्री श्री. भरतशेठ गोगावले, मा. गृहराज्यमंत्री श्री. योगेशजी कदम, मा. खासदार श्री. सुनील तटकरे तसेच माजी मंत्री व आमदार श्री. भास्कर जाधव, आमदार श्री. दीपक केसरकर, आमदार श्री. प्रवीण दरेकर, आमदार श्री. प्रसाद लाड, आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार श्री. महेंद्र दळवी, आमदार श्री. किरण सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.