Request @CMOMaharashtra@Dev_Fadnavis to take positive decision and postpone the exams dated July 8 in view of flood situations in most big cities in Maharashtra where the examination centres have been fixed. Many students will miss the opportunity to appear for the exams as they may not find means to reach the centres. Kindly consider the appeal of thousands of students and extend the examination date. @commr_csmc@mieknathshinde@SunetraA_Pawar
नमस्कार साहेब,
विषय : दिनांक ८ व ९ जुलै रोजी नियोजित परीक्षेचे वेळापत्रक अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याबाबत विनंती.
महोदय,
सविनय विनंती अशी की, दिनांक ८ व ९ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील हजारो उमेदवार छत्रपती संभाजीनगर येथे येणार आहेत. मात्र, सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे, मुंबई तसेच इतर अनेक जिल्ह्यांसाठी रेड व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
या प्रतिकूल परिस्थितीमुळे परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर वेळेत व सुरक्षितपणे पोहोचण्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
1. मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द किंवा उशिराने धावत आहेत.
2. मुंबई–पुणे मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
3. मुंबईतील पवईसह अनेक परीक्षा केंद्रांच्या परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे.
4. अनेक शहरांतील रस्ते जलमय झाले असून वाहतूक काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
5. अतिवृष्टीमुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून काही विद्यापीठांच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
6. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
7. कोकण, मुंबई, पुणे, नाशिक तसेच इतर भागांतून छत्रपती संभाजीनगर येथे येणाऱ्या उमेदवारांच्या प्रवासावर मोठा परिणाम झाला असून अनेक उमेदवारांना परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करून, सर्व उमेदवारांना समान व न्याय्य संधी मिळावी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये, या उद्देशाने दिनांक ८ व ९ जुलै रोजी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, ही नम्र विनंती.
आपण सदर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा योग्य निर्णय घ्याल, अशी आम्हा सर्व परीक्षार्थी उमेदवारांची अपेक्षा आहे.
आपला विश्वासू,
सर्व परीक्षार्थी उमेदवार
@abitkar_prakash आरोग्य हा अती महत्वाचा प्रश्न असताना,आरोग्य व्यवस्थेचे लक्तरे निघत असताना आणि एवढ महत्वाच खात त्यात कर्मचाऱ्यांची कमतरता आणि हजारो पदे रिक्त असून सरकार आणि मंत्री महोदयांना याच गांभीर्य नाही तसेच जाहिरात नाही.@SMungantiwar@AbhiPawarBJP@Dhananjay4INC@RRPSpeaks
@abitkar_prakash सर 1) आरोग्य पर्यवेक्षक 2) आरोग्य निरीक्षक 3) आरोग्य सेवक (MPW ) केव्हा भरणार आहे आम्ही 2-3 वर्ष झाली या पदाची वाट बघत आहे कि आरोग्य विभाग ची भरती येईल आमचा पण विचार करा सर skill असून आम्ही आज बेरोजगार आहे
आकृतीबंध,सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध नसताना आरोग्य मंत्री @abitkar_prakash यांनी आठ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करू असे आश्वासन on record अधिवेशनात दिले याबद्दल आरोग्य मंत्री याबद्दल मंत्री महोदय यांचे आभार परंतु कोणत्याही प्रकारे कंत्राटी जाहिरात प्रसिद्ध होणार नाही याची काळजी घ्यावी
प्रति,
मा. प्रकाश आबिटकर
मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
महाराष्ट्र शासन, मुंबई
विषय : आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवार, आरोग्य क्षेत्रातील पदवीधर युवक-युवती तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या वतीने आपणास हे निवेदन सादर करीत आहे.
राज्यातील आरोग्य विभागात विविध तांत्रिक व अतांत्रिक पदांची मोठ्या प्रमाणावर रिक्तता आहे. या रिक्त पदांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच इतर आरोग्य संस्थांवरील कामाचा ताण वाढला असून आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवांपासून वंचित राहावे लागत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्य विभागातील भरती संदर्भात विविध स्तरांवर आश्वासने देण्यात आली. कधी ५ हजार तर कधी ८ हजार पदांची भरती होणार असल्याचे सांगण्यात आले. काही महिन्यांपूर्वी आपण स्वतः भरती प्रक्रियेतील अडथळे दूर करून ४५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजतागायत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
दुसरीकडे लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवार गेली अनेक वर्षे अथक परिश्रम घेत आहेत. अनेकांनी नोकरीच्या संधी नाकारल्या, आर्थिक अडचणींचा सामना केला आणि आपल्या भविष्याच्या आशेवर अभ्यास सुरू ठेवला आहे. परंतु भरती प्रक्रियेतील सातत्याने होणारा विलंब त्यांच्या मानसिक, आर्थिक आणि सामाजिक आयुष्यावर गंभीर परिणाम करत आहे.
अलीकडे विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधूनही उमेदवारांमधील तीव्र असंतोष, आरोग्य विभागातील रिक्त पदांची गंभीरता आणि भरती प्रक्रियेतील विलंब स्पष्टपणे समोर आला आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.
त्यामुळे आपणास खालील मागण्या तातडीने मान्य करण्याची विनंती करीत आहे :
१. आरोग्य विभागातील प्रलंबित आकृतिबंधास तात्काळ मंजुरी द्यावी.
२. सेवा प्रवेश नियमावलीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
३. विभागातील सर्व रिक्त पदांची अधिकृत माहिती सार्वजनिक करावी.
४. आरोग्य विभाग पदभरतीची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी.
५. संपूर्ण भरती प्रक्रियेचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे.
६. भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांशी नियमित संवाद साधण्यासाठी अधिकृत यंत्रणा उभारावी.
राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा देणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या विषयाकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता सामाजिक आणि मानवी दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे.
आपण या विषयात वैयक्तिक लक्ष घालून तातडीने सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. अन्यथा राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि युवक संघटनांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाला व्यापक आंदोलनाचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आपला विश्वासू,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
अध्यक्ष : रोजगार व स्वयं रोजगार विभाग
मुंबई, महाराष्ट्र
@INCHarshsapkal@abitkar_prakash@Mpsc_Andolan@degree_holders@lahanesg11@CMOMaharashtra
@abitkar_prakash किती दिवस असे आश्वासन देऊन वेळ मारून नेणार मंत्री महोदय, कृतिशील दाखवून लवकरात लवकर जाहिरात काढावी. हजारो विद्यार्थी अनेक वर्षापासून जाहिरातीची वाट बघून आहे,तेवढे गांभीर्य ठेवून किमान कृपया कृती करा.@Dev_Fadnavis@SMungantiwar@Dhananjay4INC
राज्याचे आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांना आरोग्य विभागातील प्रलंबित पदभरतीबाबत खुले पत्र पाठविले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून भरतीची आश्वासने दिली जात आहेत, मात्र जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. दुसरीकडे हजारो पदे रिक्त असून लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे. ग्रामीण आरोग्य सेवेलाही याचा मोठा फटका बसत आहे.
शासनाने तात्काळ आकृतिबंध मंजूर करून सेवा प्रवेश नियमावलीची प्रक्रिया पूर्ण करावी आणि आरोग्य विभाग पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी.
उमेदवारांच्या संयमाची परीक्षा आता थांबवा!
@abitkar_prakash@INCHarshsapkal@mieknathshinde@SunetraA_Pawar@Dev_Fadnavis
#ArogyaBharti #MaharashtraJobs #स्पर्धापरीक्षा #आरोग्यविभाग #YouthEmployment
#DhananjayShinde #Dhananjay_Shinde
आरोग्य विभाग भरतीबाबत केवळ आश्वासने,पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस हालचाल नाही. आकृतिबंध मंजुरी व सेवा प्रवेश नियम रखडल्याने हजारो उमेदवारांचे भविष्य अधांतरी.कृपया जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी. @CMOMaharashtra@MahaDGIPR @MahaHealthIEC @MoHFW_INDIA@Dev_Fadnavis@abitkar_prakash
आरोग्य विभाग भरतीबाबत केवळ आश्वासने,पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस हालचाल नाही. आकृतिबंध मंजुरी व सेवा प्रवेश नियम रखडल्याने हजारो उमेदवारांचे भविष्य अधांतरी.कृपया जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी. @CMOMaharashtra@MahaDGIPR @MahaHealthIEC @MoHFW_INDIA@Dev_Fadnavis@abitkar_prakash