जेव्हा बंटी पाटील लढतो,तेव्हा इतिहास घडतो..🐯⚡
करोडोत एक असतो जो सिस्टीमला नडतो आणि सिस्टीमपेक्षा मोठा होतो..
बंटी पाटील हे तेच नाव!!!🔥
प्रयत्न प्रामाणिक आहे, त्यामुळे यश हमखास मिळणारच आहे...!
@satejp#गोकुळ#कोल्हापूरचा_संघर्ष_मोर्चा
१९९९ मध्ये शरद पवार साहेबांनी काँग्रेस सोडल्यानंतर महाराष्ट्रव्यापी नेतृत्वाची जी पोकळी निर्माण झाली होती, ती लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी समर्थपणे भरून काढली होती.
आज तब्बल २५-३० वर्षांनंतर सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या रूपाने काँग्रेसला लोकांमध्ये राहणारं, प्रचंड मेहनती, स्वच्छ प्रतिमा आणि जनसामान्यांशी थेट नाळ जोडलेलं नेतृत्व मिळालं आहे.
हा केवळ एका नेत्याचा उदय नाही, तर महाराष्ट्रात काँग्रेसच्या नव्या पर्वाची नांदी आहे.
भाजपने आता आपले दिवस मोजायला सुरुवात करावी! 💥✊
@satejp ji❣️
#काँग्रेस #महाराष्ट्र
इकिगाई पुस्तकातून शिकायच्या गोष्टी…
१. नेहमी सक्रिय राहा वय कितीही झाले तरी स्वतःला एखाद्या अर्थपूर्ण कामात गुंतवून ठेवा. निवृत्ती म्हणजे आयुष्याच्या उद्देशातून निवृत्ती नव्हे.
२. घाई कमी करा सतत धावपळ करण्याऐवजी प्र��्येक क्षण सजगतेने जगा. शांतपणे काम केल्याने ताण कमी होण्यास मदत होते.
३. पोट ८० टक्के भरेपर्यंत खा जपानी हारा हाची बू या तत्त्वानुसार पोट पूर्ण भरण्यापूर्वी खाणे थांबवावे. प्रमाणात आणि संतुलित आहार घेण्यावर भर द्या.
४. चांगल्या मित्रांच्या सहवासात राहा
मित्र, कुटुंब आणि समाजाशी चांगले संबंध ठेवा. संवाद, मैत्री आणि परस्पर मदत आयुष्य अधिक आनंदी करतात.
५. शरीर सक्रिय ठेवा रोज चालणे, योग, बागकाम किंवा हलका व्यायाम करा. शरीराची हालचाल आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.
६. हसतमुख राहा छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. सकारात्मक दृष्टिकोनातून अडचणींना सामोरे जा.
७. निसर्गाशी नाते जोडा झाडे, फुले, मोकळी हवा आणि निसर्गातील शांतता अनुभवण्यासाठी वेळ द्या.
८. कृतज्ञता व्यक्त करा आयुष्यातील चांगल्या गोष्टी आणि मदत करणाऱ्या व्यक्तीं��द्दल आभार व्यक्त करा.
९. वर्तमानात जगा भूतकाळातील चुका किंवा भविष्याची चिंता यामध्ये अडकून न पडता आजच्या दिवसाला महत्त्व द्या.
१०. स्वतःचा इकिगाई शोधा तुम्हाला मनापासून आनंद देणारी आणि जगण्याला अर्थ देणारी गोष्ट शोधा व ती जोपासा.
#जीवन #वाचन
कालपासून नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल अनेक गोष्टी वाचायला मिळत आहेत.
पहाटे अस्वस्थ वाटलं…
मित्राशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला…
काही वेळाने ते बेशुद्ध अवस्थेत आढळले…
नेमकं काय घडलं, symptoms काय होते, त्यांची medical history किंवा comorbidities काय होत्या याचं पूर्ण चित्र आपल्याकडे नाही.
म्हणून आज बसून
“असं करायला हवं होतं… तसं केलं असतं तर…”
असं म्हणणं खूप सोपं आहे.
पण 25 वर्षांत emergencies जवळून पाहताना मला एक गोष्ट वारंवार जाणवली आहे
Ground reality मध्ये माणूस textbook प्रमाणे react करत नाही.
अचानक अस्वस्थ वाटलं की पहिला विचार अनेकदा Hospital नसतो.
“थोडं बघू…”
“कोणाला फोन करू…”
“Doctor ला विचारू…”
“कदाचित ठीक होईल…”
आणि त्या विचारांत काही मौल्यवान मिनिटं निघून जाऊ शकतात.
माझ्य�� अनुभवात, emergency मध्ये आधी ‘काय करायचं’ याची चेतना हरवते; आणि वेळेत कृती झाली नाही, तर पुढे चैतन्य टिकवणं कठीण होऊ शकतं.
ही फक्त medical गोष्ट नाही.
यात आयुष्याबद्दलही एक खोल प्रश्न आहे.
आपण किती यशस्वी आहोत, किती प्रसिद्ध आहोत, किती साधनं आहेत यापेक्षा त्या एका क्षणी
आपल्या जवळ कोण आहे, कोण निर्णय घेतं आणि किती लवकर कृती होते, हे अधिक महत्त्वाचं ठरू शकतं.
आयुष्याच्या उत्तरार्धातली एकटेपणाची शक्यता आणि emergency मधली असहायता यावरही प्रत्येक कुटुंबाने कधीतरी शांतपणे विचार केला पाहिजे.
Emergency plan आहे का?
जवळच्या माणसाला माहिती आहे का?
कोणत्या Hospital मध्ये जायचं ठरलेलं आहे का?
कारण retrospectively सगळ्यांनाच योग्य उत्तरं सापडतात.
पण त्या क्षणी आपण काय ���िचार करतो आणि किती पटकन कृती करतो शेवटी तेच महत्त्वाचं ठरतं.
Emergency मध्ये Text नको.
Reply ची वाट नको.
Online inquiry नको.
Doctor च्या callback ची वाट नको.
जवळच्या योग्य Hospital / Emergency Department मध्ये त्वरित पोहोचा.
कधी कधी आयुष्य मोठ्या निर्णयाने बदलत नाही ,
योग्य क्षणी घेतलेल्या एका निर्णयाने ते वाचू शकतं.
In an emergency
awareness matters.
Action matters more.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB FSCAI Cardiology
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#JustForHearts #EmergencyCare #LifeAndHealth #HeartHealth
पहिल्यांदाच १० दिवसांच्या विपश्यना शिबिराला जाणाऱ्यांनी खालील ब��बी लक्षात ठेवाव्यात:
शिबिरापूर्वीची तयारी
* शिबिर म्हणजे विश्रांतीची सहल नसून मनाचे कठोर प्रशिक्षण आहे. सुरुवातीचे ३–४ दिवस विशेषतः आव्हानात्मक वाटू शकतात.
* झोपणे��उठणे, चहा-कॉफी, तंबाखू, मोबाईल आणि जेवणाच्या वेळा आधीपासून थोड्या नियमित करा.
* शिबिरापूर्वी विपश्यना “करून पाहण्याचा” प्रयत्न करू नका. तेथे दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसारच साधना करा.
* मधुमेह, रक्तदाब, मानसिक आजार, पाठ/गुडघेदुखी किंवा नियमित औषधे असल्यास अर्जात खरी माहिती द्या आणि व्यवस्थापनाला आधी कळवा. औषधे स्वतःहून बंद करू नका.
* व्यसन असल्यास अचानक होणाऱ्या त्रासाचा विचार करून डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मानसिकता खालीलप्रमाणे ठेवा
* “मला दहा दिवसांत अलौकिक अनुभव यायलाच हवा” अशी अपेक्षा ठेवू नका.
* जुन्या आठवणी, राग, भीती, अस्वस्थता, कंटाळा किंवा शरीरातील वेदना वर येऊ शकतात. हे अपयश नसून मनाच्या सवयी दिसू लागल्याचे लक्षण असू शकते.
* इतर साधकांशी तुलना करू नका. कुणाला शांतता अनुभवेल, कुणाला बेचै��ी—दोन्ही स्वाभाविक आहेत.
* शंका आल्यास स्वतः प्रयोग बदलण्याऐवजी सहाय्यक आचार्यांना विचारा.
* दहा दिवस पूर्ण करण्याचा प्रामाणिक संकल्प करा; पण गंभीर शारीरिक किंवा मानसिक त्रास झाल्यास तो लपवू नका.
शिबिरातील महत्त्वाचे नियम
* आर्य मौन म्हणजे बोलणेच नव्हे, तर इशारे, नजरेतून संवाद किंवा चिठ्ठ्याही टाळणे.
* पंचशीलांचे पालन, स्त्री–पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि ठरलेल्या वेळापत्रकाचे पालन करणे आवश्यक असते.
* मोबाईल, पुस्तके, डायरी, संगीत, जपमाळ व इतर धार्मिक किंवा ध्यानपद्धती बाजूला ठेवाव्या लागतात.
* योग, प्राणायाम, मंत्रजप, पूजा किंवा इतर साधना विपश्यनेसोबत मिसळू नका.
* दिलेल्या वेळेत शक्य तितक्या नियमितपणे ध्यानगृहात उपस्थित राहा.
शरीरातील वेदना आणि अधिष्ठान
अधिष्ठान म्हणजे क्षमतेनुसार शरीर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न; स्वतःला इजा करणे नव्हे. वेदना तीव्र, असामान्य किंवा दुखापतीसारखी वाटल्यास आसन बदला आणि शिक्षक/व्यवस्थापकांना सांगा. खुर्ची, पाठ टेकवण्याची सोय किंवा इतर मदत मागण्यात कमीपणा नाही.
काय घेऊन जावे?
* सैल, साधे आणि शालीन कपडे
* थंडी/पावसाप्रमाणे स्वेटर, शाल किंवा रेनकोट
* आवश्यक औषधे व प्रिस्क्रिप्शन
* टॉर्च, अलार्म घड्याळ, छत्री, पाण्याची बाटली
* वैयक्तिक स्वच्छतेचे साहित्य
* केंद्राने परवानगी दिल्यास ध्याना���ाठी शाल किंवा छोटा आधार
महागडे दागिने, सुगंधी पदार्थ आणि अनावश्यक सामान टाळावे. संबंधित केंद्राची अधिकृत यादी आधी तपासावी.
साधनेचा गाभा
पहिले काही दिवस श्वासाचे निरीक्षण करून मन एकाग्र केले जाते. त्यानंतर शरीरातील संवेदनांचे समत्वाने निरीक्षण शिकवले जाते. सुखद संवेदनेमागे धावायचे नाही आणि वेदनादायक संवेदनेचा द्वेष करायचा नाही “हीदेखील अनित्य आहे” हे अनुभवातून समजून घेण्याचा प्रयत्न असतो.
शिबिरानंतर
घरी आल्यानंतर लगेचच कायमस्वरूपी बदल झाल्याचा निष्कर्ष काढू नका. नियमित साधना हाच खरा पुढचा टप्पा आहे. शक्य असल्यास सकाळ-संध्याकाळ अभ्यास करा; वेळ कमी असल्यास लहान पण सातत्यपूर्ण सुरुवात करा.
सर्वात महत्त्वाचे सूत्र: प्रामाणिक प्रयत्न करा, सूचनांचे पालन करा, अनुभवांची अपेक्षा किंवा तुलना करू नका आणि प्रत्य��क संवेदनेकडे समत्वाने पाहायला शिका.
डॉ प्रशांत भामरे.
पहले शिवसेना, फिर NCP और अब तृणमूल कांग्रेस।
हर बार एक ही पैटर्न - BJP और चुनाव आयोग मिलकर एक पार्टी को तोड़ते हैं। फिर उसका चुनाव चिन्ह छीन लिया जाता है।
जब पूरी की पूरी पार्टी चोरी हो सक���ी है, तो करोड़ों भारतीयों के वोट चोरी होना भी हैरानी की बात नहीं।
वोट चोरी। सरकार चोरी। अब पार्टी चोरी - ये हमारे लोकतांत्रिक पतन के प्रतीक बन गए हैं।
ECI की संवैधानिक ज़िम्मेदारी जनादेश की रक्षा करना है - मगर उल्टा वो उन ताकतों की मदद कर रहा है, जो जनता के फैसले को ही पलट देते हैं।
यह लड़ाई सिर्फ़ ममता बनर्जी जी की नहीं है। यह हर राजनीतिक दल, हर मतदाता की लड़ाई है जो स्वतंत्र और निष्पक्ष चुनाव चाहता है।
मृत्यू जवळून पाहिल्यावर…
आयुष्य वेगळं दिसायला लागतं.
25–30 वर्षांच्या clinical practice मध्ये हजारो रुग्ण पाहताना एक गोष्ट हळूहळू समजत जाते
मृत्यू सगळ्यांचा एकच असतो.
पण ��ृत्यूपर्यंत पोहोचण्याच्या कहाण्या फार वेगळ्या असतात.
काही कहाण्या मात्र मनात कायम राहतात.
1️⃣ जगण्याची प्रचंड इच्छा असते… पण शरीराकडे वेळ उरलेला नसतो.
COVID, H1N1, severe pneumonia सारख्या आजारांत हे फार जवळून पाहायला मिळालं.
रुग्णाला घरी जायचं असतं.
मुलांना भेटायचं असतं.
पुढच्या महिन्याचे plans असतात.
Treatment स्वीकारण्याची तयारी असते.
जगण्याची इच्छाही पूर्ण असते.
तरी कधी disease इतका पुढे गेलेला असतो की medicine कडेही पुढची संधी उरत नाही.
तेव्हा एक कठीण सत्य शिकायला मिळतं
जगण्याची तीव्र इच्छा असणं आणि जगण्यासाठी वेळ मिळणं…
या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
2️⃣ कधी शरीराकडे अजून संधी असते… पण मनाने आयुष्याचा हात सोडलेला असतो.
Reports फार वाईट नसतात.
Treatment शक्य असते.
पण समोरचा माणूस म्हणतो
“आता पुरे…”
त्या दोन शब्दांच्या मागे अनेकदा disease पेक्षा मोठी कहाणी असते.
एकटेपणा.
दीर्घकाळचा थकवा.
जवळचं कुणीतरी हरवलेलं.
किंवा सकाळी उठण्यासाठी उरलेलं कोणतंच कारण नाही.
तिथे एक वेगळी गोष्ट शिकायला मिळते
माणूस फक्त oxygen, pulse आणि BP वर जगत नाही.
त्याला उद्यासाठी एखादं कारणही लागतं.
3️⃣ आणि सर्वांत अस्वस्थ करणारे मृत्यू कदाचित ते…
जिथे माणसाला काय घडलं हे समजायलाही वेळ मिळत नाही.
Emergency किंवा casualty मध्ये एखादं dead body समोर येतं.
काही त��सांपूर्वी तो माणूस कामावर होता.
कुणाशी बोलला होता.
घराबाहेर पडताना “येतो” म्हणाला असेल.
आणि आता
resuscitation थांबलेलं असतं.
Monitor शांत असतो.
बाहेर कुटुंबाला अजून विश्वास बसलेला नसतो.
Sudden cardiac arrest वय विचारत नाही.
कधी तरुण.
कधी ज्येष्ठ.
अशा वेळी मृत्यूची वेदना वेगळी वाटते.
कारण तिथे फक्त आयुष्य संपलेलं नसतं
निरोप राहिलेला असतो.
काही ��ब्द राहिलेले असतात.
काही माफी राहिलेली असते.
आणि खूपसं “नंतर करू” तसंच राहिलेलं असतं.
इतकी वर्षं आजार आणि मृत्यू जवळून पाहताना
एक विचित्र गोष्ट शिकायला मिळाली
मृत्यू आपल्याला मृत्यूबद्दल कमी,
आयुष्याबद्दल जास्त शिकवतो.
Health जपा
कारण शरीर प्रत्येक वेळी warning देईलच असं नाही.
माणसं जपा
कारण loneliness कोणत्याही routine blood report मध्ये दिसत नाही.
आणि जे खरंच महत्त्वाचं आहे ते जगा
कारण “नंतर” ही तारीख calendar मध्ये नसते.
आपण किती वर्षं जगणार हे पूर्णपणे आपल्या हातात नसतं.
पण आज मिळालेल्या दिवसात
किती जागरूकपणे जगलो,
कोणासाठी उपस्थित राहिलो,
आणि स्वतःच्या शरीराची व नात्यांची किती काळजी घेतली
यातलं बरंच काही अजूनही आपल्या हातात आहे.
दीर्घ आयुष्य ही इच्छा असू शकते.
अर्थपूर्ण आयुष्य ही रोजची निवड आहे.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI
Senior Consultant
Physician & Cardiologist
Just For Hearts
#LifeLessons #ClinicalWisdom #HealthyLiving #JustForHearts
काही गोष्टींची किंमत आपल्याला त्या आपल्या जवळ असताना कधीच कळत नाही…
काही दिवसांपूर्वी श्रीकृष्ण आणि अर्जुनाची एक गोष्ट वाचत होतो.
महाभारताच्या युद्धात अर्जुन जेव्हा कर्णाच्या रथावर बाण मारायचा, त��व्हा कर्णाचा रथ काही अंतर मागे जायचा. उलट कर्णाचा बाण अर्जुनाचा रथाला फक्त हलायचा काही अंश मागे जायचा...
पण कर्णाचा बाण अर्जुनाच्या रथाला लागला की श्रीकृष्ण मात्र कर्णाचं कौतुक करायचे.
अर्जुनाला हे काही केल्या समजत नव्हतं.
शेवटी ना राहवून त्याने श्रीकृष्णाला विचारलं.
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले
"अर्जुना, तुझ्या रथावर हनुमान आहेत आणि मी स्वतः तुझा सारथी आहे. तरीही कर्णाचे बाण तुझा रथ हलवतात… याचा अर्थ त्याची ताकद किती असेल याचा विचार कर."
युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला आधी रथातून खाली उतरायला सांगितलं.
अर्जुन खाली उतरला.
त्यानंतर श्रीकृष्ण खाली उतरले…
आणि क्षणातच तो रथ जळून खाक झाला.
कारण युद्धादरम्यान त्या रथाने असंख्य अस्त्रांचे वार सहन केले होते.
तो फक्त श्रीकृष्णाच्या उपस्थितीमुळे इतका वेळ टिकून होता.
ही गोष्ट वाचताना एक विचार मनात आला…
आपल्या आयुष्यातही असे काही "श्रीकृष्ण" असतात.
आपण यशाचं श्रेय स्वतःला देत असतो.
आपण म्हणतो, "मी हे केलं."
पण त्या "मी"च्या मागे कोणीतरी असतं…
आपल्या चुका शांतपणे सहन करणारा,
आपल्या काळजी स्वतःच्या मनात ठेवणारा,
आपण पडल्यावर उभं करणारा,
आणि आपण जिंकल्यावर दूरून फक्त हसणारा.
आई-वडील असतील, कुटुंब असेल, एखादा मित्र असेल किंवा आयुष्यातील एखादी व्यक्ती…
आपला रथ किती वार सहन करून उभा आहे, हे आपल्याला कदाचित कधीच जाणवत नाही.
म्हणूनच कधी कधी आपल्या आयुष्यात कोण आपल्या सोबत आहे याकडेही लक्ष द्यायला हवं…
कारण काही लोक आपल्याला पुढे नेत नसतात,
ते फक्त आपला रथ कोसळू देत नसतात. 🙏
आज तुमच्या आयुष्यात असा कोण आहे, ज्याच्यामुळे तुमचा "रथ" अजूनही उभा आहे?