रात्रीचे बारा वाजताहेत.
माझा आजचा दिवस नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता सुरू झाला.
दिवसभर राजकीय, प्रशासकीय कामकाज, शंभरावर सुनावण्या... आणि, शेकडो वकील, त्यांचे पक्षकार तितकेच अधिकारी.
अनेक आमदार, सहकारी मंत्री आणि अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या भेटी. जनतेच्या अनेक विषयांचे जंजाळ.
जुने, नवे प्रश्न...समस्या !!
सोडवणूक झाल्यानंतरचे अभिनंदन करणारी पत्रे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व महिलादिनासंदर्भातील विधानसभेतील विलक्षण प्रेरणादायी चर्चा..
पुन्हा रात्री 9 पासून मंत्रालयातील दालनात बैठकी. त्यानंतर शेकडो फाईल्स, अनेक विषयांची निवेदने, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली पत्रे.
यावर ब्रिफिंग..सह्या. सोडवणूक करण्यासह पाठपुराव्याच्या लेखी सूचना.
महाराष्ट्रातून दररोज दोन अडीच हजारांवर पत्रे महसूल विभागात येतात... माझा शिरस्ता आहे, त्या पत्रांवर स्वतः लक्ष देणे. ती पत्रे वाचणे.. आणि शेरा देणे... आणि पाठपुरावा करणे.
हे सगळे पाहिल्यावर लक्षात येते की, किती विविधांगी विषय आहेत महाराष्ट्राचे.. उत्सुकतेचे, लोकजाणिवांचे.
घरी परतलो.. कार्यकर्ते वाट बघतच होते. त्यांच्याशी बोललो.
दिवस वेगवान गेला.
मला खात्री आहे, महाराष्ट्राचे भविष्य घडणार आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून आयुष्याचे हेच खरे समाधान....
#Maharashtra #Mumbai #RevenueMinistry #ChandrashekharBawankule
जीवनातील विसंगतीतून निर्माण होणारा विनोद आपल्या उपजत शोधक नजरेने टिपून जगाला आशयसंपन्न उत्तमोत्तम व्यंगचित्रे देणारे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांच्या निधनाने रेषा अबोल झाल्या.
व्यंगचित्रे ही निव्वळ हसवण्यासाठी असतात ही समजूत नाकारून दैनंदिन जगण्यातील वास्तव मांडण्याची विलक्षण हातोटी त्यांनी साधली होती. म्हणूनच, गेल्या पाच - सहा पिढ्या त्यांच्या व्यंगचित्रांनी घडवल्या.
खुद्कन हसू, अरेच्या... मस्त, हे असेच असेल.. ओहsss असे शब्द अकस्मातपणे ओठांवर येणारी व्यंगचित्रे सप्रे यांनी मराठी, इंग्लिश वर्तमानपत्रे, दिवाळी अंकातून घरोघरी पोचविली.
माणसाच्या आयुष्यात तिरक्या - उभ्या आणि वाकड्या रेषांचा आधार किती असू शकतो ते सप्रेंची व्यंगचित्रे बघून कोणीही सांगेल. आपल्याशी बोलणाऱ्या रेषा हा त्यांच्या व्यंगचित्रांचा संपन्न आशय होता.
अर्ध्या शतकाहून अधिक काळ कार्यरत राहून मनोहर सप्रे यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून मराठी व्यंगचित्र क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे. वर्तमानपत्रात उमटणारी अक्षरे जितकी महत्व ठेवून असतात; तितकेच महत्व सप्रेंच्या व्यंगचित्राचे होते. आपण एक मानवी स्वभाव स्पंदनांचा मौलिक ठेवा गमावल्याने दुःख मला झाले.
एका आशयघन चित्रऋषिला आपण मुक्लो.
माझी विनम्र श्रद्धांजली!!
प्रिय अतुल खरं खरं सांग आयुष्याच्या रंगमंचावरून अशी धक्कादायक एक्झिट घेताना तुझ्यावर, तुझ्या नाटकांवर अलोट प्रेम करणाऱ्या, अनेकानेक भूमिकांचा आनंद घेणाऱ्या रसिकांची तू काहीच पर्वा केली नाहीस. चटका लावून निघून गेलास.
तुझ्या गालावरची गोड खळी आणि प्रसन्न हास्याने मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा अतुल परचुरे नावाचा अभिनेता आमच्यात नाही, हे वास्तव स्वीकारणे जड आहे..वेदना देणारे आहे. तुझ्या मराठी मालिका, नाटके आणि चित्रपट, इतकंच नव्हे तर हिंदी मालिका आणि चित्रपटातूनही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या भरोशावर तू जीवघेण्या आजारावर मात केलीस आणि 'खरं खरं सांग..' या नाटकातून तू पुन्हा रंगमंचावर दमदार एंट्री केली... तुझ्यातला अभिनेता सगळ्यांनी अनुभविला..
आणि सायंकाळी ही बातमी खूप धक्का देवून गेली.
माझी विनम्र श्रद्धांजली..!!
#AtulPurchure
भारतीय उद्योगाचे एक अनमोल पर्व आज संपले !!
पद्मविभूषण रतन टाटा यांचे निधन समस्त भारतीयांसाठी दुःखद आहे. रतन टाटा नावाची एक सुरम्य दंतकथा वाटावी इतकी भव्य प्रतिमा व भारदस्त कारकीर्द समस्त भारतीयांनी अनुभविली.
सहृदयी, संवेदनशील माणुसपणाचा अतुलनीय दीपस्तंभ म्हणजे रतन टाटा ! नैतिक नेतृत्व, साधे राहणीमान विलक्षण उमदेपण व परोपकाराचे ते उदाहरण होते. व्यवसाय व त्यापलीकडील जगावर त्यांनी अमिट छाप सोडली आहे. ते माझ्या आठवणींमध्ये नेहमीच सर्वोच्चस्थानी राहतील.
देशाच्या प्रगतीत रतन टाटा यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.
आयुष्यात जी माणसे मनात घर करतात आणि ज्यांच्या यशोगाथा पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात असे व्यक्तिमत्व होते रतनजी!
माझी विनम्र श्रद्धांजली!!
#RatanTata
माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर देशाची राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो.
डॉ. भवाळकर लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक आहेत.
मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोल योगदान आहे.
आजच्या स्त्रीचळवळीचा संत कवयित्रींच्या चळवळीशी काय अनुबंध आहे, याचाही ऊहापोह त्यांनी काही वर्षांपूर्वी करून देत स्त्रीसाहित्याची संपूर्ण जाणीव जनमानसाला करून दिली.
मी पुनःश्च डॉ. भवाळकर यांचे अभिनंदन करतो.
भाजप आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर काय झाले असा सवाल विरोधी पक्षांनी केला.
आपल्या बहुआयामी विकासामुळे, FDI मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे.
पण महायुती आल्यानंतर जो मोठा बदल झाला तो म्हणजे लालबागच्या राजाच्या दरबारातून आजचे चित्र समोर आले आहे. शरद पवारांना देव आठवले.!!
महायुती आल्यानंतरचे हे बदल आहेत.
चाळीस वर्षांत पहिल्यांदा असे घडले... याला राजकीय पोळी भाजणे म्हणतात...
कोराडी नागपूर येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात परिसरातील अनेक माता भगिनींनी मला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या सर्व भगिनींचे मी मनापासून आभार मानतो.
#RakshaBandhan
🟧20-07 -2024 | मुंबई | माध्यमांशी संवाद
महाविकास आघाडीचे 31 खासदार लोकसभेत निवडून आले. त्यांना माझे खुले आव्हान आहे. त्यांनी सांगावे की, आम्ही OBC समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला देणार आहोत. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत जाहीरनाम्यात टाकावे, की आम्ही ओबीसीचे आरक्षण काढून मराठा समाजाला देऊ. ते करू शकत नाहीत. खोटारडे आहेत. खोटे बोलून मते घेतील. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, हीच भाजपाची अपेक्षा आहे.
#BJP #ChandrashekharBawankule #Maharashtra
मनःपूर्वक अभिनंदन!
हा विजयाचा शंखनाद!!
भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व विजयी सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना मला आनंद होतो. अतिशय दमदार मतांनी या सर्वांनी विजय मिळवला.
पार्टीच्या राष्ट्रीय सचिव @Pankajamunde ताई यांच्यासह @iYogeshTilekar , डॉ. @Parinayfuke , @AmitGorkhe आणि @Sadabhau_khot यांचा विजय कार्यकर्त्यांच्या मनाला विलक्षण उभारी देणारा आहे.
उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते मा.श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वाने तेजाने लखलखणारी ही विजयी पताका आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा शंखनाद आजच्या भरजरी यशाने केला. जनतेचा आशीर्वाद व आदरणीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही विधानसभेला सामोरे जाऊ... आणि विजयी होऊ.
मी सर्वांना शुभेच्छा देतो.
#BJP #Maharashtra
दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती
दीक्षाभूमी येथे भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता स्थगिती.
बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल.
•उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
महाराष्ट्र भाजपाची दोन दिवस पुणे येथे बैठक
• १३ जुलैला प्रदेश पदाधिकारी
• १४ जुलैला विस्तारित कार्यसमिती
• चार हजार पदाधिकाऱ्यांना निमंत्रण
•केंद्रीय गृह व सहकारमंत्री श्री अमित शाह उपस्थित राहण्याची शक्यता
• प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्रजींचा
बँकांना गंभीर इशारा!
•सिबिल स्कोर मागितला तर FIR करणार
शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना राष्ट्रीयकृत बँकांना सिबिल स्कोरची अट लावता येणार नाही. सिबिल स्कोरची मागणी केली तर बँकेविरुद्ध FIR करणार
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (एस.एल.बी.सी.) बैठकीत उपमुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis जी यांचा थेट इशारा
शेतकऱ्यांचा स्वाभिमान
महायुतीचा अभिमान!!
धन्यवाद देवेंद्रजी!!
अनादी मी अनंत मी, अवध्य मी भला |
मारिल रिपु जगती असा कवण जन्मला ||
थोर क्रांतिकारक, लेखक, कवी, नाटककार, समाजसुधारक स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने "शपथनामा" नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे.
खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?
महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे.
२६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली.
आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात?
शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे !!
१९७७ मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले.
१९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले.
१९८० मध्ये ४० आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
१९८८ मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले.
१९९९ मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली.
२०१९ मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला!
२०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली.
खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?
@PawarSpeaks
चैत्र शुद्ध प्रतिपदा, श्री शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त.! नवीन वर्ष प्रत्येकासाठी आशादायक, उत्साहवर्धक, आनंददायी आणि यशस्वी जावो हीच प्रार्थना!
हे वर्ष विकसित भारताच्या पायाभरणीचे वर्ष.! आपण सारेच संकल्प करू... विजयाची उंच गुढी उभारू.
सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#Gudhipadwa
पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांचा नागपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचा नामांकन अर्ज आज दाखल होणार आहे. त्यापूर्वी @nitin_gadkari जींच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री आदरणीय श्री @Dev_Fadnavis जी, राष्ट्रवादीचे नेते @praful_patel जी यांच्यासह महायुतीतील नेते उपस्थित होते. तिथे सौ. कांचनवहिनी गडकरी यांनी नितीनजींचे तेज:पुंज निरंजनाने औक्षण केले.
हा क्षण खूप भावनिक होता.
#LokasabhaElection2024 #Nagpur #Loksabha #NitinGadkari