अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.
परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे.
सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!
पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांच्या निधनाने राज्यातील गोरगरीब आणि वंचित जनतेचा खरा वाली हरपला, ही माझी विनम्र भावना आहे.
जेंव्हा जेंव्हा मी त्यांना गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी भेटलो, तेंव्हा त्यांनी कर्मवीरांप्रमाणे मदत केली. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. ते दिलदार तितकेच सहृदयी होते, सामान्यांच्या प्रश्नांची खोल जाण होती आणि त्यांच्या संवेदना सदैव जिवंत होत्या. अशी व्यक्ती आजच्या राजकारणात आणि समाजकारणात दुर्मिळ झाली आहे.
मुंबईतील शोकसभेला संसद अधिवेशनामुळे उपस्थित राहता आले नाही, याची मला खंत आहे. तो एक पवित्र आत्मा होता. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
श्रद्धांजली!
@satejp
राज ठाकरेंना यशाचा गुलाल लागावा हे मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न होतं...
यश छोटं असेल पण प्रामाणिक आहे...
मनसेच्या सुवर्ण अध्यायाला या विजयाने पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे...
.
.
खूप अभिनंदन @RajThackeray ❤️. .
कोल्हापूरमध्ये विरोधात सगळे एकत्र, सत्ताधारी पक्षातील सर्व नेते कोल्हापुरात ठाण मांडून असताना कांग्रेस पक्ष सर्वात मोठा ठरला आहे
बहुमत थोड्याने हुकले
पण
बावड्याचा वाघ एकटा लढला आणि जिंकला 🔥
@satejp
While BJP pushes North Indian faces for Mumbai’s civic polls, true Marathi pride shines through! Our beloved Marathi actors & sons of the soil stand firmly with MNS to protect & uplift Mumbai. Mumbai belongs to the Marathi manoos and not outsiders! 💪🟠 #MNS #MarathiManos #SaveMumbai
२०१४ ते २०२५ या फक्त ११ वर्षांच्या काळात, सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूह ज्या वेगाने देशात पसरला आणि अनेक क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे. त्याची झलक दाखवणारी ही चित्रफीत जरूर पहा...
काय केलं ठाकरेच्या शिवसेनेने २५ वर्ष !!
संपूर्ण देशातील एकमेव महानगरपालिका !!
!! मुंबई महानगरपालिका !!
१. देशातील एकमेव महानगरपालिका जिचे ५ नर्सिंग कॉलेज आहेत.
२. स्वत:ची ३ मेडिकल कॉलेज आहे.
३. आर्थिक निकषांनुसार देशातील सर्वात मोठे बजेट सादर करणारी महानगरपालिका.
४. देशातील सर्वात मोठी सुरक्षा यंत्रणा आणि सुसज्ज सुरक्षा यंत्रणा असलेली महानगरपालिका.
५. सर्व महानगरपालिका पेक्षा जास्त जलाशय आणि त्याचे उत्तम नियोजन असलेली महानगरपालिका.
६. देशातील सर्वात मोठी, स्वस्त आणि सुसज्ज आरोग्य यंत्रणा असलेली महानगरपालिका.
७. महत्वाचे म्हणजे एक अशी महानगरपालिका जी जवळपास १,२०,००० लोकांना नोकरी देते.
८. टॅब वरून शिक्षण देणारी शिक्षण यंत्रणा.
९. देशातील सर्वात मोठे जलशुध्दीकरण केंद्र.
१०. स्वबळावर व स्वखर्चावर स्वतःच पाहिलं वहीलं धरण बांधणारी महानगरपालिका.
११. देशातील पहिलं 'इ कचरा संचलन केंद्र' सुरु करणारी देशातील पहिली महानगरपालिका.
१२. आणि हे सर्व सांभाळून ९०,००० करोड ची ठेव फिक्स डीपॉझीट ठेवणारी जगातील एकमेव महानगरपालिका.
१३. याच व्याजातून कोस्टल रोडवर कोणताही टोल न आकारण्याचा निर्णय घेणारी महानगरपालिका.
१४. शहरातील ५०० फुटाखालील घरांनामालमत्ता कर माफ करणारी महानगरपालिका.
जय भवानी जय शिवाजी…🙏🚩
जय महाराष्ट्र…🙌✨
भारताचे सरन्यायधीश श्री भूषण गवई यांनी आज सायंकाळी नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक स्थळी जाऊन महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केले.यावेळी, मुंबई उच्चन्यायालयांचे कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख , न्यायमूर्ती एस जी चपळगावकर जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमितकुमार गुप्ता , जिल्हा परिषद सी ई ओ कार्तिकेयन एस , कोल्हापूर महानगर पालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, कोल्हापूर बार असोसिएशन अध्यक्ष अॅड व्ही आर पाटील आदी विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
#kolhapur