शेती, नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आपल्या लहान भावाच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या GVT परिवारातील स्वप्नील राडकर यांच्या त्यागाला आज खऱ्या अर्थाने यशाचे सुवर्णफळ मिळाले आहे.
चैतन्य राडकर यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC CAPF Assistant Commandant पदावर यश मिळवत बीड जिल्ह्याचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले.
राडकर परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमचा हा प्रवास असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
#UPSC #BEED @UPSCyclopedia
लोकशाहीचा मूल्यांचा गळा चिरला जात असताना
उद्या आपल्या मुलांनी जर विचारलं, "अन्याय होत असताना तुम्ही कुठे होता?" तर आपल्या उत्तरात लाज नसावी.अन्यायाचा निषेध करा. लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने ठामपणे उभे रहा.
हे सरकार इंग्रज , हिटलर व निरो पेक्षा भयानक
@mayankgandhi04 सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओतून मिळाली आहे नाहीतर ग्राउंड लेव्हलला अधिकारी बरेच शेतकऱ्यांना चुकीची माहिती करीत होते,
धन्यवाद मयंक गांधी सर
बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे विविध प्रश्न चर्चेसाठी मांडण्यात आले.
चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खालील बाबी स्पष्ट करण्यात आल्या :
1. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सेवक हे संयुक्तरीत्या थेट जागेवर जाऊन करतील.
2. पाण्याने खरडून गेलेल्या जमिनीसाठी शासन निर्णयानुसार प्रति हेक्टर ४७ हजार रुपये मदत मिळणार आहे.
3. अशा जमिनीची नोंद ७/१२ वर पोटखराब क्षेत्र म्हणून होणार नाही, असा कोणताही शासन निर्णय नसल्याचे अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी स्पष्ट केले.
#ओलादुष्काळ #WetDrought
@anjali_damania@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील काही गावांचा आज मी दौरा केला. पावसाने अगदीच थैमान घातले असून, नद्या, नाले, ओढे एक झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना आणि अश्रू पाहून अगदीच मन हेलावून गेले. निसर्गाचा प्रकोप झाल्याने शेकडो शेतकरी कुटुंब उघड्यावर पडले. अगोदरच कर्जाच्या खाईत असलेला बळीराजा आणखीच खचून गेला आहे. वाईट वाटतं... वास्तविक परिस्थितीचे शासनाने सर्वे करावेत व शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर तात्काळ आर्थिक मदत करावी.
@CMOMaharashtra@anjali_damania@MahaDGIPR@CA_SanjayParmar@Dev_Fadnavis@RSSorg@CollectorBeed
कोर्टाला एकाच प्रश्न
सरकारने ४ महिने काहीच का केले नाही असे सरकारला का विचारले जात नाही?
मराठ्यांना मुंबईपर्यंत यायला का भाग पाडले?
दोन वर्ष झोपलं होते का सरकार ?
#मराठाआरक्षण
संताप होतोय त्या सदावर्तेंचा युक्तिवाद ऐकून
२९ ऑगस्ट २०२३ पासून जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण ह्या विषयावर आंदोलन सुरू केले. ह्यात ८ वेळा उपोषणं / आंदोलने केली.
आज त्या आंदोलनाचा उद्रेक झाला तर सरकारला नवल का वाटलं? किती वर्ष भिका मागायला लावणार?
२०२३ पासून ते आत्तापर्यंत फक्त आश्वासने देऊन सरकारने वेळकाढूपणा का केला? समितीची बैठक घेतल्याचे आत्ता दाखवत आहेत, ह्या समितीच्या किती बैठका ह्या २ वर्षात झाल्या? ह्याचा अहवाल सरकार देऊ शकेल का? का फक्त झुलवत ठेवणार?
बाकी सगळे राजकीय उपटसुंभ, आपापल्या राजकीय पोळ्या भाजायला तिथे जातात. ते फक्त आंदोलनात येतात. मग ऐरवी ते काहीच का करत नाहीत? अधिवेशनात कोणीच का बोलत नाही?
जरांगेंनी राजकारण्यांना लांब ठेवायला हवं. ह्यापुढे एकही राजकीय नात्याला आंदोलनात स्थान नाही असं सांगून टाकायला हवं. सगळे एका माळेचे मणी.
स्वतःच्या समाजाचं इतकं मोठं आंदोलन चालू असतांना शिंदे गावी का गेले? त्यांनी छत्रपतींसमोर आश्वासन दिलं होतं ना? अजित पवारांचे आमदार आंदोलनाला पाठिंबा देतात, पण अजित पवार एकही शब्द का बोलत नाहीत? हे दोघंही मराठा आहेत ना ?
फडणवीस म्हणतात मी मराठा आरक्षण दिले, मग आता पुढे काहीच का केलं नाही? का त्यांना चर्चेला बोलावलं नाही? त्यांची जेवणाखाणाची आबाळ का केली? जरांगेंचा त्यांच्या बद्दलचा तिरस्कार हा जालन्यात झालेल्या लाठी चार्ज मुळे झाला असेल.
ठाकरे- पवार सरकार होत तेव्हा त्यांनी देखील काहीच का केलं नव्हतं? सगळे खोटारडे संधीसाधू आहेत. फक्त मतांचं राजकारण करतात.
माझ्या मते, ‘अतिशय गरीब’ असलेल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी OBC Non Creamy layer हे ८ लाखाच्या खाली न ठेवता, ४ लाखाच्या खाली केले पाहिजे. मगच खाऱ्या अर्थाने ते गरजू व गरीब लोकांसाठी होईल.
SC आणि ST category मधे सुद्धा creamy- non creamy लेयर करून त्या समाजाच्या फक्त वंचित वर्गाला आरक्षण दिले गेले पाहिजे. पण त्या बद्दल कोणी काहीच बोलत नाही. SC ST मधील खऱ्या गरीब व गरजू लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही.