कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसेवेचा वसा घेतलेल्या मला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली आहे. आपणा सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाच्या पुण्याईने मी लवकरच आपल्या सेवेकरिता पुन्हा रुजू होईन. तोपर्यंत सर्वांनी सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून आपापल्या घरी राहावे ही नम्र विनंती! 🙏
#पावसाळा पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने प्रभागातील हनुमान टेकडी परिसरातील नाला व गटारांची सफाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आज हनुमान टेकडी येथे उपस्थित राहून तेथील रहिवाशांसोबत संवाद साधला तसेच संबंधित अधिकारी वर्गास उपरोक्त सुचना दिल्या.
#kalwa
हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतरचे तीन दिवस अत्यंत कठीण, अनेक अभद्र विचार मनात येत होते, माझा कट्ट्यावर बोलताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले कोरोनाशी लढताना आलेले अनुभव #jitendraawhad#abpmajha#majhakatta
https://t.co/fnnneDXs6l
प्रभागातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल येथील अरुंद नाल्याचे नूतनीकरण करण्यात येत आहे. आज सदर कामाच्या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पावसाळ्यापूर्वी नाल्याच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना सुचना दिल्या.
#Kalwa
प्रभागातील गावदेवी मैदान येथे दर आठवड्यात एकदा नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून भाजी तसेच फळांची उपलब्धता सुरू करण्यात आलेली आहे. सोशल डिस्टंसिंग तसेच सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली.#कळवा
प्रभागातील संकल्प नगर येथे नुकताच कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने @TMCaTweetAway प्रशासनाने हा विभाग पूर्णपणे बंद केला. मा.@Awhadspeaks साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तेथील रहिवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले व शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
तरी, कृपया विनाकारण रस्त्यावर चालत, दुचाकीवरून फिरणाऱ्या मंडळींनी याची दखल घ्यावी व कोरोना संकटावर मात करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे ही विनंती... #StayHomeStaySafe
#कोरोना संकटावर लवकरात लवकर मात करण्याच्या उद्देशाने ठामपा प्रशासन, @NCPspeaks पक्ष व मंदार केणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभागातील अंतर्गत रस्ते तात्पुरते बंद करण्यात येत असून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या मंडळींवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे.
#WarAgainstVirus#Kalwa
४० दिवसांहून अधिक काळ #वृत्तपत्र घरपोच पोहोचविण्याची सुविधा बंद आहे. यामुळे वृत्तपत्र विक्रेते व आपल्याला घरपोच वृत्तपत्र पोहोचविणारे तरुण मुलं यांची घरी जेवणाची भ्रांत होत आहे. कळव्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेते व वृत्तपत्र घरपोच देण्याचे काम करणाऱ्यांना अन्नधान्य वाटप केले.
@TMCaTweetAway तील सफाई कामगार रात्रंदिवस काम करत असून प्रत्येक विभाग कोरोनामुक्त होण्यासाठी साफसफाई योग्य पद्धतीने करत आहेत.त्यांच्यावरील कामाचा व्याप लक्षात घेत आजपासून प्रभागातील सर्व विभागात स्वखर्चाने व स्वकष्टाने औषधांची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
आपण सर्वांनी वाढदिवसाच्या दिवशी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासाठी अनमोल असून त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल, अशी मी आशा बाळगतो... धन्यवाद! 🙏